Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्करLast Updated: 15 Aug 2026 02:26 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: आज भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. यानिमित्ताने दिल्लीच्या लाल  किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना उद्देशून भाषण करतील. दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली...More

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; प्रताप सरनाईकांची इच्छा, खासदार प्रतापराव जाधवांच्या मागणीला सरनाईकांचा पाठिंबा

मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजपचं संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. भविष्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदार अधिक संख्येने निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर शिवसेना दावा करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. आता प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.