Maharashtra Live blog updates: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे....More
संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार?
भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. या युवाशक्तीला गैरसमजाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. धर्मेंद्र प्रधान, माजी केंद्रीय शिक्षणमंत्री
दिल्लीच्या संसद मार्गावर, टॉलस्टॉय मार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या, जंतर मंतरवरील वातावरण पुन्हा तापलं
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर पालिकेची कारवाई; संबंधित कंत्राटदाराचा परवाना तात्पुरता निलंबित
साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आल्यानंतर कंत्राटदाराचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
कुर्ला विभागातील खैरानी रोड परिसरात पावसाळ्यापूर्वी मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू होते. मात्र काम सुरू असतानाच आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा ठपका कंत्राटदारावर ठेवण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
घटनेनंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू असून चौकशी अहवालानुसार आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ठाकरेंच्या रॅलीला पाठिंबा जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅली मधे सहभागी होणार
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती
संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ४० मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती
उद्याच्या मोर्चासाठी समन्वय, भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर झाली चर्चा
या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी स्जरद पवार यांना फ़ोन करून उद्या च्या मोर्चाबाबत माहिती आणि चर्चा केली
पालघर मध्ये आज सकाळी दहा वाजून 57 मिनिटांच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा जाणवला असून या हादऱ्याची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे . पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी कासा या परिसरात हा भूकंपाचा हादरा जाणवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे . पालघर जिल्ह्यात 2018 पासून भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच असून आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक कमी जास्त तीव्रतेचे भूकंपाचे हादरे या परिसरात बसले आहेत . सतत सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा ग्रामीण भागातील घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच समोर आला आहे . पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी या भागात आदिवासी गावपाड्यांवर कच्च्या बांधकामाची घर या घरांच्या भिंतींना सतत बसणाऱ्या हादऱ्यांमुळे तडे जात असून येथील हजारो घर धोकादायक स्थितीत निर्माण झाली आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी या भागात देण्यात येणारी घरकुल देखील भूकंप रोधक दिली जातील असा आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नसून आता वारंवार बसणाऱ्या या धक्क्यामुळे पुन्हा एकदा येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.... आंदोलनाच्या ठिकाणी जाणारे राजकीय नेते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत. विरोधकांना मुलांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसून त्यांना फक्त स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी अशा स्वार्थी राजकारण्यांना ओळखून आपल्या मुख्य मागण्यांवरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे चार सौम्य धक्के
- आज सकाळी 9.55 वाजल्यापासून चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले
- प्राथमिक माहितीनुसार सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
- जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही, प्रशासनाची माहिती
- भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण
- प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पावसामुळे पाटण तालुक्यातील 20 गावे अंधारात
बोंद्री जवळ विजेचा खांब पडल्याने 35 रोहित्रे बंद
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण तालुक्यातील बोंद्री गावाजवळ विजेचा खांब पडल्याने 20 गावे तीन दिवसापासून अंधारात गेली आहेत. एकूण 35 रोहित्रे बंद झाल्याने हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. डोंगरदऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसात तसेच वाहत्या पाण्यातून विजेचे खांब न्यावे लागत असल्याने वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
११ के. व्ही. मणदुरे गावठाण या वाहिनीचा एक पोल बोंद्री गावाजवळ पडला असुन तेथुन पुढील मौजे नाथाचीपाग, जाईचीवाडी, मळ्याचावाडा, अंबवणे धनगरवाडा, बर्गेवाडी, फुरसाई, नाईकडेवाडी, धारेश्वर, मराठवाडी, जावरातवाडी, काटीटेक, जोगेटेक, गावडेवाडी, धुईलवाडी, खुडुपलेवाडी, घाणबी, वाटोळे, काटी, अवसरी, श्रमजीवी ही सर्व गावांचा विद्युत पुरवठा बंद आहे.
वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरण आज सकाळी 79.26 टक्के भरले आहे. वाढती आवक लक्षात घेऊन धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत गृहातून वारणा नदीपात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणा धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी रात्री 1 वाजता आदेश देण्यात आल्यानंतर पहाटे 2 वाजल्यापासून विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहून धरणातील पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आज सकाळी 6 वाजता धरणाची पाणीपातळी 619.15 मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा 27.27 टीएमसी म्हणजेच 79.26 टक्के झाला असून उपयुक्त पाणीसाठा 20.39 टीएमसी (74.08 टक्के) इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठा 21.23 टीएमसी (77.15 टक्के) होता. गेल्या 24 तासांत धरणात 8,258 क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाली असून पाणीसाठ्यात 0.71 टीएमसीची वाढ झाली आहे. चालू पावसाळी हंगामात आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्यात 16.07 टीएमसीची वाढ झाली आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत 51 मिमी, तर पाथरपुंज येथे 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान धरण क्षेत्रात 1,284 मिमी, तर पाथरपुंज येथे 3,143 मिमीपर्यंत पोहोचले आहे.
सध्या स्पिलवे आणि कालवा बंद असून केवळ विद्युतगृहातून 800 क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे
आतापर्यंत १७ लाख ५७ हजार ४३३ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी यादी प्रसिद्ध
शुक्रवारी रात्री १६ लाख ९५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर
तिसरी यादी ही सर्व जिल्ह्यांतील शेतक-यांची आहे
२२ जुलैला ५३३ शेतकरी तर त्यानंतर ६१ हजार ९०० शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाली होती
राज्य सरकारने आयकर विभागाला जवळ्पास २५ लाख शेतकरी यांची यादी दिली होती
त्यातील टप्प्याटप्प्याने आयकर विभागाने यादी दिल्यानंतर ती प्रसिद्ध केली जात आहे
शुक्रवार , दिनांक २४ जुलै २०२६ सकाळी ६ ते शनिवार , दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ६.०६ % वाढ झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची आज तातडीची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे
उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ही बैठक बोलविण्यात आली आहे
या बैठकीला नेते. शहराध्यक्ष, सर्वच विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहे
सकाळी १० वाजता ही बैठक शिवतीर्थ निवासस्थानी सुरू होईल
धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला तब्बल 550 विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानवसाखळीच्या माध्यमातून 60 फूट उंच आणि 40 फूट रुंद श्री विठ्ठलाची भव्य व आकर्षक प्रतिमा साकारून भक्ती, संस्कृती आणि एकतेचा अनोखा संदेश दिला....
अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.. अतिवृष्टीमुळे पांजरे येथील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले.. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.. माहिती मिळताच पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले.. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी आठ शेळ्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत.. खबरदारीचा उपाय म्हणून हरी शांताराम उघडे यांच्यासह परिसरातील आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे..
टीईटी प्रकरणात मोठी अपडेट
टी टी पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपी बिहार मधून अटक
बीजेंदर कुमार गुप्ता याला बिहार मधून पोलिसांनी अटक केली आहे
त्याला बिहार मधून भिवंडी येथे आणण्यात येत आहे
बीजेंदर कुमार गुप्ता हा पेपर फुटी प्रकरणातला मुख्य आरोपी होता
विजेंदर कुमार गुप्ता याने साथीदार सोनू सह मिळून छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे व प्रॉपर्टी चे आम्हीच दाखवून पेपर मिळवले
छापखान्यातून बुटात लपून पेपर बाहेर काढण्यात आले
आठ हजार रुपयांमध्ये पेपर मिळवण्यात आले
व हे पेपर विक्री करण्यासाठी महाराष्ट्रातील भिवंडीत व पुण्यात आले होते
तब्बल दीड कोटी मध्ये या पेपरची विक्री होणार होती
परंतु भिवंडी पोलीस ग्राहक बनून भिवंडीत टीईटी पेपर विक्रीचा पर्दाफाश केला
आतापर्यंत या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे
याआधी 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
अखेर टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपी अटकेत
वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहार मधून अटक
भिवंडी पोलिसांनी गुप्ताला अटक करून पुणे एयरपोर्टला आणलं
पुणे एयरपोर्टहून थोड्याच वेळात आरोपीला भिवंडीला घेऊन येणार
एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले चांदोरी, सायखेडा, कोठुरे , करंजगाव, चापडगाव आदी गावांमध्ये पाणी शिरले..तर याच भागातील हजारो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेले..या भागात प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, मका आदी पिके घेतली जातात..या पावसामुळे ते बाधित झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे...दरम्यान, पावसामुळे विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य जागी स्थलांतरित केले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि पुरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विठ्ठल मंदिरात आलं की उर्जा मिळते. राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे, विठुरायाकंडे साकडे. तरुणाईला दिशा देण्यासाठी मोदींना आशीर्वाद द्यावा
पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाबासाहेब माने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश