Maharashtra Live Updates:राज्यभरात पावसाचा कहर! बळिराजांचे स्वप्न भंगलं, हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि घटनांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाची स्थिती काय, जाणून घ्या.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर. राज्यात मान्सून दाखल झाला असून सर्वदूर पसरला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. नागपूर...More
14 दिवसाच्या पावसानं शेतीची अर्थकारण बिघडवलय... या पावसाचा परिणाम वर्तमानात तर झालाच आहे आणि भविष्यात ही होणार आहे.. शेतमजूर शेतकरी गुरे ढोरे 14 दिवसापासून घरीच.. शेतीच्या अर्थकारण बिघडवणारा पाऊस..ड्रोन कॅमेरा तली दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी
(कांदे टरबूज आंबे कोथिंबीर पाण्यात गेलेला ऊस.. याचेही फुटेज जोडले आहेत)
कांद्यात पाणी... टमाट्यात पाणी ..कोथिंबीर मध्ये पाणी... पाण्यात ऊस सडलाय.. ज्वारी काळी पडली... शेतात फक्त चिखल आणि पाणी... मान्सून पूर्व पावसाने वर्तमानात स्थिती तर वाईटच केली आहे त्याचबरोबर ऐन पेरणीच्या तोंडावर भविष्यातल्या हंगामावर ही परिणाम केलाय... मशागतीची काम करण्याच्या दिवसातच सातत्याने सुरू असलेल्या पावसाने मशागतीची काम पूर्ण होऊ दिली नाहीत.. शेतातल्या आहे त्या पिकांना फटका बसतोय... शेतमजुराच्या हाताला काम नाही... शेतातील कडव्याच्या गंजी भिजल्याने चारा नाही... जनावरे बाहेर घेऊन जाण्यासाठी स्थिती नाही... अशा चहू बाजूच्या माऱ्याने सर्वसामान्य शेतकरी हैराण झालाय... मागील 14 दिवसापासून लातूर जिल्ह्यात मान्सन पूर्व पाऊस दररोज हजेरी लावतोय... तुफान बरसणाऱ्या या पावसाने स्थिती बिकट केली आह..लातूर जिल्ह्यातील महापूर येथील शेतकऱ्यांनी त्यांची कैफियत मांडली आहे..
हर्षवर्धन सपकाळ
–राहुल गांधी यांनी सावरकरांना कुठली शिवीगाळ केली नाही
-ऐतिहासिक तथ्य आहे आणि सत्य आहे ते राहुल गांधी बोलले
–ध चा मा कसा करावा हे फडणवीस आडनाव असल्यामुळे ते पण त्यांना चांगलं माहित आहे
Ankar - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या काँग्रेसने राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येथील तेव्हा त्यांच्या तोंडाला काळे फसू असं वक्तव्य शिवसेना उभाटा गटाची उपमा नगरप्रमुख बाळा दराडे यांनी केले होते त्याला प्रत्युत्तरित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले राहुल गांधी यांना हात लावायला कोणता मायका लाल पैदा झाला नाही असं उत्तरच शिवसेना उपमानगर प्रमुख बाळा दराडे ला सपकाळे यांनी दिले अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अरुण शवरी नावाची एक मंत्री होते ते त्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये होते जे राहुल गांधी बोलले तेच त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रकाशित केलं तर जगामध्ये त्या पुस्तकाला खूप मागणी आहे असे हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
Bayet– हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
अँकर
माण तालुक्यातील दहिवडी सह म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून वरुणराजा भलताच बरसला असून
गत 5 दिवसांपासुन मान्सुनपुर्व पावसाने माण तालुक्यात सलग संतत धार असून जीवनमान विस्कळीत झाले आहे. तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढल्याने व माण गंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरुन वाहु लागली आहे,
उन्हाळी अवर्तनाच्या जिहे कठापूर च्या पाण्याची वरुण राजाला साथ लाभल्याने मे महिन्यात आणि माणगंगा नदीला पूर... ही इतिहासातील पहिली च घटना आहे . उन्हाळी अवर्तनाचे जिहे कठापूर योजनेचे पाणी माण गंगेत सोडले होते. त्यास भरीस भर म्हणून वरुण राजा ही यथेच्छ बरसला. परिणामी आता ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
यंदा उन्हाळी आवर्तनाचे जिहे-कठापूर योजनेचे पाणी माणगंगा नदीत सोडले होते. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस तलाव सिंचन क्षेत्रात जोरदार बरसला. त्यामुळे मे च्या सुरुवातीला या तलावात १० फूट पाणी पातळी होती. हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी २५ फूट पाणीसाठा होणे गरजेचे असते. माणगंगा दुथडी भरुन वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
- 26 जून ते 16 जुलै या काळात वारी
- विभागीय आयुक्त, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि मार्गातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त
- राज्याच्या पोलिस महासंचालक, तसेच विविध पालखी सोहळ्याचे प्रमुख, दिंडी प्रमुख बैठकीला उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
- शेकडो वर्षांची परंपरा पण दरवेळी नवीन काहीतरी शिकायला मिळते. त्यामुळे आपण दरवर्षी बैठक घेतो.
- पुणे येथे वारी येईल, तेव्हा वारकऱ्यांचा वेळ जाणार नाही, या दृष्टीने स्वागत करा. त्यांच्या मार्गात अडसर निर्माण होणार नाही, अशी रचना करा
- अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घ्यावी आणि आंतरजिल्हा नियोजन समन्वयाने करावे. योग्य पोलिस बंदोबस्त आणि रुग्णवाहिका मिळेल, हे सुनिश्चित करा.
- पिण्याचे पाण्याचे टँकर, फिरते शौचालय याची सोबत व्यवस्था हवी, आपली हद्द संपली असा विचार करू नका. पुढची टीम आल्याशिवाय पहिल्या टीमने रवाना होऊ नये
- वाकरी येथे मॉडेल तळ तयार करण्याचा आराखडा तयार करा.
- रिंगण जेथे होते, तेथे बंदोबस्त चोख ठेवा.
- समूहविमा सुरूच राहील.
- निर्मल वारी, हरित वारी अभियान अधिक ताकदीने राबवा.
कारण तीच आपल्या वारकरी संतांनी दिलेली शिकवण आहे.
- 36 वॉटरप्रुफ मंडप यावेळी असणार आहेत.
- प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांचे स्नानगृह असणार
अँकर - सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे,यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.खानापूर तालुक्यातल्या येरळा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे.खानापूर तालुक्यातील वाझर येथे असणाऱ्या येरळा नदीवरील बंधाऱ्यावर सध्या पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. वाझर बंधारा पूर्ण भरून गेला आहे,मात्र दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची फुग वाढत होती,संभाव्य धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याचे अर्धवट दरवाजे थेट जेसीबीच्या सहाय्याने उघडण्यात आले.
बंधाऱ्यावर जेसीबी नेऊन पाण्याचा प्रचंड वेग असताना या ठिकाणी बंद असलेले दरवाजे उघडण्यात आले,त्यामुळे बंधाऱ्यातून अधिक वेगाने पाणी प्रवाहित झाले.
मुंबईत दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात,
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
नवी मुंबईत पावसाला सुरुवात
सोसाट्याचा वाऱ्यासह नवी मुंबईत पावसाला सुरुवात.
काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबईत पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
यवतमाळ जिल्ह्यात मानसून पूर्व पावसामुळे तीळ पिकाचे मोठे नुकसान झाले. मान्सून अगोदर आल्याने शेतकऱ्यांनि उन्हाळी पीक असलेले तीळ पीक काढणी करून गंजीला ठेवले होते. मात्र, पावसामुळे हे पीक जागेवरच खराब होऊन काळे पडले आहे. उन्हाळी पिकातून शेतकरी हे खरीपाचे नियोजन करीत असतात. मात्र मान्सून पूर्व पावसाने हातात आलेले पीक गेले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा गावातील सुरेश कुकडे या शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून 1 लाख रुपयाचे नुकसान या पावसात शेतकऱ्याचे झाले आहे. शासनाने मदत शेतकऱ्यांना द्यावी ही विनंती शेतकऱ्याने केली आहे.
बीड जिल्ह्यातील 140 गावातील शेतकऱ्यांचे जायकवाडीचे पाणी शेतीला मिळावे.. यासाठी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने महायुतीच्या जाहिरनाम्याची होळी करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विमानतळ नको, पाणी द्या... असा टाहो फोडला...
Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. तरीही पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी पातळी ही २० फूट ३ इंचावर पोहचली असून घाट परिसरातील मंदिरे ही पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, राजाराम, इचलकरंजी, रुई सह 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाले असून पर्यायी मार्गाने सुरू आहे दरम्यान राधानगरी धरण हे 50 टक्के भरले आहे.
Maharashtra Weather Update: उन्हाळी कोथिंबीर शेतकऱ्याला आर्थिक फायदा करून देणारी असते. मात्र गेली दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनावरती अक्षरशा: पाणी फिरवले आहे. जास्त आणि सलग सुरू असलेल्या पावसामुळे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोथिंबिरीचा चिखल होण्यास सुरुवात झालीय. शिल्लक कोथिंबीर देखील पदरात पडेल का नाही? याची खात्री नसताना त्यासाठी देखील शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. सध्या खुरपणीची काम सुरू आहेत. पुढील एक-दोन दिवस पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केलीय.
हगवणे भावांच्या अडचणीत वाढ, पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू
पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू
परवाना घेत असताना हगवणे ने पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर
पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला?
चौकशी झाल्यानंतर बेकायदा काही समोर आल्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार
राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरात आहेत. हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे
मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच नीलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. याप्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे
दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले
एकाच घरातील शशांक व सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली, ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला, असे प्रश्न उपस्थित झाले होते
हगवणे भावांच्या अडचणीत वाढ, पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू
पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू
परवाना घेत असताना हगवणे ने पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर
पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला?
चौकशी झाल्यानंतर बेकायदा काही समोर आल्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार
राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरात आहेत. हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे
मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच नीलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. याप्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे
दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले
एकाच घरातील शशांक व सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली, ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला, असे प्रश्न उपस्थित झाले होते
महाराष्ट्रात 24 तारखेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये आतापर्यंत एकूण 21 जणांचा मृत्यू तर बारा जण जखमी
मुख्यत्वे करून पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू
पुण्यामध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू-
एक झाड पडून, एक भिंत पडून, एक वीज कोसळून
जालना -२
पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू
अहिल्यानगर २
भिंत पडून मृत्यू
मुंबई शहर- १
झाड पडून मृत्यू
मुंबई उपनगर -१
झाड पडून मृत्यू
नागपूर - १
वीज पडून मृत्यू
नांदेड - ३
पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू
वर्धा - १
वीज पडून मृत्यू
चंद्रपूर - १
वीज पडून मृत्यू
भंडारा -२
वीज पडून मृत्यू
बीड -१
पाण्यात बुडून मृत्यू
यवतमाळ - १
पाण्यात बुडून मृत्यू
गोंदिया -१
( मृत्यूचे कारण अस्पष्ट)
रायगड - १
( मृत्यूचे कारण अस्पष्ट )
याशिवाय प्राण्यांचा पण या पावसामध्ये मृत्यू झाला आहे एकूण 22 प्राण्यांचा यामध्ये मृत्यू झाला असून २ जखमींची नोंद आहे
तर 12 मनुष्य हे या पावसाळ्या दरम्यान जखमी झाले आहेत
Beed News: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सहा जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागाने सादर केला. यामध्ये आयशर टेम्पोचा वेग 100 किलोमीटर वेगाने होता.. या टेम्पोची पाहणी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली..
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर पाणी साचते... त्यामुळे कार देखील दुभाजकावर धडकली होती.. याच कारला बाजूला काढण्यासाठी सहा तरुण गेले होते.. आणि याच वेळी या आयशर टेम्पोने सहा जणांना भरधाव वेगाने चिरडले, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला..
महामार्गावर टेम्पोला ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे. मात्र पुलावर उतार असल्याने टेम्पोची स्पीड शंभरची होती.. उतारावर पाणी साचल्याने टेम्पो चालकाला टेम्पो नियंत्रणात आणता आला नाही.. पावसामुळे दृश्यमानता कमी होती आणि यातच टेम्पो चालकाने या सहा जणांना धडक दिली.. असे म्हणणे आरटीओ अधिकाऱ्यांनी मांडले आहे
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला बसला मोठा फटका
बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील खजूर बागेचे पावसाने केले नुकसान
अडीच एकर बागेतील साधारण 200 खजूराच्या झाडावर पावसाचा झाला परिणाम
ऐन काढणीला आलेला खजूर पिकाचा दर्जा मुसळधार पावसामुळे ढसाळला
वादळी वारा आणि तुफान पावसामुळे खजूरची फळ झाडांपासून तुटून पडली
कमी पाण्यात येणार पिक म्हणून खजूर पिकाची आहे ख्याती, मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पावसाने खजूराचे भाव आले अर्ध्यावर
मागच्या दोन वर्षात निसर्गचक्र बदलल्यामुळे प्रत्येक वर्षी खजूर उत्पादक शेतकऱ्याला याचा बसत आहे फटका
त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Pune : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज पोलीस मदत केंद्रापासून काही अंतरावरच सर्विस रस्त्याच्या पुलाखाली एका अज्ञात 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय. इंदापूर पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत..
रायगड जिल्ह्यात तालुक्यानुसार मिलिमीटर मध्ये झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
अलिबाग - 23.00
मुरुड- 9.00
पेण - 7.00
पनवेल - 0.2
उरण - 00
कर्जत - 5.00
खालापूर - 4.00
माथेरान - 2.00
सुधागड - 29.00
माणगाव - 6.00
तळा - 8.00
महाड - 2.00
पोलादपूर - 2.00
श्रीवर्धन - 16.00
म्हसळा - 4.00
रोहा - 4.00
एकूण पाऊस - 121.2
आज झालेला एकूण सरासरी पाऊस 7.58 mm
Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मच्छीमारांना देखील समुद्रात जाऊन नये असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 102 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दोडामार्ग 11, मालवण 29, कुडाळ 16, कणकवली 25, सावंतवाडी 16 आणि देवगड 70 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 27 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यातील काही भागात दाखल झालेला मान्सून नसून वाळिवाचा पाऊस?
मोसमी वारे दक्षिण मुंबईपर्यंत दाखल मात्र अद्यापही राज्यातील काही भागात मान्सूनचा पाऊस नाही, तज्ज्ञांचा आक्षेप
मान्सूनपूर्वीच्या तीव्र वादळी ढगांमुळे राज्यातील काही भागात पाऊस
मान्सूनमध्ये वाऱ्यांची दिशा ही दक्षिण-पश्चिम, मात्र मुंबई आणि पुण्यातील सध्या वाऱ्यांची दिशा ही उत्तर-पश्चिम
२८ मे नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अखाती देशांकडून कोरडे वारे वाहणार असल्याचं स्पष्ट
हे कोरडे वारे वाहत असताना मोसमी वारे केरळमधून पुढे सरकत असताना वादळी ढग तयार होतात आणि कोरडी हवा मागे ढकलत जातात
अशात, २८ मे नंतर महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात मोठे बदल दिसतील
३० मे नंतर राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असणार
मान्सूनने मोठा पाऊस ५ जूनपर्यंत महाराष्ट्रात पडणार नाही
सोबतच, तापमानात देखील वाढ होणार असल्याचं देवरस यांचे निरीक्षण
कोरडी हवा मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक लावणार आणि तो नाॅर्मल टाइम टेबल मान्सूनचा आहे, त्या दृष्टीनं वाटचाल करणार
Nanded: नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस बरसतोय, या पावसाने उन्हाळी ज्वारी आडवी पडून तिला अंकुर फुटले आहेत. मुदखेड तालुक्यातील मेंढका इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली होती. मात्र ऐन ज्वारी कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने ज्वारीचे मोठे नुकसान झालेय
हातकणंगले तालुक्यातील इंगळी या ठिकाणी रस्ता खचला, सहा घरांना धोका
इंगळी गावातील पाच मोट विहिरीचा भाग कोसळला
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विहिरीची भिंत आणि काहीसा रस्ता खचला
दोन महिन्यांपूर्वी देखील हाच रस्ता खचला होता
परिसरातील नागरिकांची प्रशासनाच्या वतीने तात्पुरती सोय
भंडारा: शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीतूचं निम्म आणि बोगस प्रतीच्या खताची विक्री करण्यात येत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विजय होणे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसात तिघांविरुद्ध भारतीय न्यास संहिता २०२३ कलम ३१८ (४), ३३८, ३४० (२), ३४१ (१), कंपनी अधिनियम २०१३ अन्वये ४४७, ४५० व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पारोदे यांना अटक करण्यात आली आहे. तर गुजरात येथील खत निर्मिती कंपनी आणि नागपूर येथील पुरवठादाराला अटक करण्याकरिता लाखनीचं पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. फार्मडिल इंडिया एलएलपी, भावनगर (गुजरात) या खत उत्पादक कंपनीचे डीसीगनेटेड पार्टनर कौशिक पांड्या आणि नागपूर येथील क्रिसालाईट प्रियांश ऍग्रोचे प्रोपायटर राजेश तराळे यांचा आरोपीत समावेश आहे.
Accident News: येवला - लासलगाव रस्त्यावरील पिंपरी फाटा येथे पहाटेच्या सुमारास पोल्ट्री व्यवसायासाठी लागणारे पक्षी घेऊन जाणारा आयशर आणि मालवाहू पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तत्काळ मदत केली.जखमींना शासकीय रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, येवला येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत..
मुंबई, पुण्यासह ठाणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले महापालिका निवडणुकीबाबत संकेत
विश्वसनीय सूत्रांची माहिती
शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा
Rain News Update : पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील हाणामारीचा व्हिडीओ व्ह्यायरल
नाशिक मुंबई महामार्गच्या सर्व्हिस रोडवर दोघांकडून जोडप्याला मारहाण
मागील भांडणाची कुरापत काढून झाली मारहाण
लाकडी दंडक्याने मारहाण करत जीवे मारम्याचा प्रयत्न
नागरिकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही दमदाटी करून बाजूला केले*
दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल
हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
रोहित गोरडे, मयुरी गोरडे हे इंदिरानगर जवळील एका हॉटेल मध्ये गेले असताना त्यांनी दीपक कपिले आणि दिगंम्बर आंधळे याना बोलवून घेतले त्यानंतर1 वादातून झाली हाणामारी
नांदेडमध्ये मे महिन्यातच पडत असलेल्या पावसाने ओढे नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. जिल्ह्यातील मुखेड, नायगांव आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे असंख्य ओढ्याला पूर आलेले आहेत. याच दरम्यान काल हदगाव तालुक्यातील वरवट गावात तिघीजण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झालाय. ओढ्या-नाल्याला पूर आल्यास सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
दक्षिण मुंबईतील नागपाडा, मुंबई सेंट्रल, भायखळा, नूरबाग, डोंगरी, काळाचौकी, चिंचपोकळी या भागात बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 या कालावधीत ए, बी, ई आणि एफ दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद राहील.
नागपूर कोरोना अपडेट. नागपूर सध्या कोरोनाचे दोन ऍक्टिव्ह रुग्ण आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. मे महिन्यात नागपूर कोरोनाचे 5 रुग्ण आढळले होते. ते बरे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पुणेकरांसाठी आणि महत्वाचं म्हणजे वीकेंड प्लान करणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी २९ मेला सिंहगड किल्ला बंद राहणार. पावसाळा सूरू झाला की हजारोंच्या संख्येने ट्रेकर्स आणि पर्यटक सिंहगड किल्यावर येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने एक दिवस पाहणी दौरा आखला आहे
राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ मे गुरुवारला आपत्ती निवारण शासकिय दौरा होणार आहे. त्यासाठी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रेकिंगला येणाऱ्यांना बंदी आणि कल्याण दरवाजा , अतकरवाडी तसंच पायी प्रवेश करायला बंदी घातली आहे
मुंबईतल्या पहिल्या पावसानंतर ज्या प्रकारे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं... मुंबईची तुंबई पुन्हा एकदा पाहायला मिळाली त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहायला मिळाल्या... भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेवर आणि आदित्य ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता ठाकरेंचे शिवसेनेकडून सुद्धा वांद्रे परिसरात आशिष शेलार यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत... "मुंबईकरांनी सत्तेचा दार उघडून दिलं नव्हतं तुम्ही लाथाडून आत शिरलात, आणि आता? पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचे तोंड माईक मध्ये" असे लिहिलेले पोस्टर्स बांद्रामध्ये विविध ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी लावत आशिष शेलार त्यांच्यावर टीका केली आहे
नाफेड तूर खरेदी केंद्रावर गैर सोय तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड हाल. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात शेलुबाजार येथील नाफेड केंद्रावर काही शेतकऱ्यांनी तूर विक्री साठी आणली होती. मात्र, खराब हवामान आणि जोरदार पावसामुळे तूर खरेदी होऊ शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन केंद्रावरच मुक्काम करावा लागला रात्री पडलेल्या जोरदार पावसा मुळे शेतमाल भिजण्याची भीती मूळे शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली मात्र, खरेदी एजन्सीकडून माल सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना रात्रभर थांबण्याकरिता कोणतीही सोय करण्यात आलेली नाही.
पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.
नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खान याचा जमीन नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. फहीम खानवर असले आरोप व पोलिसांचा सुरु असलेला तपासाची स्थिती बघता न्यायालयाने जमीन द्यायला नकार दिला. 17 मार्चला नागपूर मध्ये हिंसाचार घडलं व 18 मार्चला फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. सध्या फहीम खान हा नागपूर कारागृहात आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates:राज्यभरात पावसाचा कहर! बळिराजांचे स्वप्न भंगलं, हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला