Maharashtra LIVE Updates: मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाचा आंदोलनाचा इशारा; २ कोटी भरपाई आणि नोकरीची मागणी
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्या फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्या फक्त एका क्लिकवर...
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का?
India Vs Pakistan: टी-20 वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना उद्या 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हवामान अंदाजानुसार रविवारी कोलंबोमध्ये पावसाची 93 टक्के शक्यता आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Dilip Walse Patil : मी भक्कम, पण अजितदादांच्या जाण्यानं भावना आवरत नाहीत, दिलीप वळसे पाटील भावुक
पुणे : मला काहीही झालेलं नाही, मी भक्कम आहे. फक्त अजितदादा गेल्यानं, मला भावना आवरत नाहीत असं सांगताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) भावुक झाल्याचं दिसून आलं. सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चेत जायचं नाही अन् त्या चर्चांमध्ये पडायचंही नाही असं स्पष्ट करताना दिलीप वळसे पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुरु असलेल्या राजकारणावर काही बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.
बदलापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत सात दुकानं फोडली
बदलापूर येथे चोरट्यांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात काल रात्री एकाच ठिकाणची सात दुकानं फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. किराणा आणि कपड्यांच्या दुकानांचा यात समावेश आहे. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती दुकानदारांनी दिली. सलग दुसऱ्या दिवशी दुकानफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
शिवभक्तांचा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात पाच भाविक गंभीर
भंडारा: ट्रॅक्टरवरून शिव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला शेतात उलटलं. या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील ५ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थान जवळ घडली. या अपघातानंतर जखमींना परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देत तातडीनं तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या अपघातानंतर गायमुख देवस्थानाकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
























