Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: पीओपीच्या गणेश मूर्तीवरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला सवाल. पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले असताना तुमची भूमिका...More
पिंपरी येथील गजबजलेल्या मार्केट परिसरातील चॉईस व्हरायटी दुकानात तीन अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत दुकानदार आणि ग्राहकाला बाहेर काढले. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे 70 हजार रुपयांची रोकड लंपास करून आरोपी पसार झाले. ही संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. त्याआधारे पिंपरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत दरोड्यातील तिन्ही आरोपी विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात बाल न्यायप्रणाली कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील एक तासांपासून शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांची बैठक सुरू
बैठकीत मंत्र्यांचे OSD पासून खाजगी सचिव यांना फुटला घाम
मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जात असल्यामुळे ओएसडी सकट खाजगी सचिव यांची धावपळ
महत्त्वाचं म्हणजे बैठकीत शिक्षण खातं शिंदे यांच्या केंद्रस्थानी
बैठकीच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाचा घेतला आढावा
दादा भुसे यांचे सर्व OSDआणि खाजगी सचिव या बैठकीला आहेत उपस्थित
शिक्षण व्यवस्थेबाबत देशात चाललेली परिस्थिती त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्याकडून शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आढावा
- शहरातील नाशिक रोड परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजविणाऱ्यांची पोलिसांनी काढली दिंड
- वर्चस्ववादातून नाशिक रोड परिसरात असलेल्या फर्नांडिसवाडी सुंदर नगर भागात हातात कोयते घेऊन माजवली होती दहशत
- हातात कोयते घेत गाड्यांची केली होती तोडफोड तोडफोड करणाऱ्या या टोळीची पोलिसांनी काढली धिंड
- तोडफोड करत दहशत माजवीत असल्याचा देखील व्हिडिओ झाला होता सोशल मीडियावर व्हायरल
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2026-27 अंतर्गत आज वाशिम येथे 17 वर्षांखालील मुलींचे सामने खेळविण्यात येत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे फुटबॉल मैदान पूर्णपणे चिखलमय झाले असून मैदानावर चिखल असून, खेळाडूंना फुटबॉल चेंडूवर नियंत्रण ठेवणे खेळ करणे कठीण होतय. मैदानाची योग्य देखभाल न झाल्याने खेळाडूंना दुखापतीचा धोका निर्माण झाला असून, अशा परिस्थितीतही वाशिम जिल्हा क्रीडा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसह स्पर्धेच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मैदान तातडीने खेळण्यायोग्य करण्याची मागणी खेळाडू आणि पालकांकडून केली जात आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात रत्नागिरी जिल्ह्यातील 265-चिपळूण विधानसभा मतदार संघाने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मतदार यादी पुनरिक्षणाचे 100 टक्के काम पूर्ण करणारा राज्यातील हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. 336 मतदान केंद्रांवरील सुमारे 2 लाख 71 हजार मतदारांच्या नोंदींचे यशस्वी पुनरिक्षण पूर्ण झाले असून, आता 8 ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
संसदीय समितीकडून सोशल मीडिया कंपन्यांना समन्स जारी
संसदीय समितीने Meta, X, Snapchat आणि Google यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे
संसदेच्या आयटी विषयक स्थायी समितीची बैठक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या बैठकीत या कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे.
बैठकीत मुख्यतः सामान्य लोकांच्या गोपनीयता सुरक्षेबाबत चर्चा होणार आहे
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर गावाजवळ प्लायवुडची वाहतूक करणारा ट्रक मध्यरात्रीच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात सहवाहन चालक गंभीर जखमी झाला असून ट्रकमधील लाखो रुपयांच्या प्लायवुडचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक कानपूरहून मुंबईच्या दिशेने प्लायवुड घेऊन जात होता. दरम्यान, सोनगीर गावाजवळ सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने गंभीर आरोप करत सांगितले की, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असतानाही संबंधित ठेकेदाराने वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले रिफ्लेक्टर, बॅरिकेडिंग किंवा इशारा फलक लावले नव्हते. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा दावा चालकाने केला आहे.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदत करत जखमी सहवाहन चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सोनगीर परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि इतर सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे....
भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला इशारा
सतत अशाप्रकारे अवहेलना होत असेल तर आम्ही पुढच्यावेळी एकट्याने जाण्याचा विचार करू, तसे मी लेखी स्वरूपात पक्ष श्रेष्ठी यांना कळवणार,
महायुतीत एकत्र आहोत मग युती धर्म का पाळला जात नाही ? विकास कामांच्या बाबतीत शिवसेनेकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, स्थानिक भाजप आमदार, उपमहापौर, नगरसेवक यांना निमंत्रण का दिले नाही? कृष्णा पाटील यांचा सवाल
रविवारी तीन हात नका इथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार, उपमहापौर, नगरसेवक यांना निमंत्रण दिले नसल्याने हे कार्यक्रम पुन्हा घ्या, असे कृष्णा पाटील यांनी दिले पालिका प्रशासनाला पत्र
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी ED च्या बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष PMLA न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिले आहे.कुंद्रा यांचा दावा केला आहे की BNSS कलम 223(1) अंतर्गत संज्ञान घेण्यापूर्वी त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही.ED चा आरोपांचा आहे की GainBitcoin घोटाळ्याशी संबंधित २८५ बिटकॉइन (सुमारे ₹१५०.४७ कोटी) राज कुंद्रा यांना मिळाले होते. या याचिकेवर बॉम्बे हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी ED च्या बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष PMLA न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिले आहे.कुंद्रा यांचा दावा केला आहे की BNSS कलम 223(1) अंतर्गत संज्ञान घेण्यापूर्वी त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही.ED चा आरोपांचा आहे की GainBitcoin घोटाळ्याशी संबंधित २८५ बिटकॉइन (सुमारे ₹१५०.४७ कोटी) राज कुंद्रा यांना मिळाले होते. या याचिकेवर बॉम्बे हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील राखीव उद्यानासाठी असलेल्या ३०५ चौरस मीटर भूखंडाचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सुधार समितीपुढे मंगळवारी विचारासाठी ठेवण्यात येणार आहे.
म्हाडाच्या विनंतीनुसार विकास आराखडा (डीपी) २०३४ मध्ये दुरुस्ती करून हा बदल करण्याचा प्रस्ताव आहे. सिद्धार्थ नगर येथील सर्व्हे क्रमांक ३६३ मधील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, २०१४ मध्ये म्हाडाचा लेआउट मंजूर करताना उद्यानासाठी असलेले आरक्षण शेजारील दोन भूखंडांवरून आर-७ या भूखंडावर हलविण्यात आले होते. त्यावेळी उद्यानासाठी राखीव क्षेत्रफळ ६,३८१ चौरस मीटरवरून ६,६८६ चौरस मीटर इतके झाले आणि अतिरिक्त ३०५ चौरस मीटर क्षेत्र आरक्षणात समाविष्ट झाले.
मात्र, आर-७/ए-५ या भूखंडावर असलेल्या मंदिरामुळे संपूर्ण भूखंडाचा विकास करणे शक्य नसल्याचे म्हाडाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे अतिरिक्त ३०५ चौरस मीटर क्षेत्रावरील उद्यानाचे आरक्षण हटवून ते लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता महापालिकेच्या सुधार समितीत निर्णय होणार आहे.
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील राखीव उद्यानासाठी असलेल्या ३०५ चौरस मीटर भूखंडाचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सुधार समितीपुढे मंगळवारी विचारासाठी ठेवण्यात येणार आहे.
म्हाडाच्या विनंतीनुसार विकास आराखडा (डीपी) २०३४ मध्ये दुरुस्ती करून हा बदल करण्याचा प्रस्ताव आहे. सिद्धार्थ नगर येथील सर्व्हे क्रमांक ३६३ मधील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, २०१४ मध्ये म्हाडाचा लेआउट मंजूर करताना उद्यानासाठी असलेले आरक्षण शेजारील दोन भूखंडांवरून आर-७ या भूखंडावर हलविण्यात आले होते. त्यावेळी उद्यानासाठी राखीव क्षेत्रफळ ६,३८१ चौरस मीटरवरून ६,६८६ चौरस मीटर इतके झाले आणि अतिरिक्त ३०५ चौरस मीटर क्षेत्र आरक्षणात समाविष्ट झाले.
मात्र, आर-७/ए-५ या भूखंडावर असलेल्या मंदिरामुळे संपूर्ण भूखंडाचा विकास करणे शक्य नसल्याचे म्हाडाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे अतिरिक्त ३०५ चौरस मीटर क्षेत्रावरील उद्यानाचे आरक्षण हटवून ते लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता महापालिकेच्या सुधार समितीत निर्णय होणार आहे.
अंधेरीतील सेव्हनहिल्स रुग्णालयाचा प्रस्ताव दोन महिन्यांनंतर पुन्हा सुधार समितीसमोर आणण्यात आला आहे. नव्या भाडेकराराद्वारे कॅप्री ग्लोबलकडून १,५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी ३०० खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
मात्र, याच प्रस्तावावरून पुन्हा राजकारण रंगले आहे. यापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसने महापालिकेची मौल्यवान जमीन खासगी कंपनीला दीर्घ मुदतीसाठी देण्यास विरोध करत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
दुसरीकडे, प्रशासनाचे म्हणणे आहे की एनसीएलटी प्रक्रियेनंतर रखडलेला प्रकल्प मार्गी लागला असून, सेव्हनहिल्सचे पुनरुज्जीवन झाल्यास मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
:नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २७ दिवसांत झालेल्या दमदार पावसाचा मोठा लाभ जायकवाडी धरणाला झाला आहे. अवघ्या २७ दिवसांत धरणात सुमारे २५ टीएमसी पाण्याची भर पडली असून, धरणातील जिवंत पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आज, २८ जुलै रोजी सकाळी धरणात ६१०.८६० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा नोंदविण्यात आला असून, धरणाची पाणी साठवण क्षमता सातत्याने वाढत आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीतील आवक कायम आहे.
जायकवाडी धरणातील सध्याचा पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा, तसेच औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेसा मानला जात आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला जायकवाडीतील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली असून, पुढील काळातही आवक कायम राहिल्यास धरणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरण : १ जुलै ते २८ जुलै
१ जुलै २०२६
जिवंत पाणीसाठा : 130.659 दलघमी (MCM)
पाणीसाठा : 27%
२८ जुलै २०२६
जिवंत पाणीसाठा : 610.860 दलघमी (MCM)
पाणीसाठा : 62%
ठळक मुद्दे :
अवघ्या २७ दिवसांत जायकवाडी धरणात सुमारे २५ टीएमसी पाण्याची भर.
पाणीसाठा २८टक्क्यांवरून थेट ६२ टक्क्यांवर.
नाशिकसह गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा मोठा फायदा.
हा पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर , जालना आणि जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह 300 खेडी ,औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेसा ठरणार आहे.
ट परीक्षेचा निकाल लागताच परळीतील 18 वर्षीय विद्यार्थी घरातून बेपत्ता
अभ्यास चांगला करूनही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी नाराज असल्याची प्राथमिक माहिती
आदित्य राठोड असे घरातून निघून गेलेल्या बेपत्ता मुलाचं नाव आहे.
17 जुलैच्या रात्री घरातून बाहेर पडला असून त्यानंतर अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही
परिवाराने परळीसह नातेवाईक आणि लातूर परिसरात शोध घेतला...मात्र विद्यार्थ्याचा शोध लागला नाही.
वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली
रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाची जोरदार हजेरी
रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाचा येलो अलर्ट
जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन रोहा परिसरात पावसाची दमदार हजेरी
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अधून मधून कोसळत होत्या पावसाच्या सरी
पाण्याविना थांबलेली भात लावणीला पुन्हा येणार वेग
Palghar News: मुसळधार पावसात पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेला डहाणू–बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नरपड-आंबेवाडी आणि चिखले येथील तीन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे डहाणू, घोलवड, बोर्डी तसेच गुजरातच्या उंबरगावकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Washim News: समृद्धी महामार्गावर कारंजा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विश्रांतीसाठी थांबलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवत लुटल्याची घटना काल रात्री 3 वाजेच्या दरम्यान घडली.
प्रशांत युधिष्ठिर रंजन हे मूळचे बेलाड रिटोला (ता. मसोही, जि. पाटणा, बिहार) येथील रहिवासी असून, सध्या यूको बँक, वैकुंठपूर (झोन रायपूर) येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी अर्चना रंजन यांच्यासह स्वतःच्या G J-05, RJ-0407क्रमांकाच्या कारने छत्रपती संभाजीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथन परत प्रवासात 27 जुलै रोजी पहाटे समृद्धी महामार्गावर कारंजा परिसरात पोहोचल्यानंतर थकवा जाणवल्याने त्यांनी वाहन महामार्गाच्या कडेला उभे करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. याचवेळी चार अज्ञात तरुण त्यांच्या कारजवळ आले आणि लुटमार करत 5 ते 6हजार रोख, अंदाजे 3 ते 4 दागिने व अन्य साहित्य असलेली पर्स लंपास केले असून नागपूर इथं पोहचताच पोलिसात तक्रार करत कारंजा शहर पोलिस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आल्या नंतर पोलीस घटनेचा तपास करत आहे.
Satara News: बावधन हे गाव ज्या पद्धतीने बगडासाठी प्रसिद्ध आहे तसेच या गावातील बैल हे देशात प्रसिद्ध आहेत. या गावातील बैल पाहण्यासाठी,खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या गाड्या कोपऱ्यातून लोक येत असतात. बावधन मध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिवसभर बैलांना सजवून संध्याकाळी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिरापर्यंतचा सोहळाही उत्साहात पार पडला मात्र मिरवणुकीनंतर घरी परतताना सूरज उर्फ काका कदम यांच्या ‘बारका सोन्या’ या खिलार जातीच्या बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला.चार वेळा बावधनचे ऐतिहासिक बगाड ओढणाऱ्या या बैलाने ऐन बेंदऱ्यादिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने कदम कुटुंबासह संपूर्ण बावधनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra News: एका बाजूला उजनी धरण 100 गाठत असताना शेतकरी खुशीत आहेत मात्र त्याच वेळेला धरणातून साठ हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात येत असून यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.
सध्या आषाढी यात्रा सोहळ्याची गर्दी अजूनही कमी झाली नसून हजारो भाविक चंद्रभागा स्नानासाठी गर्दी करीत आहेत. एका बाजूला पाणी पातळी वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी ही वाढली असून भाविकांना धोकादायक पाण्यात स्नानापासून रोखणे हा आता मोठा टास्क प्रशासनासमोर आहे.
Hingoli News: हिंगोली–सेनगाव मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या पाच ते सहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून, काही ठिकाणी तर रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गजही उघडे पडल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी या भेगांची मलमपट्टी करण्यात आली होती, मात्र ती अल्पावधीतच उखडल्याने दुरुस्तीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Breaking News: विरार–भरूच मेमू (गाडी क्रमांक 19101) भिलाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना पुढील (ड्रायव्हिंग मोटर कोच) चे चार चाके रुळावरून घसरली
घटना सकाळी 6:27 वाजताची असून अपघात निवारण रेल्वेगाडी (ART) वलसाड येथून रवाना करण्यात आल्या आहेत
या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा रेल्वे कर्मचाऱ्याला कोणतीही दुखापत अथवा इजा झालेली नाही
रुळावर चाके पुन्हा चढविण्याचे (रि-रेलमेंट) काम युद्धपातळीवर सुरू आहे
गाडी घसरल्यामुळे पश्चिम रेल्वे वरून मुंबईतून गुजरात दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने
इंटरसिटी एक्सप्रेस गेले अर्धा तास विरार स्थानावर उभी
Nagpur News: हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यातील कुख्यात आरोपी एक्का ऊर्फ हर्ष महेंद्र रामटेके फरार.
शौचालयात जाण्याच्या बहाण्याने बाहेर नेल्यानंतर पोलिसांचे दुर्लक्ष साधून आरोपीने केले पलायन.
एक्का हा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रहिवासी असून चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांतील अट्टल आरोपी आहे.
20 जुलै रोजी गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्याला अटक केली होती.
घटनेनंतर शहरातील सर्व पोलिस ठाणे, कंट्रोल रूम, डीबी पथके आणि बीट मार्शलना सतर्क करण्यात आले आहे.
आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू असून निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता.
Bhandara News: काल भंडारा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या साकोली तालुक्यातील सुंदरी या गावातील तलावाची पहाटेच्या सुमारास पाळ फुटली. यामुळे तलावाच्या खालील भागात असलेल्या सुमारे 40 हेक्टर पेक्षा अधिक शेतशिवार आता जलमय झालं आहे. यातील चार ते पाच शेतकऱ्यांचं शेत अक्षरश: खरडून गेलं असून 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतात या तलावातील पाणी गेल्यानं अक्षरशः हे शेत आता गाळयुक्त झालं आहे. पहाटेच्या सुमारास या तलावाची पाळ फुटली, मात्र ग्रामस्थांचं नशीब बलवत्तर तलावापेक्षा गाव उंचीवर असल्यानं हे संपूर्ण पाणी गावात न येता शेतशिवारात गेलं. त्यामुळं नागरिकांचं नुकसान झालं नसलं तरी, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
फाऊंटन ते गायमुख या चार किलोमीटर टप्प्यात सहा फूट लांब आणि आठ इंच खोल खड्डे
प्रवाशांची अक्षरशः हाडे खिळखिळी झाली असून दणके आणि ट्रॅफि ककोंडीने सर्वजण हैराण झाले आहेत.
खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवर अनेक अपघात झाले असून हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मीरा-भाईंदर महापालिका आणि राज्य सरकार यांच्यातील वादाचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे दिसून आले आहे.
ठाणे शहरातून जाणारा घोडबंदर मार्ग हा प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जातो.
पालघरसह गुजरात, दिल्ली व अन्य राज्यांमध्ये याच रस्त्यावरून कंटेनर्स, कार आणि मोठ्या बसेस जात असतात.
सध्या पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे हा प्रवास खडतर बनला आहे. एकीकडे मेट्रोची सुरू असलेली कामे व दुसरीकडे ठिकठिकाणी पडलेले खड्डे यातून मार्ग काढताना प्रवासी व वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत.
फाऊंटन ते गायमुख रस्त्याची दुरुस्ती महानगरपालिकेमार्फत न करता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच करण्यात यावी अशी मागणी पालिके कडून कारण्यात येतं आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण हे पाच वर्षांचे करावे अशी मागणी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात काम मोठे आहे, अडीच वर्ष जिल्ह्यात काय काम करायला हवे हे समजून घेण्यातच जातात. त्यामुळे अडीच वर्षाची अट रद्द करून आरक्षण पाच वर्षांच करावा अशी मागणी त्यांनी केली. नगरपरिषद नगरपालिका अध्यक्ष पाच वर्षाच मग जिल्हा परिषदेवरच असा अन्याय का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष यांच्या मानधनातही वाढ करण्याची मागणी केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं ८ ऑगस्टला दिल्लीत रिसेप्शन पार पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधीसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार
शरद पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी रिसेप्शन सोहळा पार पडणार
कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला वनतारामध्ये घेऊन गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे... माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी केलेल्या आंदोलनानंतर उच्चस्तरीय समिती आणि वनतारा यांनी माधुरीला परत वाटल्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली... मात्र माधुरीच्या निवारासंदर्भात तपासणी करणारी टीम वेळकाढूपणा करत असल्याने माधुरी अद्याप परत आली नाही... त्यामुळे माधुरीच्या घरवापसीसाठी एक दिवस उपवास करण्याचा निर्णय नांदणी परिसरातील गावकऱ्यांनी घेतला आहे.... माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो नागरिक आज एक दिवस उपोषण करणार आहेत.... नांदणी मठाच्या परिसरामध्ये हे उपोषण सुरू झालं आहे... पुढील आंदोलनाची दिशा देखील आज ठरवली जाणार आहे....13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये परत यावी यासाठी मागणी जोर धरत आहे...
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात राजीव गांधी चौक परिसरातील महेंद्र ज्वेलर्स येथे भरदिवसा एका अज्ञात भामट्याने चलाखीने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आलेल्या संशयिताने अंगठी पाहण्याच्या बहाण्याने ती हातात घेतली आणि क्षणार्धात दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचा कारागिराने पाठलाग केला. मात्र, जुने बसस्थानक परिसरातून पळत जाऊन तो पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून साथीदारासह पसार झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
पीओपीच्या गणेश मूर्तीवरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला सवाल. पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले असताना तुमची भूमिका वेगळी का? तुमची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला परखड सवाल. राज्य सरकार पीओपी मूर्तीसाठी अट्टाहास का धरतंय असा प्रश्न विचारत सरकारला धोरण स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. बुधवारी पुन्हा होणार सुनावणी
पीओपीच्या गणेश मूर्तींच नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यास पूर्ण बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी तसेच सीपीसीबीच्या बदलत्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, याचिकेला मूर्तिकार संघटनांनी आव्हान दिलं असून मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल