Maharashtra Live Updates: नगरमध्ये प्रवरा नदीत बोट उलटली, SDRFच्या तीन जवानांचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.

Background
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमला सुरक्षा असूनही तिकडे एखादी व्यक्ती जातेच कशी? रोहित पवारांचा सवाल
स्ट्राँगरुमला एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना तिथे एखादी व्यक्ती जातेच कशी? सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेत ते देखील सीसीटीव्ही बंद झाले होते , शिरूर मध्ये देखील तसाच प्रकार झाला... जर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका आपण घेऊ शकतो असं रोहित पवार म्हणाले. सोबतच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जिल्हाधिकारी यांना इशारा दिला. हा जर तुम्ही सत्ताधाऱ्यांचा ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू, असा सज्जड दमच रोहित पवार यांनी दिला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज मराठवाड्यात बैठक होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आलेली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप पर्यंत आचारसंहितेमधून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाय योजना करण्याच्या संदर्भात सूट दिलेली नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री फार काही मोठी घोषणा करू शकणार नसल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या एक वाजेपर्यंत या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. आचारसंहितेमधून सूट मिळावा अशी राज्याचे मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे.
























