Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai Airport) आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचे आज पंतप्रधान...More
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत 2 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर रवाना
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4 वाजता उदय सामंत म्युनीच ला होणार दाखल
म्युनीच वरून उदय सामंत स्ट्युटगार्ड मुक्कामी पोहचणार
दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत ना. उदय सामंत उद्योग विभागाच्या विविध बैठकांना राहणार उपस्थित
दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता ना. उदय सामंत महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन
दि. 10 ऑक्टोबर रोजी उदय सामंत मायदेशी परतणार
उदय सामंत ह्यांच्या सोबत उद्योग विभाग सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलरासू, विकास आयुक्त श्री. दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित
माढ्याच्या पिंपळनेर मधील गणेश विद्यालय बाॅम्बने उडवण्याची खोडसाळ धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे शाळा व पालकात घबराट निर्माण झाल्यावर शाळेच्या मुख्यध्यापकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यानुसार कुर्डूवाडी पोलिसांत ( ncr)प्रमाणे अज्ञातावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ज्यांच्या नावाने पत्र शाळेला पाठवण्यात आले आहे.त्या व्यक्तिची मुलगी त्या शाळेत शिकत असून पोलिसांत जाऊन त्याने मी पत्र दिले नसून या पत्राचा माझा संबध नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे शाळेला खोडसाळ धमकीचे पत्र देऊन भितीचे वातावरण निर्माण करणार्या त्या व्यक्तिचा शोध कुर्डूवाडी पोलिस करीत आहेत.
समीर वानखेडे यांच्या मानहानी दाव्यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज दोघांना नोटीस जारी
बड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीज मध्ये मानहानी झाल्यांचा वानखेडेंचा दावा
वानखेडेंच्या दाव्यावर म्हणणं सादर करण्यासाठी नेटफ्लिक आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटला नोटीस जारी
नवरात्र उत्सव काळात पुण्यात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. १ ऑक्टोबर रोजी पुणे सातारा रस्त्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ कारणातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. अखेर सहकारनगर पोलिसांनी या तरुणाला शोधून काढले मात्र त्याच्या विरोधात संबंधित तरुणीने तक्रार न दिल्याने त्यावर कारवाई झाली नाही. मात्र असे असतानाच या तरुणाने त्याची चूक कबूल केली आणि "माझ्याकडून चूक झाली, मी "ताई" आणि तिच्या घरच्यांची माफी मागतो" अशी दिलगिरी व्यक्त केली...
पुणे: हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांचा मोबदला वसूल करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी
धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बॅंक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्या नावावरील मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. पठाण आणि त्याचे साथीदार सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख, मुनीर शेख आदींची बँक खाती गोठविण्यात आली असून, संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.
आरोपींच्या घरांची झडती घेताना पोलिसांना पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, फर्निचर आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या.
या वस्तूंची बिले मागवण्यात आली असता आरोपींच्या नातेवाइकांकडे त्याची कागदपत्रे नव्हती. झडतीदरम्यान दोन नोटरीकृत साठेखत सापडले असून, त्यांची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे.
पुणे: हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांचा मोबदला वसूल करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी
धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बॅंक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्या नावावरील मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. पठाण आणि त्याचे साथीदार सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख, मुनीर शेख आदींची बँक खाती गोठविण्यात आली असून, संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.
आरोपींच्या घरांची झडती घेताना पोलिसांना पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, फर्निचर आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या.
या वस्तूंची बिले मागवण्यात आली असता आरोपींच्या नातेवाइकांकडे त्याची कागदपत्रे नव्हती. झडतीदरम्यान दोन नोटरीकृत साठेखत सापडले असून, त्यांची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे.
Beed Crime : एका धक्कादायक घटनेने बीड पुन्हा एकदा हादरले आहे.. शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाचा नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.
Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी!
सुवर्णयुग सहकारी बँकेकडून देखील २५ लाख रुपयांची मदत
अतिवृष्टीच्या संकटामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे.
एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आली.
पुण्यात आमली पदार्थ्यांची तस्करी करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक
पुण्यातील मोहम्मदवाडी मधून या आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आले
३७.६० ग्रॅम मेफेड्रोन या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे
एकूण ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल त्या चार आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे
मतीन हुसेन मेमन (२५), फैजल नौशाद मोमीन (२६), फैयान युसूफ शेख (३६), आणि सूरज सरतापे (२८) हे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत
तर त्यांचा साथीदार सोमेश आनार हा पसार झाला आहे
या बाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात NPDS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावातील नागरिकांनी शेतशिवारात वन्य प्राण्यांचा होणारा हैदोस आणि पिकाची नासाडी टाळण्यासाठी शेतीला विद्युत प्रवाहित झटका यंत्र लावले आहेत. मात्र, याची कल्पना नसल्यानं विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्यान इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मोहाडी तालुक्यातील किसनपूर शेतशिवारात काल रात्री घडली. गंगाधर उईके (32) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. मृत इसम हा गोंदिया जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या बहिणीला भेटून शेतशिवारातून मार्ग काढत गावाकड परतत असताना ही घटना घडली.
मेट्रो 3 ऍकवा लाईन तीन पूर्ण मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार...
आज होणाऱ्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांना देखील निमंत्रण... दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघांचे खासदार असल्याने अरविंद सावंत यांना निमंत्रण...
निमंत्रण असलं तरी अरविंद सावंत मेट्रोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत...
विज्ञान केंद्र ते कफ परेड पर्यतच्या 11 स्थानकांचे लोकार्पण होणार आहे...
ही स्थानक खासदार अरविंद सावंत यांच्या मतदार संघात येत असल्याने निमंत्रण देण्यात आलं आहे
मात्र अरविंद सावंत यांच निमंत्रण पत्रिकेत नाव नाही...
Nagpur News: शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या शाळेला विसरत नाही आणि वेळ पडली तर शाळेसाठी बरेच काही करतात.. मात्र शहरच नाही तर देश सोडून परदेशात स्थायिक झालेले अनेक विद्यार्थी आपल्या शाळेला विसरता सुद्धा... नागपुरात मात्र एका माजी विद्यार्थ्याने त्याच्या "हडस हाय स्कूल" या शाळेसाठी थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल 75 लाखांची देणगी देत वेगळा आदर्श घालून दिला आहे.. मूळचे नागपूरकर आणि सध्या व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झालेले लोकसारंग हरदास असेच एक विद्यार्थी... लोकसारंग लिबरल एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित नागपुरातील हडस हायस्कूलचे विद्यार्थी होते 1975 मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.. नंतर व्यवसायात चांगले उत्पन्न कमावल्यानंतर ज्या शाळेने माझ्या मनात स्वप्न निर्माण केली आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ ही दिले... जिथल्या शिक्षकांनी फक्त शैक्षणिक कार्यच केले नाही, तर अनुशासनही शिकवले, अशा शाळेसाठी लोकसारंग यांनी 75 लाख रुपयांची मदत करत करण्याचे ठरविले.. लोकसारंग यांनी अमेरिकेतून येत नागपुरातील त्यांच्या शाळेत एक नवीन मजला बांधून दिला.. तसंच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांसाठी प्रयोगशाळा तसेच आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल लॅब उभारून दिली... सध्या लोकसारंग अमेरिकेत व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असून "एलएच टोटली ऑसम ग्रुप"चे ते संस्थापक आणि सीईओ आहेत..
अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी
काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते, पक्षाला किंमत मोजावी लागते - अजित पवार यांची भुजबळांच्या विरोधात थेट समोरच नाराजी
भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआर बाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी थेटच नाराजी आजच्या बैठकीत केली व्यक्त
बैठकीला हजर असलेले छगन भुजबळ समोरच अजित पवारांची थेट नाराजी- सूत्र
एनसीपीची आमदरांच्या बैठकीत अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य
राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक पार पडली होती
नवी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्टसाठी २८५ नव्या पदांना परवानगी देण्यात आलीय, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सुरु होणार असल्याने इमिग्रेशन विभाग आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अशा २८५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. यात देशभरात आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. या विमानतळावर इमिग्रेशनचे कामकाज पाहण्यासाठी आवश्यक पोलीस बळ पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिनियुक्तीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ओळखपत्र, व्हिसा, पारपत्र तपासणी सह अन्य सुरक्षा अनुशंघाने येणाऱ्या महत्वाच्या प्रक्रियांचा समावेष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर (Narendra Modi In Mumbai) आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai International Airport) आणि मेट्रो 3 च्या (Metro 3) अखेरच्या टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर