Maharashtra Live Blog Updates: राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार; आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन दलित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या मांडला. यावेळी रोहित पवार, सुजात आंबेडकरांनी या मुलींची भेट घेतली. सदर...More
राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश भूषण गवई आणि के. विनोद यांच्यासमोर सुनावणी झाली
त्यावर सरन्यायाधीशांनी, “ उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?”, असा प्रश्न विचारला
त्यावर उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याचे सुचवले
याचिकाकर्त्यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतली आहे
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात सहा ऑगस्टला होणार भेट.
बच्चू कडूंच्या आगामी आंदोलना संदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात भेट....
सूत्रांची माहिती...
या आधीही बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी दिला आहे पाठिंबा....
सहा तारखेला राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात होणाऱ्य भेटीकडे सर्वांचं लक्ष..
धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांचा दे धक्का!
परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार
शरद पवारांची साथ सोडत माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच घड्याळ हाती घेणार
लवकरच मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल मोटे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती
धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा , राहुल मोटेनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेत निर्णय घेतल्याची माहिती
परंडा मतदारसंघातून राहुल मोटेनी पाच वेळा लढवली विधानसभेची निवडणूक, सलग तीन वेळा राहिलेत आमदार
मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंताकडून दीड हजारांच्या फरकाने मोटेंचा झाला होता निसटता पराभव
धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा संपला
राज ठाकरे यांच्याकडून कानमंत्र आज च्या मेळाव्यात पदाधिकारी यांना देण्यात आला आहे
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा - सूत्रांची माहिती असे आदेश राज ठाकरे यान आय दिला आहे
योग्य वेळी योग्य सुचना दिल्या जातील - राज ठाकरे यांचे वक्तव्य
वीस वर्षानंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? कुठलाही वाद कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये न ठेवता निवडणुकीच्या तयारीला लागा- राज ठाकरे यांचे वक्तव्य
मतदार यादी तपासून घ्या, जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या
मतदार यादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मेळाव्यात फक्त पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश
प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे नावासहीत पद असणारा स्कॅनर
पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही मेळावा असणाऱ्या सभागृहात येऊ नये म्हणून मनसेच पाऊल
मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणात काय मुद्दे असणार याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष
दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. चौथ्या दिवशी यवत गाव बंद आहे. आज जमावबंदी संदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून दोन जणांवर अटकेची कारवाई करीत असल्याचं देखील बिरादार म्हणाले. जोपर्यंत इथली परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस बंद बंदोबस्त तैनात ठेवणार असल्याचा देखील ते म्हणाले. तसेच आरोपींना पकडण्यासाठी विविध पथकं रवाना केली आहेत. त्यामुळे ज्यांना नोटीस पाठवली आहे त्यांनी पोलीस पोलीस स्टेशनला हजर राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेला आहे.
यवतमाळ नेर तालुक्यातील लोहतवाडी येथे एका शेतकऱ्याचा शेतातील मोटरचे वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने मृत्यू झाला. रवींद्र महादेव चौधरी असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नेरच्या एमएसईबीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज अवेळी सुरू होते व अवेळी बंद होते। यामुळे संबंधित वीज वितरण विभागा कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. शेतात ओलीत करण्याकरिता गेले असताना विद्युत प्रवाह बंद होता यामुळे ते वायर दुरुस्त करत होते दरम्यान अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला व विद्युत करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध असंतोष पसरला आहे। मृतक शेतकऱ्यांकडे तीन एकर ओलिताची शेती आहे. मृतक रवींद्र चौधरी यांच्या मागे वयोवृद्ध आई पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे
बीड : बीड जिल्ह्यात 8 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलिस कायदा 37 (1) (3) कलम 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहे. या दरम्यान, कोणताही मोर्चा, सभा, मिरवणुका आणि तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाही, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिले आहेत.
नागपूर-मुंबई असा 701 किलोमीटरचा जागतिक दर्जाचा दृत गती असलेला समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार झाला असून या मार्गाने आता नागपूर ते मुंबई आठ तासात गाठता येत आहे. मात्र समृद्धी महामार्गावर वेगाच्या नियमांचे उल्लंघन अनेक वाहने करताना आढळून येत असल्याने आता या संपूर्ण सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर एक सीसीटीव्ही कॅमेरा व स्पीड सेंसर गन लावण्यात येणार आहे. त्यामुळे वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांना तात्काळ दंडाची पावती मोबाईलवर मिळणार आहे. समृद्धी महामार्गावर हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास तर ट्रक आणि अवजड वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रतितास अशी वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र अनेक वाहने वेग मर्यादेसह लेन कटिंग चे उल्लंघन करताना दिसत आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर जवळपास 1000 कॅमेरे बसविण्याचा निर्णय एमएसआरडीसी ने घेतला आहे. याकरिता एमएसआरडीसी ने दोन नामांकित कंपन्यांसोबत करार केल्याची ही माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पनवेल मधील डान्स बार तोडफोड प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये हजर
पहाटे ५ वाजता ८ जण पोलीस स्टेशन मध्ये हजर
शनिवारी रात्री पनवेल मधील नाईट रायडर डान्स बार वर मनसे कार्यकर्त्यांनी केली होती दगडफेक
दगडफेक प्रकरणी ८ जणांवर पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आला होता गुन्हा दाखल
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आणि खासदारांवर आता पक्षाकडून दिली जाणार महत्वाची जबाबदारी
शिवसेनेचा राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांवर ही राहणार विशेष जबाबदारी
देशातील सर्व राज्यातील राज्यप्रमुख यांच्यासोबत खासदारांकडे काही राज्यांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे
पक्षाच्या विस्तार करण्याच्या अनुशंगाने राज्यप्रमुख आणि खासदार यांनी बैठका व पक्षाची बांधणी त्या त्या राज्यात करायची आहे
या सर्व राज्यप्रमुख आणि खासदारांना ज्येष्ठ नेत्यांनी कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करायचे आहेत
ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन किर्तीकर, निलम गोर्हे यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांना या राज्यप्रमुख आणि खासदार यांना त्या त्या राज्यांचे दौरे करून पक्ष वाढीबाबत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळते
प्रेम प्रकरणातून बुलढाण्यातील चिखली रोडवरील ग्रीन लीप हॉटेल जवळ 19 वर्षीय सनी सुरेश जाधव या युवकाची दिवसाढवळ्या निर्घृणपणे चाकूने वार करत हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या चारही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याच पोलीसांनी सांगितलं आहे.
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील सुनावणीत वाल्मीक कराडच्या दोष मुक्ती अर्जावर न्यायालयाने निर्णय देत अर्ज फेटाळला मात्र इतर आरोपींच्या वकिलांमार्फत दोष मुक्तीचे अर्ज करण्यात आले. यावर न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे. तर वाल्मीक कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वकिलांकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. तसेच जी बँक खाते गोठविण्यात आली त्यावरील निर्बंध उठविले जावे असा विनंती अर्ज करण्यात आला असून आज या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे अद्याप सरकारी बंगल्यातच
मंत्रिपद जाऊन साडे चार महिने झाले तरी मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडलेला नाही
बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड
सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत
मंत्रिपदावरून पाय उतार झाल्यानंतर १५ दिवसांत सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम
उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर, सात ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन शेंदूर मतदार याद्यातील झालेला घोळ या सगळ्यावर विरोधकांनी सरकारला घेतले असताना याच दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून इंडिया आघाडीची पुढील रणनीती यामध्ये ठरवले जाणार
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली असून उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे
सात ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी झालेली ऑनलाइन इंडिया आघाडीची बैठक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकांशिवाय मध्ये कुठलीही बैठक आघाडीची झालेली नाही...
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. कारण मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज पार पडणार आहे, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात कोथरूड पोलिसांकडून शिविगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार; आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा