Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची...More
रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
रोहित पवार यांची एबीपी माझाला माहिती
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला जाताना इराक आणि इराणच्या बॉर्डरवर विमानाने हवाई उड्डाणची परवानगी न घेतल्यामुळे विमान पाडण्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला होता
एकनाथ शिंदे यांनी भेटी दरम्यान संबंधित घटना घडल्याचं मान्य केल्याचं रोहित पवार यांची माहिती
पुण्याच्या राजगड तालुक्यातील माणगावच्या हद्दीत पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेला असताना एक २७ वर्षीय तरुण पाय घसरून पाण्यात पडल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याची ही घटना घडली
रघुनाथ मोतीराम जगताप असं या तरुणाचं नाव आहे
घटनेची माहिती मिळताच राजगडच्या वेल्हे पोलीसांकडून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पाणलोट क्षेत्रात त्याचा शोध घेऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
अधिक तपास पोलिस करत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे देणार जातमुक्त गावाला भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार अहिल्यानगर चा दौरा
मनसे अध्यक्ष पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे हे अहिल्या नगरला जाणार आहेत
अहिल्यानगर मधील सौंदाळा गावला राज ठाकरे देणार भेट
अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने जातमुक्त गाव म्हणून घोषित केले आहे
या गावातील गावकऱ्यांनी ५ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेत ठराव पास करून घेतला आहे
याच गावात वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० मार्चला राज ठाकरे जाणार…
मनसेचा 9 मार्चला वर्धापन दिन
यावर्षी मनसेचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार...
सोबतच मनसेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ देखील याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार
रायगड किल्यावर राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करतील
त्यानंतर रायगडच्या पायाथ्याशी मनसेचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडेल
युध्दमुळे पुरवठा खंडित झाल्याने गो गॅस ने वाहनांत वापरली जाणारी एलपीजी गॅस च्या दरात प्रति किलो 20 रूपये दर वाढवले
महाराष्ट्र पोलीस दलाचे डीजी(DG) सदानंद दाते यांच्या नावावर वरिष्ठ नागरिकाला २ कोटी २५ लाखांची फसवणूक
व्यावसायिक आणि रिटायर सीनियर सिटीजन ला डीजी सदानंद दाते यांच्या नावाखाली धमकी देऊन ही फसवणूक
सीनियर सिटीजनला तुमचा दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा सांगून हे फसवणूक करण्यात आली
त्यासोबत दहशतवादी संघटने कडून पैसे आल्याचं देखील भीती बसून या सीनियर सिटीजनला डिजिटल अरेस्ट करण्यात आला
सीनियर सिटीजन चा तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या नोर्थ सायबर सेलने गुजरातचा जेलमधून एका आरोपीला अटक केली आहे
अटक आरोपीचा अकाउंट मध्ये हे सर्व पैसे आले होते, त्यासोबत यामध्ये सीनियर सिटीजनला डीजी सदानंद दाते यांच्या नावावर धमकी देणारा कॉलरचे शोध सायबर सेल कडून सुरू आहे....
- बारावी पेपरफुटी आणखी एक गुन्हा दाखल..
- राज्यभर गाजलेल्या बारावी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट
- पेपरफुटीचे मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती
- उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉ. अतुल चौधरी पोलिसांच्या ताब्यात,
- जेईई, नीट व ८ वी ते १२ वीचे सुमारे १७५ विद्यार्थी शिकवणीमध्ये
- २६ जानेवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली...सराव परीक्षेत दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाचा पेपर बहुतांश प्रश्न आणि काही प्रश्नाचे सिक्वेन्स जशास तसे(50 टक्के पेक्षा अधिक पेपर मध्ये साधर्म)
- प्रश्न तसेच क्रमही एकसारखे असल्याने संशय बळावला
- सेंट उर्सुला शाळेतील पेपरफुटी प्रकरणानंतर उमरेड कनेक्शन समोर
- बोर्डकडून सुरवातीला चौकशी करण्यात आली मात्र समाधान झालं नाही, अखेर शंका असल्यानं पोलिसात दिली तक्रार...
- उमरेड पोलिसांकडून डॉ. चौधरी यांची कसून चौकशी
- मोबाइलचा CDR तपासून पेपर कुणाकडून मिळाला याचा शोध सुरू..
- शिक्षण विभागाकडून अहवाल अद्याप प्रलंबित
- शिक्षण मंडळाच्या तक्ररीनंतर या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील आम्ला शिवारात एका शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीनच्या पिकात अंतर्गत अफूची शेती केली. याची माहिती पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी छापा टाकत 81 किलो वजनाचा अफू जप्त करून शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत जवळपास 20 लाखांचा अफू जप्त करण्यात आलाय.
गेवराई तालुक्यातील ज्ञानेश्वर कदम या शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीनच्या पिकात ही अफूची शेती पिकवली होती. पोलिसांनी फॉरेन्सिक टीम सह या शेतावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अफू आढळून आला. या कारवाईत शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे.
बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण
निलंबित केलेल्या तीन अधिकाऱ्यांसह 20 जणांविरोधात फौजदारी कारवाई
बोगस कागदपत्रे सादर करून शासनाचा निधी लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील तीन अधिकारी आणि बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील 17 कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
उच्च शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते
या 20 आरोपीनी 251 कामगारांचे बनावट कागदपत्रे सादर करून 455 प्रस्ताव सादर करतील एकूण 3 कोटी 63 लाख 20 हजारांचा निधी लाटला
या संदर्भात सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी नोंदणी अधिकारी ए. आर. पवार, दुकान निरीक्षक एस. डी. राजपूत, ऊ. च. सूर्यवंशी या तिघांना निलंबित केलं होतं
आता या तिघांसह एकूण 20 जणांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील एमएचबी कॉलनीत राहणारे दिक्षित अमृतलाल सोलंकी (३२) यांचा ओमानमधील Muscat जवळ ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. १ मार्च रोजी क्षेपणास्त्रांनी सज्ज ड्रोनने त्यांच्या जहाजावर हल्ला केला.
सोलंकी हे MT MKD Vyom या टँकरवर क्रू मेंबर म्हणून काम करत होते. हे जहाज सुमारे ५९,००० मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेत होते. हल्ल्यानंतर काही क्रू सदस्यांना २ मार्च रोजी वाचवण्यात आले, मात्र सोलंकी यांचा मृत्यू झाला.
Embassy of India Muscat यांनी या घटनेची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. सोलंकी नुकतेच आईच्या निधनानंतर पुन्हा जहाजावर ड्युटीवर रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.
पालिका शाळांतील शालेय साहित्य वितरण डीबीटीऐवजी जुन्या पद्धतीनेच करावे –श्रद्धा जाधव
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्याच्या खरेदी व वितरणाबाबत डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. श्रद्धा श्रीधर जाधव यांनी यास विरोध दर्शवला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य थेट देण्याची जुनी पद्धत कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पाट्या, वह्या, गणवेश, बूट आदी शालेय वस्तूंचे वितरण केले जाते. मात्र ही योजना डीबीटी पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत असल्याचे जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, मोठ्या नवीन योजनांच्या घोषणांची शक्यता कमी
आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने कठोर निर्णय अर्थसंकल्पात घेतले जाण्याची शक्यता
कालबाह्य योजना बंद करण्याऐवजी त्यात बदल केला जाणार?
आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल सादर झाल्यानंतर राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर
* कर्जाचा डोंगर पाहता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या मोठ्या योजनांची घोषणा करण्याची शक्यता कमी असून आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जाणार
* आधीच हाती घेतलेल्या योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्प ज्यांची सुरुवात आधीच झाली आहे ते प्राधान्याने पूर्ण करणे त्यासोबतच सुरू ठेवण्यावर सरकारचा भर असेल
* राज्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याकडेही लक्ष असेल.
* राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार येणार नाही; पण त्यातून सरकारची प्रतिमा उंचावेल, अशा पद्धतीच्या काही योजना जाहीर होण्याची शक्यता आहे
* कालबाह्य ज्या योजना झाल्या आहेत आहेत त्या बंद करण्याऐवजी सध्याच्या गरजांनुरूप त्यात बदल करत कशा आणायच्या यावर राज्य सरकार विचार करेल
* लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार असा आश्वासन देण्यात आला होता... त्या अनुषंगाने काही घोषणा करणार का? महिलावर्गासाठी काही योजना आणल्या जाणार का ? याकडे लक्ष असेल
* शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिलमध्ये सरकारकडे सादर झाल्यानंतर ३० जून पूर्वी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी सोडून इतर कोणत्या योजना आणि घोषणा केल्या जातात याकडे लक्ष असेल
आता राज्यातील बिबटे ही गुजरातला पाठवले जाणार
वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
राज्यातील सुमारे ५० बिबटे वनताराला पाठवण्याचा निर्णय
वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनामध्ये झाला करार
बिबट्यांचे संवर्धन व मानवी संरक्षणाचे कारण पुढे करत वन विभागाचा निर्णय
मुंबईतील Enforcement Directorate (ED) ने 2,467 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अर्चना कुटे यांना अटक केली आहे. हे प्रकरण Dnyanradha Multistate Co‑operative Credit Society Ltd मधील आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे.
अर्चना कुटे यांना Prevention of Money Laundering Act अंतर्गत अटक करून मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी 7 मार्चपर्यंत ED कोठडी सुनावली आहे.
ED च्या तपासानुसार, सोसायटीने गुंतवणूकदारांना 12 ते 14 टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेतली. मात्र अनेक गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले नाहीत. तपासात सुमारे 2,467 कोटी रुपये कुटे ग्रुपच्या कंपन्यांना कर्जाच्या नावाखाली वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात यापूर्वीच सुरेश कुटे यांना अटक करण्यात आली असून ED ने आतापर्यंत सुमारे 1,621.89 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त किंवा अटॅच केली आहे. तपास अद्याप सुरू आहे.
इचलकरंजी शहरात दिवसाढवळ्या पोलिसाच्या समोर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली आहे. इचलकरंजी शेजारी असणाऱ्या यड्रावमध्ये छापा टाकत कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरी याच्याकडून 865 ग्रॅम एमडी ड्रगसह, चार जिवंत काडतुसे असा तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे...यड्राव मधील पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या रामविलास नागोरी याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. इचलकरंजी मधील शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून मनीष नागोरी याला पोलिसांनी अटक केली आहे...इचलकरंजीत घडलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी शस्त्र पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला होता. यावेळी मनीष नागोरी याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मनीष नागोरे याच्या घरावर धाड टाकून कारवाई केली...
स्वराज्याची राजधानी आणि शिवप्रेमींची आस्मिता केंद्र असलेल्या किल्ले रायगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. रायगडवरील इतर दुरावस्थेबरोबरच आता शिवसमाधी आणि राजदरबारातील सुरक्षा कठडे सुद्धा खराब झाले आहेत. राजदरबारात राजसदरेवर आणि शिवसमाधी स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी त्याच प्रमाणे सुरक्षेच्या कारणांसाठी लाकडी सुरक्षा कठडे बसवण्यात आले आहेत. या सुरक्षा कठड्यांच्या लाकडी भागांना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी हे भाग तुटले आहेत. कापडाच्या चिंध्या बांधून या कठड्यांचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी वणव्यामुळे आग लागली होती. आता महत्वाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कठड्यांची दुरावस्था. यामुळे स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला त्याच बरोबर शिवप्रेमींच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या किल्ले रायगडाबाबत पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. सोबत नादुरुस्त स्थितीत असलेले सुरक्षा कठडे जोडले आहेत
खेड - धामणंद मार्गांवर भीषण अपघात
बोरिवली ते सापिर्ली जाणारी खासगी आराम बस पलटी
खेड धामणंद मार्गावर एनवरे या ठिकाणी झाला अपघात
मुंबईहून खेडमध्ये शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या बस ला भीषण अपघात
बस मधील 25 प्रवासी जखमी तर दोन जण गंभीर जखमी
जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
सर्व जखमी सापिर्ली धामणंद गावातील
स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्य करत जखमींना काढले बसमधून बाहेर
महामार्गावर वाहनं अडवून लूटमार करणाऱ्या १५ जणांच्या टोळीवर भंडारा पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील बायपास पुलावर काही दिवसांपूर्वी या टोळीनं वाहनधारकांना मारहाण करीत लुटमार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यानंतर या सर्वांना अटक केली होती. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यावर या टोळीच्या कारवायांचा प्रकार भंडारा पोलिसांच्या निदर्शनात आला. भंडारा पोलिसांनी या टोळीवर निर्बंध लावता यावा, यासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे जिल्हा अधीक्षकांनी मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देत या १५ जणांच्या टोळीवर मकोकासारखी मोठी कारवाई केली आहे. या टोडीतील बऱ्याच जणांवर खून, जबरी खंडणी वसुली, शस्त्रांनी धमकावणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
तिथीनुसार शिवजयंती निमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल
मिरवणुका असल्याकारणाने लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता, बाजीराव रोड या रस्त्यावरील वाहतुकीत बदल
या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात येणार
पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याच पुणे पोलिसांच आवाहन
पर्यायी मार्ग कोणते?
जिजामाता चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक– जंगली महाराज रोड खंडोजीबाबा चौ- टिळक चौ- टिळक रोड मार्गे वळविण्यात येईल.
– दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारुवाला पुल चौकातूनच पर्यायी मार्गाने सोडण्यात येईल.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक केळकर रोडमार्गे वळविण्यात येईल.
– मिरवणूक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौकाकडून वळविण्यात येतील.
– पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने टिळक रोड- अलका टॉकीज चौ- एफ.सी. रोडमार्गे जातील.
– मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौक व बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक बंद करून ती केळकर रोडकडे वळविण्यात येईल.
– गाडगीळ पुतळा परिसरात मिरवणूक असताना वाहने सावरकर भवन पुल – बालगंधर्व चौक किंवा टकले हवेली मार्गे वळविण्यात येतील.
– शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन- टिळक पूल- मनपा किंवा टकले हवेलीमार्गे सोडण्यात येईल.
बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्या नंतर पैशाची परतफेड केली तरी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटका नाही असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले आहे
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिल लेखराज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
पैसे परत केल्या नंतर त्यांने गुन्हा मागे घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती
मात्र सबळ पुरावे बघता न्यायालयाने तो गुन्हा मागे घेण्यास नकार दिला
अर्थसंकल्प सदर होताच पहिल्याच स्थायी समिती सभेत २८०० कोटींच प्रस्ताव: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा प्रकल्पासाठी २४०० कोटीचा प्रस्ताव
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला आज पासून सुरुवात होणार आहे
आज होणाऱ्या पहिल्याच बैठकीत ५९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे
या ५९ विविध प्रस्तावासाठी तब्बल २८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पहिल्याच बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
यात नाल्यांची दुरुस्ती, खर्चातील फेरफार, नवीन पूल, प्रभाग रस्तावरचे खर्च आरोग्य सेवा अश्या विविध विषयांचा समावेश आहे.
गोरेगाव - मुलुंड लिंक रोड चा प्रस्ताव कामाचा खर्च हा २४०० कोटी आहे.
तर इतर विषयांचे प्रस्ताव ४०० कोटींचे आहे.
पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या शिवभक्तांची नावं होती. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेंव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली, त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले. तेंव्हा शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंती च्या दिवशी शोककळा पसरली..
शॉर्टसर्किटमुळं उडालेल्या आगीच्या ठिणगीनं अचानक रौद्ररूप धारण केलं आणि यात घराची राखरांगोळी झाली. या आगीत धान विकून आणलेली ४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरातील संपूर्ण जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झालं. यासोबतचं ४ तोडे सोनेही या आगीच्या भक्षस्थानी आल्यानं ते वितळल्याची घटना भंडार्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा - कोसरा इथं रात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाच्या पथकांनं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात पुष्पराज हटवार यांचं २५ लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात 10वी आणि12 वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकारांबाबत दोषी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत २२ जणांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद वाशिम मंगल धुपे-यांनी दिली आहे.
कॉपी प्रकरणी शिक्षण आयुक्त यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दूरध्वनीद्वारे परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. कॉपी प्रकरणी पत्राद्वारेही संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या ५१ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांना कळविण्यात आले होते.
त्यापैकी . मैनागिरी महाराज विद्यालय जुमडा येथील 10 अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर
तसेच 7 स्वयंअर्थसहायित तत्वावरील शिक्षकांना संस्थेकडून निलंबित करण्यात आलेय. तर मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मांगवाडी अंतर्गत माऊली विद्यालय, मोहजा येथील ५ स्वयंअर्थसहायित शाळेतील शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ५१ गुन्हे नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २२ कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले असून उर्वरित प्रकरणांबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे-गायकवाड यांनी दिली आहे...
ND vs ENG, ICC T20 World Cup: 18 चेंडूंत 45 धावा, मग 12 चेंडूंत 39 धावा आणि नंतर 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज, तरीही सामन्यात बाजी मारणार कोण...? हे कळत नव्हतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातला खेळ पाहून टी-ट्वेन्टीचा थरार नेमका कसा असतो? याचं दर्शन घडलं. त्यातही भारतानं बाजी मारली आणि अवघ्या भारतात आनंदोत्सव सुरू झाला.
जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला आता ७ वर्षांची कैद
तर ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होणार
धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या नव्या कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या नव्या प्रस्तावाला मंजुरी
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू... चंद्रपूर शहराजवळील लोहारा-जुनोना मार्गावरील आज संध्याकाळची घटना, मृतक बिबट हा नर असून अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये झाला मृत्यू, वन विभागाला याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल, बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत वनविभागाने सुरू केलाय पंचनामा
मिरा-भाईंदरमधील उड्डाण पुलाच्या डिझाईन वरुन जगभर ट्रोल होत असताना, आता सार्वजनिक शौचालयाच्या एका डिझाईनवरुन सोशल मिडियात मिरा भाईंदर ट्रोल होत आहे. उड्डाणपूलाची डिझाईन एमएमआरडीएन बनवली होती तर या शौचालयाची डिझाईन आणि बांधकाम ही एमएमआरडीए ने बनवलं असल्याची माहिती मिळत आहे. २००७ साली हे कमोड बनवले असून, आता ते सोशल मिडीयाद्वारे निदर्शनास आल्याने ते सध्या जास्त ट्रोल होत आहेत.
भाईंदर (पूर्व) येथील आरएनपी पार्क, एस.व्ही. रोड परिसरात एक सार्वजनिक शौचालय एमएमआरडीने २००७ साली निर्मल भारत अभियान योजनेद्वारे बनवल्याची माहिती मिरा भाईंदरचे अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे. माञ या शौचालयात बसविण्यात आलेले चार स्टेनलेस स्टीलचे कमोड एकमेकांच्या जवळ असून, प्रत्येक युनिटसाठी स्वतंत्र दरवाजा किंवा पूर्ण पार्टिशनची स्पष्ट व्यवस्था दिसत नाही. पालिकेने उघड्यावर बसणा-या लहान मुलांसाठी ही व्यवस्था केल्याच सांगितले असलं तरी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः लहान मुलांसाठी असलेल्या शौचालयात गोपनीयता ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. अशा सुविधांमध्ये सुरक्षितता, स्वच्छता आणि वैयक्तिक गोपनीयता या मूलभूत निकषांचे पालन होणं आवश्यक असल्याच मत व्यक्त केलं जातं आहे.
- नाशिक जिल्हा परिषदेने बनवला यंदाचा साडेसात कोटींचा पाणीटंचाई आराखडा...
- नाशिकच्या चांदवड, बागलाण, देवळा, मालेगाव, नांदगाव त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी कळवण, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई...
- जिल्हा परिषदेच्या आराखड्यात ४२३ गावं तर,६५२ वाड्यावर असताना भासणार टँकरची आवश्यकता...
- मार्च एप्रिलच्या दरम्यान अधिक पाणीटंचाई भासल्यास खाजगी विहीर अधिग्रहण आणि टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा...
- नाशिक जिल्हा परिषदेकडून संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी १६२ टँकरने केला जाणार पाणीपुरवठा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे अमरावती येथील हनुमान गढी परिसर पर्यटन विकासाबाबत व कल्याणेश्वर मंदिर महाल, नागपूर येथील प्रस्तावित विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक संपन्न झाली. अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. यावेळी या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी ₹121 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावीत. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
विकास आराखड्याची वैशिष्ट्ये:
हनुमान गढीचा विकास 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर होणार असून त्यात खालील सुविधा असतील:
✅अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडप
✅ॲम्फीथिएटर, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर आणि आखाडा
✅महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह आणि हनुमान गॅलरी
✅दिव्यांग स्नेही रस्ते आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण)
✅मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत आणि लेझर शो
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
तेलंगणाचे राज्यपाल म्हणून वर्मा यांनी काम केले आहे
वर्मा यांच्या ठिकाणी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्लांची नियुक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केली घोषणा
देशातल्या एकूण ९ राज्यांचे राज्यपाल नियुक्तीचे राष्ट्रपतींचे आदेश
राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस यांचा राजीनामा ही स्वीकारला
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी