Maharashtra Live Updates: संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरलीय. हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर,जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना यलो...More
* राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
* मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस जाहीर
* ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय
* नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सबंधित मनपा आयुक्तांना हे बोनस कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश
V/O -- कालच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पॅकेजचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांग दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना पैसे मिळतील असे आश्वासन दिले होते मात्र दिवाळीला केवळ दोन दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची बत्तीस हजार कोटीची घोषणा हवेतच आहे का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. आता केवळ दोन दिवस कामाचे दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत मग शेतकऱ्यांनी कशाची दिवाळी करायची असा सवाल त्यांनी केला.
महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्याला बसला होता महापुरातून लोक सावरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे अध्यक्ष सुरज भैय्या देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी जवळपास 20 लाख रुपयांची औषधाचा साठा आज माढा आरोग्य केंद्राला खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते दिला. यामध्ये पूरग्रस्त जनतेच्या आरोग्यासाठी लागणारी सर्व प्रकारची औषधे मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत.
या कार्यक्रमानंतर बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी सरकार आणि प्रशासन या दोन्हींवर सडकून टीका केली. एका बाजूला मुख्यमंत्री सरसकट पंचनामे करायची घोषणा करतात तर दुसऱ्या बाजूला प्रशासन मात्र पंचनामे करताना नको त्या अटी लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. विहिरीतील गाळ तीस हजारात कसा निघायचा आणि जनावरांना केवळ 37 हजार हा कुठला न्याय असा संतप्त सवाल त्यांनी केला. आजही मदतीसाठी निघालेल्या जीआर मध्ये पूर्वीचेच दर असून मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली वाढीव मदत शेतकऱ्यांना मिळणार की नाही असे विचारत मोडून पडलेल्या शेतकऱ्याला उभं करणे हे सध्याचे सर्वात महत्त्वाचे काम असून शासनाने तातडीने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना दिल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.
अमरावती
अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर शेकडो कंत्राटदार व पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन....
कंत्राटदारांचे 18 कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदार आणि मजूर आक्रमक...
अमरावती जिल्ह्यातील संतप्त कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी घुसले कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकायात..
उद्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा संपूर्ण अमरावती शहरासह ग्रामीण भागातही पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा...
जवळपास एक वर्षापासून कंत्राट दाराचे 18 कोटी देयके थकल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ...
मेडिकल चालकाची १० लाखांची केली होती फसवणूक
आरोपीने मुलासाठी घेतली महागडी केटीएम डुक बाईक
उल्हासनगरातील मेडिकल चालकाला खरे सोने दाखवून नंतर मात्र बनावट सोने देऊन १० लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्छी (५२) याच्याकडुन ४ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच आरोपीने मुलासाठी फसवणूकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. उल्हासनगरात राहणारे मेडिकल चालक सूरज शामनानी (२४) यांना आरोपीने विश्वासात घेऊन माझ्याकडे सोने असल्याची बतावणी केली. तसेच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांना खात्री करण्यासाठी दिले. शमनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली. त्यानंतर आरोपीने अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ सप्टेंबर रोजी फिर्यादी शामनानी यांच्याकडुन १० लाख रुपये स्वीकारून त्यांना सोने दिले. मात्र हे सोने सोनारकडे नेले असता ते बनावट असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादी सूरज शामनानी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपी धर्मा मानसिंग कच्छी याला ताब्यात घेतले असून फसवणूक केलेल्या रक्कमेतील ४ लाख रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच ९३ हजार रुपये बँक खात्यात होल्ड केले. त्याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसेच ८०० ग्राम सोन्याचे मनी जप्त केले आहेत. तर आरोपीने मुलासाठी केटीएम डुक ही महागडी दुचाकी विकत घेऊन दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
बाईट : शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सिरोंचा मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना निलंबित केले आहे. तर तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी मद्दीकुंठा आणि चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका चौकशीत तब्बल 15 हजार 665 ब्रास अवैध रेती साठा आढळून आला. त्यासाठी 29 कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच दोन जेसीबी, एक पोकलँड मशिन आणि पाच ट्रक रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचेही निष्पन्न झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
खमारी ते सुरेवाडा मार्गावरील घटना
Anchor : रस्त्यात पडलेले खड्डे चुकवताना व्हॅन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कूल व्हॅन नाल्याच्या पुलावरून उलटल्याने 10 विद्यार्थी जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना भंडाऱ्याच्या खमारी ते सूरेवाडा मार्गावर घडली. बेरोडी येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. परिसरातील गावातील विद्यार्थी खाजगी व्हॅनने शाळेतून घरी परतताना ही घटना घडली. सर्व जखमी विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, किरकोळ विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
संगमनेर / अहिल्यानगर
एस. टी बसला अपघात...
नाशिक पुणे महामार्गावरील घटना..
चंदनापुरी घाटात एस टी बस झाली पलटी...
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील घटना...
बस मधील नऊ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी..
संगमनेर साकुर बसला अपघात...
सुदैवाने जीवित हानी टळली...
अपघात ठिकाणाहून काही अंतरावर होती मोठी दरी....
काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक झाली होती ठप्प...
आमदार धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रांमध्ये दिलेली माहिती चुकीच्या असल्याचा दावा करणारा अर्ज करुणा शर्मा यांनी परळी येथील न्यायालयात केलेला आहे. या प्रकरणावर आज परळीच्या न्यायालयासमोर सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता सहा नोव्हेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरम्यान यापूर्वीच्या सुनावणीमध्ये धनंजय मुंडे यांनी या याचिकेवर आक्षेप घेणारा अर्ज दाखल केला होता तो यापूर्वीच फेटाळला असल्याची माहिती देखील वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ
जिल्हाभरातील आठ नगरपरिषदेत मतदार यादीवर तब्बल 13000 आक्षेप
नगरपरिषद प्रभागांमध्ये मतदार यादीत मध्ये घोळ, अनेकांच्या रहिवाशी पत्त्यांमध्ये बदल
तर अनेकांची नावे मतदार यादीतून गायब, नावामध्ये चुकांच्याही तक्रारी
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजाराहून अधिक तक्रारी धाराशिव नगरपरिषदेत
निवडणूक विभागाकडे मतदार यादी बद्दल तक्रारींचा खच, मुदतीत तक्रारीचे निवारण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी 10 लाख रुपयांची मदत....
अण्णा हजारे यांच्या आधिपत्याखाली चालवल्या जाणाऱ्या राळेगण येथील हिंद स्वराज ट्रस्टने दिली मदत....
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला धनादेश....
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आली मदत...
आज पर्यत विविध पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली रक्कम ही समाजाला पुन्हा पुरस्काराच्या माध्यमातून परत करता यावी यासाठी दरवर्षी अनेक कार्यक्रम रबाविले जात असून यंदा अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणार मदत...
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडगडाटासह पावसाने काल हजेरी लावली. यात वैभववाडी तालुक्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसाने वैभववाडीतील कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे. आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे भात कापणीला जोरदार सुरुवात केली होती. त्यातच काल अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी या मुसळधार पावसाने भात शेती आडवी झाली आहे. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मविआत मनसेत घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळतंय. मात्र राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मान्सून देशातून माघारी फिरला
आज संपूर्ण देशातून मान्सून परतला
मात्र, महाराष्ट्रात आज काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा उल्लेख करताना निवेदिकेने त्यांचा प्रवास मांडला. हा प्रवास मांडताना निवेदिकेने अनेक अलंकारांचा उल्लेख केला. मात्र हे राजनाथ सिंह यांना पचनी पडलं नाही. त्यांनी माईकचा ताबा घेताच निवेदिकेला चिमटा काढला. माझं डेंटिंग, पेंटिंग आणि सेंटिंग करण्यात आलं. पण केवळ अलंकाराने नव्हे तर कर्माने, कर्तृत्वाने विभूषित होऊ शकतो. त्यामुळं अलंकारापेक्षा कर्म आणि कर्तुत्वाला प्राध्यान्य द्यायला हवं असं सिंह म्हणाले.
बीड: येथे उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभेची सध्या तयारी सुरू आहे. मात्र सभा होण्यापूर्वीच बीड मधील राजकीय वातावरण तापले असून महाएल्गार सभेला मराठा समन्वयकांनी विरोध केलाय. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच सभेसाठी यावं अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नाही असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला. मात्र काही जण केवळ प्रसिद्धीसाठी हे करत असल्याच उत्तर सभेचे आयोजक सुभाष राऊत यांनी दिले.
सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावातील शेतात आज सकाळपासून रमल्याचं पाहायला मिळालं. स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड ते आज सकाळपासून करतायत. दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर ते आले आहेत. काल साताऱ्यातील सभेनंतर ते दरे गावी मुक्कामी होते. आज सकाळपासून ते शेतात रमल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे.
रायगड : एकीकडे वाढलेल्या स्थलांतरामुळे कमी झालेली भात शेती आणि दुसरीकडे होत असलेल्या भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका, त्यामुळे कोकणातला भात शेती करणारा शेतकरी हवालदिल झालाय. काल झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका भातशेतीला बसलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती करणारा शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. जिल्ह्यात यंदा 69 हजार हेक्टरीवर भात शेती करण्यात आली आहे. ही भातशेती आता जवळजवळ कापणीला तयार झाली आहे. मात्र कापणीला आलेला पिक शेतकऱ्याने कापणीला सुरुवात केल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नुकसानीत टाकलंय. त्यामुळे या शेतकऱ्याने आता मदतीची अपेक्षा केली आहे.
रबाळे येथील ट्रक क्लिनरच्या अपहरणाप्रकरणी दिलीप खेडकर यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
अटक पूर्व जामिनासाठी दिलीप खेडकर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
बेलापूर कोर्टाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका
अभिनेता सलमान खानचे वडिल सलिम खान राज ठाकरेंच्या भेटीला
स्वत:राज ठाकरे शिवतीर्थ सलीम खान यांना फिरून दाखवत होते
यावेळी गॅलेरीत राज ठाकरे शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यात रंगल्या गप्पा
कन्नड तालुक्यातील नागद गावात मंगळवारी रात्री ८.३० वाजता २५ वर्षीय तरुण शुभम रणवीरसिंह राजपूत याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपीजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील पाच आरोपी ताब्यात, तर दोन फरार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुख्य आरोपी अमोल निकम याला गल्लीत येणाऱ्या एका व्यक्तीवरून शुभमने हटकले होते. याच कारणावरून अमोलने सहकाऱ्यांसोबत मिळून शुभमवर मानेवर व शरीरावर वार करत खून केला. आरोपींमध्ये अमोल, सचिन, शंकर, ऋषी, अविनाश निकम आणि बंडू, सतीश राजपूत यांचा समावेश आहे. कन्नड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
महानगरपालिका स्वबळावर लढा.. नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी..
आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि निवडणुकीच्या पूर्वतयारी साठी महत्वाची बैठक काल रात्री उशिरा पार पडली
या बैठकीत महायुतीमध्ये असलेल्या भाजपा बाबत नाराजीचा सूर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला
भाजपचे पदाधिकारी हे शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी करीत असलेल्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणत असल्याच्या तक्रारी..
खासदार नरेश म्हस्के यांनी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा केला प्रयत्न..
बीड : यश ढाका खून प्रकरणात फरार असलेल्या चौथ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले. निखिल घोडके याच्या अटकेसाठी एक पथक रवाना करण्यात आले होते. अखेर मध्यरात्री बीड पोलिसांनी घोडकेला अटक केली आहे. बीड शहरातील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा वीस दिवसांपूर्वी माने कॉम्प्लेक्स परिसरात चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपीसह दोन जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली. मात्र निखिल घोडके हा फरार होता. निखिल घोडके राजुरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील व्हिडीओ व्हायरल
कैदी राजरोसपणे कारागृहात अमली पदार्थ सेवन करतांनाचा व्हिडीओ व्हायरल
कारागृहात मोबाईल नेण्यास परवानगी नाही, कैदीची कारागृहात येताना तपासणी केली जाते,मोठी सुरक्षा व्यवस्था असताना कारागृहात मोबाईल कसे, अंमली पदार्थ कसे गेलेत
कारागृहाची सुरक्षा व्यवस्था काय करत होती असे सवाल उपस्थित होत आहेत
कारागृह प्रशासनाने हा व्हिडीओ एक ते दीड वर्ष जुना असल्याची माहिती दिली असून त्या दृष्टीने चौकशी केली जात होते
दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत देखील भाजपचं भव्य कार्यालय
मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन पार पडणार
चर्चगेट परिसरात भाजपचं नवीन कार्यालय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १८ आॅक्टोबर रोजी होणार भूमिपूजन
भाजपचे सर्व मंत्री आणि नेते उपस्थित असणार
प्रशस्त आणि अत्याधुनिक सेवांनी युक्त असे हे कार्यालय असणार
याआधी ठाण्यात भाजपकडून मोठं कार्यालय बांधण्यात आलंय जे अत्याधुनिक सुविधांसह आहे.
संगमनेर : तालुक्यातील आधार फाऊंडेशन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. शेवगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भायगाव, काळेगाव, बक्तरपूर, खामगाव, वाघोली या गावांमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 150 किराणा किट, प्रत्येक कुटुंबातील बहिणीसाठी भाऊबीजेनिमित्त 250 साड्यांची दिवाळी भेट दिली आहे. आधार फाऊंडेशन धावून आल्याने अनेक शेतकरी बांधव संकटकाळातही दिवाळी सण साजरा करू शकणार आहेत.
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धासवाडी गावात एका रात्रीत पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी दोन घरांमधून चार तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 60 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे. तर उर्वरित तीन घरांमध्ये चोरट्यांनी शोधाशोध केली असली, तरी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेनंतर किनगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील CCTV फूटेज तपासण्याचे आणि संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गावात सलग घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खाद्यांवर घेतली होती.. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे.... खेडेकरांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राव्दारे कळविले असले तरी देखील निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे.. त्या आता भाजपा त परतणार किंवा काय निर्णय घेतात याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेचं अनोखं पाऊल
भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसविण्यात येणार
राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प
याच महिन्यापासून होणार सुरुवात
पुण्यात भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे अडीच लाखांवर
भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ
यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे.
आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंगोली च्या येडशी तांडा गावामध्ये भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळा आहे या शाळेमध्ये सहावीत शिकत असणाऱ्या मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नराधम शिक्षक घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ फरार झाला आहे तर या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थिनी सुद्धा राहत असून या शाळेत एकही महिला ऑर्डर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कोणत्याही निवासी आश्रम शाळेला मुलीच्या संरक्षणासाठी महिला वॉर्डन असणे गरजेचे असताना मात्र या शाळेतील संस्थाचालकांनी महिला वॉर्डन ऐवजी पुरुष वॉर्डन या शाळेमध्ये ठेवल्याने मुलीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर वर वर आला आहे दरम्यान याप्रकरणी चौकशी करून दोषीवर कार्यवाही करून अशी माहिती हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.
उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावे गुंतवणुकीचे बनावट ॲप तयार करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत शहरातील एका उद्योजकाला लाखोंचा गंडा घालण्यात आला. या उद्योजकाला जवळपास 76 लाखांना गंडवलं आहे. पैसे पाठवून विदेशात गेलेल्या उद्योजकाने प्रेमजी यांच्या समूहाची मूळ वेबसाइट उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, यातील अर्धेअधिक पैसे बीडच्या 2 बँक खात्यात गेल्याचे समोर आलं आहे .त्यामुळे राज्यातही सायबर गुन्हेगारांचे जाळे तयार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर बीडच्या बँक खात्यातून उद्योजकाचे पैसे पुढे शेकडो बँक खात्यांवर वळते होत गेले. जवळपास 800 पेक्षा अधिक व्यवहार होत ते पुढे पाठवले गेले. त्यामुळे शेवटच्या बँक खात्यावर जाणे तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.
पूरग्रस्तांसाठी चितळे उद्योग समूहाने १ कोटीची मदत केलीं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा चेक श्रीपाद चितळे, विश्वास चितळे ,गिरीश चितळे आणि निखिलजी चितळे यांनी सुपूर्द केला. महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेऊन चितळे उद्योग समूहाने आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटीची मदत केलीं आहे.
राज्यात यंदा शेतकऱ्यांचे नगदी पिक असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे त्यात जे काही सोयाबीन हाती लागलय ते शेतकरी बाजारात विक्री करतोय तिथेही शेतकऱ्यांची परवड होतेय आज सोयाबीनच्या अवस्थे प्रमाणे २००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापारी खरेदी करत आहेत.शासनाचे हमी भाव खरेदी केंद्र आतापर्यंत सुरू व्हायला हवे होते मात्र १६ ऑक्टोबर आला तरी शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून शासनाचे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
मुंबईचा मालाड मालवणी परिसरात मदर टेरेसा शाळेबाहेर कचऱ्याच्या मोठा ढिगाऱ्या
मदर टेरेसा शाळेत शिकणारे 3 हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ
शाळेच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी पर्यंत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा वास येत आहे
शाळा प्रशासनाकडून मुंबई महानगरपालिकेला तक्रार करून सुद्धा पालिकेकडून याकडे दुर्लक्ष
या कचऱ्याच्या ढिगारामुळे शाळेत शिकणारा लहान मुलं मध्ये मोठ्या प्रमाणात डेंगू टायफाईड सोबत इतर आजारांचा प्रमाण वाढला आहे
पालिकेकडून या कचऱ्याच्या ढिगारावर कारवाई करत नसल्यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांचा पालकांमध्ये पालिका विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे....
मंडप डेकोरेशनच्या कामासाठी एका गावात गेलेल्या 32 वर्षीय इसमान गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीनं उचलून नेत तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास तिच्यासह तिच्या कुटुंबीयांची समाजात बदनामी करेल, अशी धमकी दिली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडीपार सिंधीपार या गावात दोन दिवसांपूर्वी घडली. घडलेली घटना अल्पवयीन मुलींना कुटुंबीयांना सांगताचं त्यांनी केलेल्या तक्रारीवरून काल रात्री लाखनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुनेश्वर देऊळकर (32) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मजुरीच्या कामासाठी आलेल्या तरुणांनी पार्टीत नाचवल्या नृत्यांगना
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील नंदगाव गावातील प्रकार
गावच्या माळावर मोठ्याने गाणी लावून नृत्यांगना सोबत अश्लील हावभाव करत केल नृत्य
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर इस्पूरली पोलिसांनी आयोजक तरुणाला घेतलं ताब्यात
१९ वर्षीय आरोपी दिपाली अशोक निरगुडे , तिचा २१ वर्षीय प्रियकर उमेश सदु महाकाळ आणि त्यांची १९ वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगनमत करून खंडवीला “प्रेमाच्या जाळ्यात” अडकवले. इन्स्टाग्रामवर बनावट “पायल वारगुडे” नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधण्यात आला.१० ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला.
नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकाचा हातोडा पडणार असून बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात नाशिक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे, त्यात आता महापालिकेनेही उडी घेतली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे, 25 बाय 15 मीटर चा तळ मजला ,पहिला मजला आणि त्यावर होर्डिंग लावण्यासाठी केलेली इमारत साधारणपणे तीन चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पुरररेषेत बांधण्यात आली या इमारतीत भाडेकरू टाकुन त्यांच्याकडून भाडे वसूल केले जात होते, गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या प्रकाश लोंढे आणि त्याचा पुत्र दीपक लोंढे यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार कारवाई ला सुरवात झाली आहे, चार दिवसांपूर्वी लोंढेच्या आणखी एका इमारतीत भुयार आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला होता, त्यामुळे याही इमारतीचा गुन्हेगारी कारणासाठी वापर केला जात असल्याचा पोलीसांना संशय असून आजच्या कारवाईतून गुन्हेगारांना इशारा दिला जात आहे, लोंढेच्या इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर आजूबाजूच्या झोपडपट्टी मधील अनधिकृत घरांना ही नोटीस पाठवून तेही पाडले जाणार आहे, आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये खंडणी उकळण्यासाठी गोळीबाराची घटना घडली होती, त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, प्रकाश लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भूषण लोंढे अजूनही फरार आहे, त्यामुळे दहशत माजविण्याचे त्याचे अड्डे आता जमीन दोस्त करणयाची कारवाई सुरू झाली असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात तुंबळ युद्ध, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानचे हवाई हल्ले, अफगाणिस्तानचेही पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ड्रोन हल्ले, ४८ तासांची शस्त्रसंधी लागू
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार