Maharashtra Live blog updates: रायगडच्या म्हसळामध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरपंचायत मधील अपात्र ठरलेलेल्या 7 नगरसेवकांना पत्र

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्करLast Updated: 27 Apr 2026 01:04 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील सातव्या गुन्ह्यात एसआयटीने घेतला आहे अशोक खरातचा ताबा. धार्मिक पुजविधी च्या बहाण्याने...More

पुण्यात ड्रग्सविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; 19 आरोपी जेरबंद, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात ड्रग्सविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; १९ आरोपी जेरबंद, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक करत महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


तपासादरम्यान समोर आले की, आरोपी एमडी (मेफेड्रॉन) सारख्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी विविध मोबाईल ॲप्सचा वापर करत होते. विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यामार्फत ड्रग्सची देवाणघेवाण केली जात होती. फक्त व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातूनच ग्राहकांशी संपर्क साधून ड्रग्स पुरवठा केला जात होता, ज्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत होते.


पुण्यातील आयटी क्षेत्रालाही या रॅकेटने लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही इंजिनिअर्सपर्यंत हे ड्रग्स पोहोचवले जात होते. वय २० ते ४५ या गटातील व्यक्तींमध्ये एमडीचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहितीही समोर आली आहे.


या संपूर्ण प्रकरणात एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी करताना या ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही आरोपी राजस्थानमधून एमडी अमली पदार्थ आणून पुण्यात विक्री करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.


 पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरीही शहरात हे पदार्थ नेमके कुठून येतात, हा प्रश्न कायमच उपस्थित राहतो. त्यामुळे या पुरवठ्यावर आळा घालण्यात पोलिसांना आतापर्यंत पूर्णपणे यश मिळालेले दिसत नाही.