Maharashtra Live blog updates: सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: शिंदे सेनेचे बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी बीड जवळील म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी देवकते यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असे लिहीत त्यांनी आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी.जी.तांदळे यांना जबाबदार धरले आहे.
भारत देवकते यांनी स्टेट्समधील चिठ्ठीत नमूद केले आहे की, “मी गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यांसारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे ठरविले होते. मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिठ्ठीतून देवकते यांनी केली.
तर देवकते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये. तसेच त्यांनी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हनुमान मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावरून उधळल्या नोटा, अकोल्यातील घटना
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. निमित्त होतं गावातील हनुमान मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या हनुमानाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचं. मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण करण्यात आली. मंदिरावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण यावेळी कारण्यात आलीय. यासोबतच 5 आणि 10 रुपयांचे नाणेही यावेळी उधळण्यात आलेय. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केलीय. नोटा वेचतांना एकच गोंधळ उडालाय. कुणी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न केलाय. तर कुणी वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटा वेचण्यासाठी सैरावैरा धावत सुटलेय. भाविकांनी पकडलेल्या आणि जमा केलेल्या नोटा ते आता आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार आहेत. नोटा उधळतांना काही काळ चेंगराचेंगरी होते की का, अशी परिस्थिती निर्माण झाली होतीय. मात्र, यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाहीय. गावकऱ्यांनी मात्र या प्रकाराचं समर्थन करत हा आमच्या भक्तीचा भाग असल्याचं आपल्या म्हटलंय.
एवढी संख्याबळ असाताना तुम्ही विरोधी पक्षनेते पदाला का घाबरता? : आदित्य ठाकरे
- एवढी संख्याबळ असाताना तुम्ही विरोधी पक्षनेते पदाला का घाबरता
- विरोधी पक्षनेने पद हा सन्मान दिला जायचा
- सरकार काळे चहा आणि काॅफी घेण्यापे त्यांचे काळे धंदे बघा
- मुलुंड मध्ये मेट्रेाचा भाग पडला
- गाडया माणस चिरडली गेली
- त्या माणसाची किंमत किती ५ लाख रुपये
- एकमेकांबद्दल वरचढ सुरु आहे : आदित्य ठाकरे
























