Maharashtra Live blog updates: आमचा रूबाबदार नेता गेला, आता दादांचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही; अदिती तटकरे भावूक
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत.
प्रस्तावित विधेयके व अध्यादेश
विधानसभेत प्रलंबित विधेयक:- २
सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणारे अध्यादेश :- ३
प्रस्तावित विधेयके:- १०
एकूण :- १५
विधानसभेत प्रलंबित विधेयक
(१) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५ (उद्योग, ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग)
(२) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, २०२५ (गृह विभाग)
सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येणारे अध्यादेश
१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२५ (नगरविकास विभाग)
२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ (ग्रामविकास विभाग)
३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
प्रस्तावित विधेयक
१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा)
विधेयक, २०२६ (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १३ याचे रूपांतरित विधेयक) (नगरविकास विभाग)
२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२६. (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १४ याचे रूपांतरित विधेयक) (ग्रामविकास विभाग)
३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२६ चा अध्यादेश क्रं. १ याचे रूपांतरित विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण) (राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक वाढविता यावा म्हणून कलम १०९ ची सुधारणा)
४) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन विधेयक, २०२६ (उच्च व तंत्र शिक्षण)
५) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)
६) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)
७) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२६ (वित्त विभाग)
८) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसुल व वन विभाग)
९) महाराष्ट्र उद्दाहक, सरकते जिने व सरकरते मार्ग (सुधारणा), विधेयक, २०२६. (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
१०) महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
आमचा रूबाबदार नेता गेला, आता दादांचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही; अदिती तटकरे भावूक
मुंबई: मी वयाच्या 12 व्या वर्षी दादांना भेटले. दादांनी पहिलं नियुक्ती पत्र मला सकाळी 7.10 मिनिटांनी दिलं. तेव्हापासून मी त्यांच्या सोबत काम करते. आमचं सभागृहातील बोलणं होईपर्यंत ते उठत नव्हतं. ते म्हणायचे की माझ्या मुलांचं अजून बोलून झाल नाही. आता ते कधीच भेटणार नाही, त्यांचा कधीच आवाज ऐकायला मिळणार नाही, याचं दु:ख आहे. आमचा रूबाबदार नेता गेला. मात्र ते एकटे गेले नाही तर आमच्या कार्यकर्त्यांचा रुबाब आणि माज घेऊन गेले, असे भावनिक वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अदिती तटकरे बोलत होत्या.
50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम
50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम
subject to outcome ही राज्य सरकारची विनंती नाकारली
उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित
प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन ठेवून प्रलंबित निवडणुका घेतल्या जाऊ शकतात - राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांची भुमिका
अंतिम सुनावणी लवकर घेऊ सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
लवकरच अंतिम सुनावणीला सुरुवात करू
























