Maharashtra Live blog updates: ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबला रंगेहात अटक; मालवणी पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: नागपुरात आयोजीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना देण्यात येणार नोटीस. रविवारी सुरेश भट सभागृहात दिव्यांगाना साहित्य वाटप शिबिराचा समारोप मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात...More
ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबला रंगेहात अटक
मालवणी पोलिसांची मोठी कारवाई; जोगेश्वरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल किरण इंदुलकर अटकेत.
सापळा रचून ५ ग्रॅम एमडी ड्रग्जचा व्यवहार करताना रंगेहाथ पकडले.
इंदुलकर पूर्वी मालवणी पोलिस ठाण्यात कार्यरत; परिसरातील ड्रग्ज नेटवर्कची माहिती असल्याचा संशय.
याआधीही त्याच्याविरोधात याबाबतच्या तक्रारी; दोन वर्षांपूर्वी ताकीद देऊन इंदुलकरची बदली करण्यात आल्याची माहिती.
तसेच अनधिकृत रित्या यापूर्वीही गैरहजेर राहिल्याने मुंबई पोलिस दलातील त्यांचे निलंबनही झाले होते
सध्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या इंदुलकरला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे
या प्रकरणी मालवणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून
घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत
जळगाव जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हतनुर धरणातही पाण्याची आवक वाढली असून त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 25 हजार 992 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात एकूण 407 मिमी. तर सरासरी 26 मिमी.पावसाची नोंद झाली असून त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास अजूनही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. दरम्यान तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या आवाहनही करण्यात आले आहे.
एटीएसची मोठी कारवाई
मुंबई एटीएसने बांद्रा (पूर्व) येथे किलो2.05 किलो मेथॅम्फेटामाइन (MD) जप्त केले असून त्याची किंमत 4 कोटी आहे.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कारखान्यावर छापा टाकून आणखी 2.688 किलो मेथॅम्फेटामाइन व अमली पदार्थ बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याची किंमत 5.40 कोटी आहे.
एकूण 4.738 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ₹9.40 कोटी असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.
या प्रकरणात 1 पुरुष आणि 2 परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.
NDPS कायद्यान्वये एटीएसने गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे
पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज तीन तास बंद राहणार असून, वाहनचालकांसाठी लोणावळा घाटातून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. औढें परिसरात एक्स्प्रेस वे वर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीतील यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कनेक्टिंग लिंकचा वापर न करता लोणावळा घाटमार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज तीन तास बंद राहणार असून, वाहनचालकांसाठी लोणावळा घाटातून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. औढें परिसरात एक्स्प्रेस वे वर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीतील यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कनेक्टिंग लिंकचा वापर न करता लोणावळा घाटमार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
कुर्ला येथील भूस्खलन दुर्घटना: मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी
दगावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ४ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर
कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे आज (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग २ ते ३ घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, पीडित कुटुंबांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व यंत्रणांना मदत कार्य अधिक वेगाने व योग्य समन्वय राखून पार पाडण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) श्री. अनिल जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली आहे.
दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्ती जावू शकेल, इतका अरुंद आहे. घटनास्थळी उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर सर्व यंत्रणा ह्या घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत दोन शव काढण्यात आले आहेत. तर दोन जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
महावितरणची तार अचानक कोसळली; स्पार्किंगमुळे दुचाकी जळाली, थरारक सीसीटीव्ही समोर
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका दुचाकीस्वाराला बसला आहे. बाबा एजन्सी या सोसायटीसमोर पार्क केलेल्या दुचाकीवर अचानक महावितरणची विद्युत तार कोसळली. तार कोसळल्यानंतर झालेल्या जोरदार स्पार्किंगमुळे दुचाकीच्या टायरसह पुढील भागाला आग लागून मोठे नुकसान झाले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.
अभिषेक समदर्शी यांनी आपली बजाज कंपनीची ‘फ्रीडम’ दुचाकी सोसायटीसमोर पार्क केली होती. अचानक वीजवाहिनी खाली कोसळली आणि जमिनीवर पडलेल्या तारांमधून स्पार्किंग सुरू झाले. याच स्पार्किंगमुळे दुचाकीने पेट घेतला. काही क्षणांत दुचाकीच्या पुढील भागाला आणि टायरला आग लागल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने त्यावेळी दुचाकीजवळ किंवा तारांच्या संपर्कात कोणीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मात्र, विद्युत तारांची योग्य देखभाल न केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वाहनाचे नुकसान झाल्याने संबंधित दुचाकी मालकानेही नुकसानभरपाईची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारे तार कोसळून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणने परिसरातील वीजवाहिन्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघात
महामार्गावरील इंदापूर शहराजवळ मिनी टेम्पो ची ऑईल टँकरला जोरदार धडक
अपघातात मिनी टेम्पो मधील 2 जण जखमी
जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
इंदापूर दिशेकडून मुंबईच्या दिशेकडे जात असताना टेम्पोची ओव्हरटेक करताना टँकरला धडक
अपघातात मिनी टेम्पोचे मोठे नुकसान
विना नंबरच्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या डोक्याला पिस्टल लावून त्याच्याकडील अडीच तोळे सोन्याची चैन, एक तोळ्याची अंगठी आणि ४० हजारांची रोकड असा ऐवज लुटून पळ काढल्याची धक्कादायक घटना सांगोल्यात काल रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच सांगोला शहरातील तरुणांनी स्कार्पिओचा सुसाट वेगाने सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर शिवाजीनगर परिसरात स्कार्पिओ पकडण्यात आली. यावेळी काही चोरटे उंच भिंतीवर उडी मारून पळून गेले मात्र एक चोरटा नागरिकांच्या हातात सापडला.यावेळी तरुणांनी केलेल्या मारहाणीत या चोरट्याचा उजवा पाय नडगीत फ्रॅक्चर झाला असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, संधी साधून अन्य पाच चोरटे पसार झाले. या घटनेमुळे सांगोला शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.
ही थरारक घटना रात्री ८:३० च्या सुमारास सांगोला शहरातील मित्रनगर परिसरात घडली. ईश्वर पांडुरंग गवळी (वय ४५, रा. पांगरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे जखमी चोरट्याचे नाव असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
वासूद येथील डाळिंब व्यापारी सचिन महाकाळ हे काल रात्री ८ च्या सुमारास सांगोला-महूद रोडवरील जिजाऊ सृष्टी येथे व्यायामासाठी गेले होते. यावेळी विना नंबरच्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून सहा जण तेथे आले. त्यांनी खाली उतरून सचिन महाकाळ यांच्या डोक्याला पिस्टलचा धाक दाखविला. त्यांच्याकडील अडीच तोळे सोन्याची चैन, एक तोळ्याची अंगठी आणि ४० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
लुटीनंतर चोरटे स्कार्पिओमधून सांगोल्याच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक तरुणांनी वाहनाने स्कार्पिओचा पाठलाग सुरू केला.
Crime : जळगावच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेहोल येथे गहाण ठेवलेली मोटर सायकल सोडविण्यासाठी पैसे मागण्याच्या वादातून आई आणि तिच्या १७ वर्षीय मुलाने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मयत करणसिंग रामसिंग पवार यांनी गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई करणसिंग पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अल्पवयीन मुलानेही वादात हस्तक्षेप केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या वादातून अरुणाबाई यांनी दोरीने करणसिंग यांचा गळा आवळला, तर १७ वर्षीय मुलाने सायकलच्या पंपाने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात करणसिंग यांचा मृत्यू झाला. दरम्यान, करणसिंग यांचा याआधी देखील दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अरुणाबाई पवार आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मागील तीन वर्षांत राज्यात ओबीसी प्रवर्गातील २२ लाख २० हजारावर कुणबी जात प्रमाणपत्रे महसूल विभागाकडून वितरित
न्या. संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून २०२३ ते २०२६ या तीन वर्षांत प्रमाणपत्रे दिली गेली
कुणबी- मराठा कुणबी समाजाची ही प्रमाणपत्रे महसूल विभागाने केली वितरित
राज्यातील इतर जिल्ह्यांसह बीड, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत सर्वाधिक प्रमाणपत्रांचे महसूल विभागाकडून वितरण
विश्वसनीय सूत्रांची माहिती
डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी
चाकण,मंचर,नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर मार्गेच रेल्वे करण्याची डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी
पुणे-नाशिक रेल्वेसाठी झालेल्या जनआंदोलनाची डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिली माहिती
पुणे-नाशिक रेल्वेच्या जुन्या मार्गावरच प्रकल्प राबवण्याची डॉ. अमोल कोल्हे यांची आग्रही मागणी
चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल उभारण्याची डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
न्हावाशेवा बंदराला जोडणारा उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर उभारण्याची मागणी
एमआयडीसीतील उद्योगांना स्वस्त आणि विश्वासार्ह मालवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार
सध्या रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या मालवाहतुकीमुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर औद्योगिक विकासासाठी गरजेचा असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणले
डॉ. अमोल कोल्हे यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन
* महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी
* भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
* त्रिशूल पाटील, मनोज जरांगे यांच्यावर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे..
* सोशल मीडियातून अश्लील, आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप
* महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा निवेदनात दावा
* आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ व कमेंट्सची तपासणी करण्याची मागणी
* संबंधितांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करा, अशी मागणी
* सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर व व्हिडिओ हटविण्याचीही मागणी
* अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता, निवेदनात उल्लेख
साकीनाका येथील दुर्घटनेत मृतांचा कुटुंबातील लोकांना पालिकेकडून ३ लाखांची मदत
तर दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांचे सुरक्षितस्थळी पुर्नवसन केलं जाईल
या पूर्वीच तिथे राहणाऱ्या लोकांना तो परिसर धोकादायक असल्याने नोटीसा बसवाल्या होत्या
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात निकाल रखडलेल्या लातूरच्या दोन विद्यार्थ्यांना अखेर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.देशभर गाजलेल्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान या दोन विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांना पेपरफुटी प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार म्हणून दाखवण्यात आल्याने, त्यांचा निकाल रोखून ठेवण्याचं कारणच उरलं नसल्याचं न्यायालयाच्या सुनावणीत स्पष्ट झालं.
जामनेर आणि अंबाजोगाई येथील या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दोन्ही विद्यार्थ्यांचा नीट-यूजी निकाल तात्काळ जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, निकाल जाहीर करण्यास सीबीआयचीही कोणतीही हरकत नसल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट
थोड्या वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत
दारूच्या नशेत रस्त्यावर धुमाकूळ; भरधाव चारचाकीतून तरुणांची स्टंटबाजी
हातात बिअरच्या बाटल्या घेत चारही बाजूच्या काचा उघडून तरुणांचा धिंगाणा
कंबरेपासून शरीर बाहेर काढत भरधाव कारमधून स्टंटबाजी
सेनापती बापट रोडवरून लॉ कॉलेजकडून नळ स्टॉप आणि तेथून डेक्कनच्या दिशेने प्रवास करत घातला धुमाकूळ
तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांकडून कारवाई
डेक्कन पोलिसांकडून चार आरोपींना अटक
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हरियाणातून मित्रांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते
मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर दारूच्या नशेत रस्त्यावर घातला गोंधळ
या प्रकरणाचा डेक्कन पोलिसांकडून पुढील तपास सुरू
आंबेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३ गावठी अग्निशस्त्रांसह जिवंत काडतूस जप्त
गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना आंबेगाव पोलिसांकडून अटक
जांभुळवाडी पाझर तलावाजवळील मोकळ्या जागेत शनिनगर परिसरात पोलिसांची कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रचला सापळा
तिघांना शिताफीने ताब्यात घेत पोलिसांनी केली झडती
आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २० हजार ५०० रुपये
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी धायरी परिसरातील रहिवासी
राजन विनोद शहा, अनिल कैलास चौधरी आणि प्रथम अरुण रेणुसे अशी आरोपींची नावे
आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४१/२०२६ नुसार गुन्हा दाखल
भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई
तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
गावठी पिस्तूल आरोपींकडे कुठून आले? शस्त्रांचा वापर कशासाठी केला जाणार होता? पोलिसांकडून तपास सुरू
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिसांची कारवाई
आंबेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू
Bhandara : पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले असून आता ऑगस्ट महिना सुरू झालाय. एल मिनोचा फटका आणि पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव अजूनही पूर्ण क्षमतेनं भरलेले नाहीत. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर येथील तलावाची ही हीच परिस्थिती आहे. हा तलाव सुमारे ३८८ हेक्टर क्षेत्रात विस्तीर्ण आहे. तलावाची पूर्ण क्षमता २८ दशलक्ष घनमीटर असून तलाव आतापर्यंत केवळ ५.५७ दश लक्ष घनमीटर पाण्यानं भरलेला आहे, म्हणजेच १९ टक्केच भरलेला आहे. सध्या सिंचनासाठी दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करून हे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवले आहे. त्यामुळं खरीप हा हंगामातीली पीक धोक्यात आली असून येत्या रब्बी हंगामातही सुमारे ४० गावातील हजारो हेक्टरमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो.
रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका वनपालासह दोन वनरक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई राजोली सहवनक्षेत्र, परसटोला येथील वन कार्यालय परिसरात करण्यात आली. रमेश सखाराम पचारे (57), वनपाल, राजुली सहवनक्षेत्र, वनपरिक्षेत्र गोठणगाव, निलोत्पल हिरालाल शिकारे (31), वनरक्षक, पारसटोला आणि चिंटू मंगलसिंग परिहार (38), वनरक्षक, राजुली सहवनक्षेत्र अशी ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू असून मार्च 2026 मध्ये घरासाठी आवश्यक रेती गावालगतच्या नाल्यातून ट्रॅक्टरने आणत असता वनपाल पचारे यांनी ट्रॅक्टर अडवून रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी कारवाई करण्याची धमकी देत कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. तर 9 जुलै रोजी तक्रारदार रॉयल्टीची रेती घराकडे टाकून ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना पचारे व शिकारे यांनी ट्रॅक्टर अडवून चावी काढून घेतली. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी पुन्हा 25 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकीही दिली. यानंतर 5 ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदाराची भेट घेऊन 8 ऑगस्ट रोजी परसटोला राऊंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली. त्यानुसार तक्रारदार कार्यालयात पोहोचला असता पचारे व शिकारे यांनी ‘सेटलमेंट’ करण्याचे सांगत 25 हजारांऐवजी 20 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. याआधारे पथकाकडून सापळा कारवाई करण्यात आली असता आरोपी पचारे, शिकारे व परिहार यांनी रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करून तक्रारदाराकडून वनपाल रमेश पचारे याने 20 हजार रुपयांची लाच स्विकारली. दरम्यान, लाच लुचपत पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. तर निलोत्पल शिकारे व चिंटू परिहार हे दोघेही घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी केशोरी पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे..
गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सर्पदंश प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाल आहे. तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा समोर आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बाल न्याय अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ऑगस्टच्या पहाटे सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून 12 ऑगस्टच्या पहाटे धानोरा पोलिसांनी ही कारवाई केली. जपतलाई आश्रमशाळेतील निष्काळजीपणाच्या आरोपांवर आता पहिली कायदेशीर कारवाई सुरू झाली असून, या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
- हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीला सुमारे तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
- इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर आरोपीने मुलीच्या मोबाइलमधील माहिती व हालचालींवर नियंत्रण मिळवले.
- आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीकडून पीडितेचा अनेक दिवस मानसिक छळ सुरु होता
- ठाणे येथील आरोपी निर्भय ऊर्फ आकाश माधव पाखरे पोलिसांनी अटक केली आहे.
- आरोपीकडून दोन मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे आरोपीने पासवर्ड न दिल्याने उपकरणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली.
- सुमारे महिनाभर आधी आरोपी नागपुरात आल्याचे आणि मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर.
बीडच्या परळीत एन एच ए आय आणि रेल्वे खात्याच्या समन्वयाच्या अभावाचा फटका परळीकरांसह परिसरातील नागरिकांना बसलाय. परळीसाठी महत्त्वाचा असलेला कन्हेरवाडी - टोकवाडी चार किलोमीटर बायपास रेल्वे उड्डाण पूल नसल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून बंदच आहे.यामुळे बायपास तयार असतानाही या मार्गावरील वाहतूक देखील परळीतील उड्डाण पुलावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडलाय.
या चार किलोमीटर बायपास साठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले. याच बायपास रोडवर बीड - परळी रेल्वे मार्ग असल्याने तत्कालीन एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांनी रेल्वे खाते या ठिकाणी उड्डाणपूल उभारेल असे समजून बायपासचे काम पूर्ण केले मात्र अलीकडच्या काळात बीड - परळी रेल्वेचे काम प्रगती पथावर असल्याने चार महिन्या खाली रेल्वेने बायपास वरील वाहतूक उड्डाण पूल नसल्याने बंद केली.
याबाबत एन एच ए आयला विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया न देता आम्ही या रेल्वे पुलाचा प्रश्न मार्गी लावू असे फोनवर सांगितले.मात्र तत्कालीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि रेल्वेच्या समन्वय नसल्याने तयार असलेला बायपास बंद असल्याने परिसरातील नागरिकांना अंबाजोगाई कडे जाण्यासाठी परळीला वळसा घालून जावे लागत आहे तसेच बायपास वर असलेल्या शंभर उद्योगांना देखील याचा मोठा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांकडून पर्यायी मार्गाने उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आलीय.आता एन एच ए आय या पुलाचे काम कधी सुरू करणार याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.
- नागपूरात पुढील दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहून किरकोळ पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
- जुलै च्या शेवटच्या दिवसात धुवाधार बरसल्यानंतर पावसाने दडी मारली आहे
- ऐन पावसाळ्यात सूर्याचे दररोज दर्शन होत असून तापमान वाढून उकाड्याचा त्रास वाढला आहे
- 24 तासात नागपूरचा पारा 4.2 अंशाने वाढून 33.8 अंशावर गेला जे सरासरीपेक्षा 2.9 अंश अधिक आहे
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपुरात 13 आणि 14 ऑगस्टला ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे
महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यांतील ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या नागपूरच्या चंदा ठाकूर हिचा राइट हँड चेतन मेश्राम याला तेलंगणा पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल २७ किलोपेक्षा अधिक एमडी (मेफेड्रोन)*सह जेरबंद केले आहे.
या ड्रग्स चे बाजारमूल्य 54 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादजवळ झालेल्या या धडक कारवाईनंतर पोलिसांनी नागपूर, आसाम आणि हैदराबाद येथील ड्रग्ज तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
चेतन मेश्राम आणि त्याच्या साथीदारांकडून गेल्या काही दिवसांपासून तेलंगणातून एमडीची मोठ्या प्रमाणावर खेप नागपुरात आणली जात होती. ही एमडी नागपूरसह विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळल्याची (Ghatkoper Ashok Nagar Landslide) घटना घडली आहे. या घटनेते आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
नागपुरात आयोजीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना देण्यात येणार नोटीस. रविवारी सुरेश भट सभागृहात दिव्यांगाना साहित्य वाटप शिबिराचा समारोप मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात भाजपच्या ११० नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र ४० भाजप नगरसेवकांनी दांडी मारली. अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय मनपा सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी घेतला आहे. पूर्वसूचना आणि उपस्थित राहण्याचेआवाहन करण्यात आल्यानंतरही ४० नगरसेवकांनी दांडी मारली यांना नोटीस बजावण्यात येणार. अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना नोटीस मधून देण्यात येणार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबला रंगेहात अटक; मालवणी पोलिसांची मोठी कारवाई