Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: तळकोकणात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने तिलारी धरण ८३.८२ टक्के...More
भामरागडमध्ये पुराचं पाणी ओसरले आहे. पण आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून इंधनासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांच्या पुरामुळे 3 दिवस तालुक्याचा संपर्क तुटला होता. आता पाणी ओसरलं असलं, तरी इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तहसीलदार किशोर बागडे यांनी स्वतः पेट्रोल पंपावर जाऊन पाहणी केली असून प्रत्येकाला काही प्रमाणात तरी इंधन मिळावे, यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. पूराचं संकट संपत असतानाच भामरागडसमोर आता इंधन टंचाईचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत विरोधात सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
पालकमंत्री जयकुमार गोरेचा शिवीगाळ करत उल्लेख केल्याने युवा मोर्चा कार्यकर्ते आक्रमक
सोलापुरातील चार हुतात्मा चौक या ठिकाणी खासदार संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत केला जात आहे निषेध
पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार
खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील खडकवासला आणि वरसगाव धरण 100% भरलं
मुसळधार पावसामुळे खडकवासला वरसगाव धरण 100% भरले इतर धरणातील पाणीसाठा वाढला
खडकवासला धरण 100% वरसगाव शंभर टक्के टेमघर 89 टक्के तर पानशेत धरण 98 टक्के भरले आहे
खडकवासला धरण 100% भरल्याने सध्या 13क्यूसेक मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
३० जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृत लागू झाला आहे
नव्या कायद्याने गुन्हे दाखल केले जाणार आहेत
हा कायदा बळजबरी, फसवणूक, अवाजवी प्रभाव, आमिष किंवा विवाह याद्वारे केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार
मुंबईचा पश्चिम उपनगरात मागील एक ते दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे
पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली विलेपार्ले वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे
मुंबईत मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली नंतर आज पुन्हा सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे
जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी भरायला सुरुवात
म्यानमार-थायलंड-लाओस या तीन देशांच्या सीमेलगतच्या गोल्डन ट्रँगल परिसरात महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार बीडमधील ज्या तरुणामुळे समोर आला. त्या तरुणाच्या कुटुंबीयाने तरुणाला सुखरूप आणावे अशी विनंती सरकारकडे केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून या तरुणाला ओलीस ठेवण्यात आले असून त्याच्याशी फोनवरून बोलणं झालं त्यांच्याकडून ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात असून ,टार्गेट पूर्ण न झाल्याने त्यांला विजेचा शॉक देऊन अमानुष मारहाण केली, जेवण दिले जात नाही, त्याच्या जीवितास धोका असल्याचं सांगण्यात आलेय.दरम्यान काही लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार केला मात्र सरकारने तरुणाला परत आणावे अशी विनंती ओलीस ठेवलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आली.
* तापी नदीची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशीही कायम...
* हतनुर धरणाचे दरवाजे उघडल्याने प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग...
* तापी नदीच्या पुरामुळे प्रकाशा घाट पूर्णपणे पाण्याखाली...
* पाण्याचा वेग वाढल्याने घाटावरील पत्र्याचे शेडही पाण्यात बुडाले...
* घाट पाण्याखाली गेल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांची मोठी गैरसोय...
* प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी तर १५ ऑगस्टनंतर पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार हवामान विभागाचा अंदाज… भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जूनअखेरीस दीर्घकालीन अंदाजात राज्यात विदर्भवगळून इतरत्र सरासरीहून कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीहून ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. सध्या पावसाची रिमझिम सुरूच आहे.
नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने आता पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरच्या सहस्रकुंड धबधब्याने विलोभनीय रूप धारण केलंय. जवळपास शंभर फुटावरून कोसळणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी पर्यटकांनी इथे गर्दी केलीय. आज रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Sangli Koyna Dam : कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गाचा परिणाम कृष्णा नदीच्या पाणीपातळीवर होत आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी आज सकाळी २९ फुटांवर पोहोचली. मात्र, काल दिवसभरात झालेल्या वाढीनंतर आता पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे.कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे शनिवारी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली होती. मात्र, शनिवारी दुपारपासून पाणीपातळी वाढीचा वेग कमी झाला असून नदीची पातळी हळूहळू वाढत आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
मॅनहोलवरील सेफ्टी जाळी चोरण्याचा प्रयत्न स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांच ट्विट...
जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने मॅनहोल उघडा ठेवून चोरटा पळून गेला स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांचा आरोप
तब्बल एक तास दादर टीटी येथील मॅनहोल होता उघडा
यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची जाळी बसवली
दादर टीटी परिसरात उघडे मॅनहोल आढळले
मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेडिंग नाही
पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही निष्काळजीपणा कायम?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पूरानंतर आता आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. भगवानपूर परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालत अनेकांच्या शेतातील धान पिकाची नासधूस केली आहे. रात्री हत्तींच्या कळपाने शेतात घुसून उभे धान पीक अक्षरशः तुडवले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून, हत्तींच्या वाढत्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, माजी आमदार कृष्णा गजबे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच रानटी हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कौतुकास्पद कार्यतत्परतेमुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. अरुणा सुनील जैन नावाची महिला छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. मध्यवर्ती बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या महिला वाहक संगीता पालवे यांनी क्षणाचाही विलंब न करता अरुणा यांना तातडीने 'सीपीआर' (पंपिंग) देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे महिलेच्या छातीचे ठोके पूर्ववत प्रतिसाद देऊ लागले.दरम्यान, वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिका (१०८) ला कॉल करण्यात आला, मात्र वेळेत मदत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिलेला तात्काळ रिक्षातून 'घाटी' रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने महिलेचा जीव वाचला.
या कठीण प्रसंगात सहायक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंके, महिला वाहक संगीता पालवे, सुरक्षा रक्षक कविता भुतेकर आणि रवींद्र गरड यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचा आणि मदतीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईत उघड्यावर कचरा केल्यास उद्यापासून ५०० चा दंड
सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर
मुंबई महानगर पालिकेने 'स्वच्छ मुंबई 'साठी कठोर पावले उचलली आहे
आता उघड्यावर कचरा फेकल्यास, घाण केल्यास २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे
यासाठी कचऱ्याच्या ठिकाणांवर 'सीसीटीव्ही'ची नजर ठेवण्यात येणार असून घाण करताना आढळल्यास वॉर्डमधील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
सोमवारपासून सर्व २४ वॉर्डमध्ये याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे
मुंबईतील मोठ्या प्रमाणात वारंवार कचरा साठणारी ठिकाणे पालिकेने निश्चित केली असून त्यांची यादी गुगल नकाशावरही टाकण्यात आली आहे
या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून परीक्षण करून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या महापुरानंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांच्या रौद्ररूपामुळे काही दिवस ठप्प झालेले आयुष्य आता पुन्हा रुळावर येत आहे. मात्र पुराचा फटका अजूनही स्पष्टपणे दिसून येतोय. रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य, घरांमध्ये साचलेला गाळ आणि मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे नागरिकांसमोर अजूनही मोठे आव्हान आहे. नुकसानीचा अद्याप आकडा समोर आलेला नसला तरी दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महसूल, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि दूरसंचार विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. अधिकारी गावागावांत जाऊन नुकसानीचा पंचनामा करत असून, बाधित नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. बंद पडलेले रस्ते, वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठीही प्रशासनाने वेगाने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र महापुराच्या जखमा भरून निघण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल उद्भवलेली पूर परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. वर्धा, इरई आणि झरपट नद्यांची पाणी पातळी रात्रभरात खालावली असून रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या नागरी वस्त्यांमध्ये असलेलं पुराचे पाणी देखील ओसरलं आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पाऊस नसल्यामुळे ही पूरस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. याशिवाय लगतच्या यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन आता पूर्वपदावर आलय.
नाशिक जिल्ह्यात पाऊस लांबल्याने जून महिना कोरडा गेला तर पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत हुलकावणी दिली. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून ठेवल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले आणि मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती बघता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांवर बुरशी, मरतुक , व्हायरस अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून सरकारकडून हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. टोमॅटो पिकांची लागवड लांबल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल होणार का असा प्रश्न पडलाय.
पुणे रेल्वे स्टेशनवर आज रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सात गाड्या रद्द तर काही गाड्या पर्यायी मार्गाने सोडणार
पुणे तळेगाव लोकल चार फेऱ्या डेक्कन एक्सप्रेस पुणे दौंड या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत
जयपुर पुणे एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस खडकी स्थानाकावर थांबवण्यात येणार आहे
तर नागपूर पुणे एक्सप्रेस अमरावती पुणे जम्मू तावी हडपसर स्थानकावर थांबवण्यात येणार आहे
पुणे लोणावळा गाडी शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणार आहे
पुणे जयपूर एक्सप्रेस पुणे मुंबई एक्सप्रेस सायंकाळी पाच वाजता खडकी स्टेशन वरून सोडण्यात येणारा
धाराशिवच्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. मंदिर संस्थानचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांची पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत बदली करण्यात आली आहे. दोन जून रोजी त्यांनी पदभार स्वीकारताच दर्शन व्यवस्थेत बदल करत शशुल्क दर्शन आणि धर्मदर्शन रांगा एकत्र करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सर्व भाविकांना समान अंतरावरून देवीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या बदलामुळे पुजारी वर्गात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. आता सामोरे यांची पदोन्नतीवर रत्नागिरी–सिंधुदुर्ग जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या बदलीमागे या अंतर्गत नाराजीचाही फटका बसल्याची चर्चा रंगली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात असतानाच झालेल्या या बदलीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या वाहनाला अज्ञात वाहनानं जबर धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना भंडारा - तुमसर बायपास महामर्गावरील वळण मार्गावर घडली. अपघातग्रस्त तरुण हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील ऊसरा मेंढा येथील आहेत. सचिन बनसोड (३०) असं मृत तरुणाचं नावं आहे. तर, पीयूष डहाक (२२) असं गंभीर जखमी तरुणाचं नावं आहे. हे दोघेही दुचाकीनं भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील नातेवाईकांना भेटून चंद्रपूर जिल्ह्यातील स्व:गावी निघाले असताना हा अपघात घडला. गंभीर जखमीवर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात असून घटनेचा पुढील तपास भंडारा पोलिस करीत आहेत.
पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात मात्र रेड अलर्ट असल्याने आज किल्ल्यावर बंदी आहे ..मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड व दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने पुणे वन विभागाने हा निर्णय घेतला. नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तळकोकणात भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग दिला असून अंतिम टप्प्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड केली जाते, सध्य स्थितीत जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत सरासरी ७४ टक्के पाऊस झाला असून शेतीसाठी झालेला पाऊस पूरक आहे.
गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात आज मोठा अनर्थ थोडक्यात टळला. नवजात अतिदक्षता विभाग अर्थात एनआयसीयूमध्ये शॉर्टसर्किट होऊन विद्युत पॅनलला अचानक आग लागली. या विभागात उपचार घेत असलेली तब्बल 13 नवजात बालके धोक्याच्या छायेत आली होती. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व बालकांचे प्राण वाचले.
शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. विद्युत पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्याने एनआयसीयू परिसरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी रुग्णालयात एका महिला कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ सुरू होता. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यानंतर उपचाराधीन सर्व 13 नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. घटनेनंतर पालक आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत अनेक पालकांनी एनआयसीयूबाहेर गर्दी केली. काही काळ रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण होते. शॉर्टसर्किट नेमके कशामुळे झाले, याची इलेक्ट्रिशियनमार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत तरुणीने आत्महत्येसाठी घेतली उडी.. तीन तरुणांनी वाचवला जीव...
नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात कन्हान नदीपात्रात आज संध्याकाळी एका 17 वर्षीय तरुणीने उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, नदीपात्र जवळ उपस्थित असलेल्या तीन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तरुणीला पाण्यातून लगेच बाहेर काढून तिचा जीव वाचवला.
घटनेनंतर तरुणीला तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तरुणीने नदीत उडी घेण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे... या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडू सुरू आहे.
धावत्या लोकल खाली आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचे लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण
गुरवारी रात्री दादर फलाट क्रमांक १ वरील बोरिवली लोकल सुटताच एका अनोळखी इसमाने धावत येऊन लोकल खाली उडी मारण्याचा केला होता प्रयत्न
त्यावेळी तिथे असलेल्या महिला पोलीस शिपाई अनिता नरवाडे यांनी प्रसंगावधानता दाखवत तत्काळ इसमाला बाहेर ओढल्याने त्याचे प्राण वाचले
ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे
सध्या लोहमार्ग पोलीस या इसमाचा शोध घेत आहेत
खार पोलिसांची मोठी कारवाई
तब्बल 26 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खार पोलिसांनी अटक.
आरोपी सुनील अशोक माळी याला नेरूळ, नवी मुंबई येथून ताब्यात.
सन 2000 मधील जबरी चोरीच्या (IPC कलम 394, 34) गुन्ह्यात आरोपी फरार होता.
न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याने 2022 मध्ये जाहीरनामा जारी करण्यात आला होता.
तांत्रिक माहिती आणि सापळा रचून 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आरोपीला अटक.
खार पोलिसांच्या विशेष निगराणी व तडीपार पथकाची यशस्वी कारवाई.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे व पोलीस निरीक्षक सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
निफाड तालुक्यात अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीविरोधात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला..लातूर येथून मुंबई आणि अहमदाबाद येथे काळाबाजारासाठी अनुदानित युरिया खताची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंचूरजवळ नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील पाबळवाडी परिसरातील एका कांदा गोदामावर छापा टाकण्यात आला..यावेळी अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगच्या गोण्यांमध्ये बदलण्याचे काम सुरू असताना जिल्हा परिषद कृषी विभागाचे भरारी पथक आणि पोलिसांनी रंगेहात कारवाई केली..या कारवाईत सुमारे 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या, तसेच सुमारे 65 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि आयशर टेम्पो असा एकूण अंदाजे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..याप्रकरणी चार संशयितांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवारांकडून महत्त्वाचे फेरबदल
पक्षाचे युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाच्या नव्या नियुक्त्या
विद्यार्थी अध्यक्षपदी शुशील बेर्डे यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती
पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नेमण्याचा पक्षांकडून निर्णय
युवकच्या शहरसाठीच्या प्रदेशाध्यक्ष पदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती
यापूर्वी महाराष्ट्र युवती अध्यक्ष पद देताना देखील बदल करत शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आली
मनाली भिलारे शहरच्या युवती प्रादेशाध्यक्षा तर अमृता कालदाते ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्त
तळकोकणात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने तिलारी धरण ८३.८२ टक्के भरलं असून धरणातून ७३९४ क्युसेक वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर १४ लहान मोठी धरण भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी