Maharashtra Live blog updates: राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात; देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करणार

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्करLast Updated: 19 Apr 2026 02:36 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: नागपूर - मुंबई अशा 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग लगत 18 ठिकाणी नवनगरे व कृषी केंद्राचा विकास केला जाणार होता. या नवनगरांमध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग,टेक्स्टाईल...More

सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला; तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी दिले शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे

सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला आहे. पक्षाच्या प्रदेशकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत. प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत.