Maharashtra Live blog updates:बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाचा फायनल आकडा समोर आला, किती टक्के मतदान झालं?

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्करLast Updated: 24 Apr 2026 02:06 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: वाड्याच्या  कोणसई येथील फटाका फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले या घटनास्थळाची आज शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या...More

मुंबईच्या ऐतिहासिक ‘किपलिंग बंगल्या’च्या संवर्धनाला मंजुरी; 144 वर्षांच्या वारशाला नवसंजीवनी 

मुंबईच्या औपनिवेशिक वारसा आणि साहित्यिक परंपरेला मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकारने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट परिसरातील १४४ वर्षे जुन्या ‘डीन बंगल्या’च्या (किपलिंग बंगला) जतन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९ कोटी ९५ लाख १८ हजार ७९९ रुपयांचा (जीएसटीसह) खर्च मंजूर करण्यात आला असून, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने २३ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.


ग्रेड-२ वारसा दर्जा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखला जाणारा हा बंगला मुंबईच्या कला आणि साहित्य इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. सुमारे १८८२ च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या बंगल्याची रचना औपनिवेशिक शैलीत असून, सागवान लाकडाच्या व्हरांड्या, आकर्षक बाल्कनी आणि लाकडी कोरीवकाम ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. २००७ पर्यंत या बंगल्यात शाळेच्या डीनचे अधिकृत निवासस्थान होते.