Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा...More
भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी राहाता न्यायालयात हजर केले आहे. समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तपासात 57 व्यक्तींच्या नावावर तब्बल 100 बँक खाती उघडण्यात आल्याचे आणि त्या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात न्यायालय अशोक खरातला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आई-वडील शेतात धान रोवणीच्या कामात व्यस्त असताना चार विद्यार्थी आंघोळीसाठी नदीवर गेले. पण त्या आनंदाच्या क्षणावर काळाने घाला घातला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी थोडक्यात बचावला. ही दुर्दैवी घटना कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे आज दुपारी घडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी गावाजवळील सती नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (६), कुणाल रमेश दूधकवर (५) आणि मोहित हिवराज सराटे (११) या तिन्ही विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक आणि शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. एका विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून पुढील पंचनामा आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे खेडेगावसह संपूर्ण कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली असून, निष्पाप चिमुकल्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ढगफुटीने मलकापूर शहरातील नंदनवन-मधुबन नगर जलमय; घरात ४ फूट पाणी, संतप्त नागरिकांचा तहसीलदारांना घेराव
'इशारा देऊनही प्रशासन झोपेत'; पाणी निचऱ्याच्या मागणीसाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन..
अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मलकापूर शहरातील नंदनवन नगर, मधुबन नगर, गणपती नगर आणि गोकुळधाम-यशोधाम नगर परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये तब्बल ४ फूट पाणी शिरले आहे. संतप्त नागरिकांनी तहसीलदार सोनावणे यांना घटनास्थळी घेराव घालत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा जाब विचारला. महिनाभरापूर्वीच रस्ता रोको आंदोलन करून इशारा दिल्यानंतरही कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाण्याचा तातडीने निचरा, बाधितांना मदत आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राजुरा आणि बल्लारपूर शहरांच्या मध्ये असलेला वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोबतच राजुऱ्याकडे जाणारा सास्ती-गोवरी हा पर्यायी मार्ग देखील गोल पुलिया जवळ पाणी असल्यामुळे बंद झालाय. त्यामुळे राजुरा मार्गे हैदराबाद कडे जाणारी सगळीच वाहतूक ठप्प झाली आहे.
हिंगोलीच्या जवळा बाजार परभणी महामार्गावर बाराशिव परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे कार अति वेगाने असल्याने कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात गाडीचे पार्ट बाजूला पडले आहेत या घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखवलं होत जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल आहे.. भरधाव कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक दक्षिण काशीतील महागणपतीला कृष्णामाईचा वेढा..
गणरायाच्या चरणापर्यंत पुराचे पाणी; मंदिर प्रशासनाकडून मंदिर बंद..
कृष्णामाईच्या जलाभिषेकानंतर महागणपतीची विधिवत पूजा,मंदिराचे दरवाजे पाणी ओसरेपर्यंत बंद..
सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई शहरातील महागणपती मंदिराला कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.धोम धरणातून सुमारे ७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली असून पुराचे पाणी थेट गणपतीच्या चरणापर्यंत पोहोचले आहे.परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णामाईच्या पाण्याने महागणपतीला जलाभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून मंदिराचे दरवाजे बंद केले.पाणी ओसरल्यानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल असे आवाहन पुजारी शैला गुरव आणि मयुरी गुरव यांनी केले आहे.
भारतीय रेल्वेकडून प्रथमच जिवंत हृदयाचे (Live Heart) यशस्वी वाहतूक; वंदे भारत एक्सप्रेसमुळे सूरत ते अहमदाबाद जीवनरक्षक मोहिमेला यश
भारतीय रेल्वे, रेल्वे सुरक्षा बल (RPF), गुजरात पोलीस आणि वैद्यकीय पथकांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे जीवनरक्षक आरोग्यसेवांमध्ये रेल्वेची वाढती भूमिका अधोरेखित
भारतीय रेल्वेने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून जिवंत हृदय (Live Heart) सुरक्षितपणे वाहून नेण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. सूरत येथून अहमदाबादपर्यंत ट्रेन क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेसद्वारे हे हृदय सुरक्षित आणि वेळेत पोहोचविण्यात आले. या हृदयाचे प्रत्यारोपण यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर, अहमदाबाद येथे करण्यात येणार आहे.
ही अत्यंत संवेदनशील आणि वेळेच्या दृष्टीने महत्त्वाची जीवनरक्षक मोहीम भारतीय रेल्वे, गुजरात राज्य पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वैद्यकीय पथकांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली.
अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरपर्यंत हृदय सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचविण्यासाठी RPF आणि गुजरात राज्य पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. त्यामुळे अवयव निश्चित वेळेत रुग्णालयात पोहोचवून प्रत्यारोपण प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ दिला गेला नाही.
काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात FIR
भाजप सोशल मीडिया सह संयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीवर कारवाई
दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्या नावाने AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सोशल मीडिया सह संयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी बोलवली जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुखांची बैठक
आज दुपारी दोन वाजता शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख संपर्कप्रमुखांची चर्चा करणार
पक्षाच्या संघटनात्मक चर्चेसोबत सद्याची राजकीय परिस्थिती तरुणांचा देशभर झालेला आंदोलन त्यासोबतच आयोध्या रामदेव चोरी प्रकरणानंतर ठाकरेंचे शिवसेनेने केलेलं राम रक्षा आंदोलन...
त्यासोबतच येणाऱ्या काळात पक्षाची रणनीती नेमकी काय असणार या सगळ्यावर सविस्तर चर्चा उद्धव ठाकरे राज्यभरातील जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुखांसोबत करणार
राज्यातील विविध प्रश्न, तरुणांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्या विषयासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती
सिंधुदुर्ग : समुद्र खवळलेल्या स्थितीत असून ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहत आहेत. तर किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. आजपासून सागरी क्षेत्रात मासेमारीला सुरुवात झाली आहे. मात्र राज्य सरकारने बंदी कालावधी वाढवला असल्याने राज्यातील मच्छीमारांना राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी असली तरी राष्ट्रीय सागरी क्षेत्रात जाऊन मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. सध्या समुद्र खवलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे, आवाहन प्रशासनाने केले आहे.
१२ सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय हद्दीत मासेमारीस परवानगी देण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू राहणार आहे. परंतु परराज्यातील मच्छीमार सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणार असल्याचे राज्यातील मच्छीमारांना १५ दिवस तोटा सहन करावा लागणार आहे.
गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश राज्यात आलेल्या पावसामुळे संजय सरोवर धरणातून पाण्याचे विसर्ग सुरू करण्यात आला आहे...परिणामी वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले असुन 34 हजार 399 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे बॅरेज मधून पाणी सोडण्यात येत आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...
बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्ट ची बीड मधून जात असलेल्या खामगाव - पंढरपूर पालखी मार्गावर तेलगाव - माजलगाव दरम्यान झालेली राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा एबीपी माझा ने समोर आणली.या महामार्गाला गेलेले भीषण तडेही दाखवले.यानंतर बीडच्या माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत निवेदन दिले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. गेली पाच वर्षापासून तेलगाव ते माजलगाव दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून या ठिकाणी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. माझाच्या बातमीनंतर माजी खासदार प्रीतम मुंडेंनी भेट गडकरींची घेतल्यानंतर आता या महामार्गाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी व इंद्राईवाडी डोंगर रांगावरील सर्व धबधबे प्रवाहित झाले.. तर नदी व नाले दुथडी वाहताहेत..छोट्या मोठ्या धरणावरून पाणी ओसंडून वाहू लागले असून डोंगरांनी हिरवा शालू परिधान केल्याने निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. ढग अक्षरक्ष : डोंगरावर उतरून येत असल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे..
- नाशिकमध्ये पुन्हा एका गंभीर अपघातताची घटना समोर
-
- जेलरोडवरील पवारवाडी येथे खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा तोल गेल्याचा स्थानिकांना दावा
-
- अजित भालेराव नावाचा तरुण गंभीर जखमी; डोक्याला व पायाला गंभीर दुखापत
- खासगी रुग्णालयात करण्यात आली शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर
- अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- तीन दिवसापूर्वी झाला होता अपघात
- महापालिकेच्या निष्काळजीपणावर कुटुंबीयांचा संताप
- 'रोज खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, प्रशासन अजूनही झोपेत?' असा नागरिकांचा सवाल
- शहरातील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरत असल्याने संतापाची लाट
२७ ते ३० जुलै दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल प्रशासनानं तयार केला आहे. लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील एक वृद्ध पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर, या मुसळधार पावसाचा केवळ साकोली या एकमेव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका बसला आहे. साकोली तालुक्यातील ५ गावातील ३२ शेतकऱ्यांच्या ९.२ हेक्टर शेतातील पिकांना फटका बसला आहे. भातपीक, तूर, भाजीपाला पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. तर, ३७ घरांचं अंशतः नुकसान झालं असून यात साकोली तालुक्यातील सर्वाधिक २४, लाखनी ४, लाखांदूर तालुक्यातील ९ घरांचा समावेश आहे. साकोली तालुक्यातील विरासी गावाला चक्रीवादळसदृश्य वादळाचा चांगलाच फटका बसला. यात महावितरणचे अनेक पोल कोसळले, तारा तुटल्यामुळं महावितरणचं प्रचंड नुकसान झालं आहे. हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल असून यात वाढही होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे.
- नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती
- जिल्ह्यातील काही तालुक्यांना आज देण्यात आला मुसळधार पावसाचा देण्यात आलाय इशारा
- मालेगाव, कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि बागलाण तालुक्यांना रेड अलर्ट
- रेड अलर्टमुळे संबंधित तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
- नाशिक शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाची उघडीप
- पाऊस कमी झाला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
- सध्या गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
मुंबईच्या कांदिवली पूर्वेत समता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे
कांदिवली लोखंडवाला परिसरात पाटील चायवाला शेजारी नशेखोरांच्या दोन टोळीमध्ये तुफान हाणामारी
पाटील चाय वाला शेजारी अल्पवयीन व तरुण मुलं नशा करून लाठी-काठीने करत आहेत मारहाण
फिल्मी स्टाईल मध्ये हाणामारीचा 2 घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल
या व्हायरल सीसीटीव्ही मध्ये दोन टोळीमध्ये तुफान हाणामारी होत असताना दृश्य कैद झाला आहे
नशा करणारे या टोळीमध्ये पोलिसांच्या भीती संपली असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे
सतत या टोळी कडून नागरिकांना टार्गेट करून मारहाण केला जात असल्यामुळे परिसरात भीतीचा वातावरण आहे
तर सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समता नगर पोलिसांनी याची दखल घेऊन मारहाण करणारे आरोपीचे शोध घेत आहेत...
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात निसर्गाने पुन्हा एकदा आपले मनमोहक रूप खुलवले आहे. संततधार पावसामुळे प्रसिद्ध भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, सुमारे हजार फूट उंचीवरून कोसळणारा शुभ्र जलप्रवाह पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याला नवजीवन मिळाले असून, हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर, गार वारा आणि फेसाळणाऱ्या जलधारा यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. विकेंडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक भिवतास धबधब्याकडे आकर्षित होत असून, प्रशासनाने पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळूनच निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
वाशिमच्या रिसोड शहरासह शिरपूर रिठद आणि परिसरातील अन्य गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या अडुळ प्रकल्पाची पातळी काल रात्री झालेल्या पावसात 30 टक्के वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या पडलेल्या पावसामुळे30 टक्के जलसाठा वाढल्याने काही प्रमाणात का होईना रिसोड शिरपूर रिठद गावाची काही प्रमाणात का होईना चिंता मिटलीय. bयेत्या काही दिवसात पडणाऱ्या पावसामुळे जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे
बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्ट ची बीड मधून जात असलेल्या खामगाव - पंढरपूर पालखी मार्गावर तेलगाव - माजलगाव दरम्यान झालेली राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा एबीपी माझा ने समोर आणली.या महामार्गाला गेलेले भीषण तडेही दाखवले.यानंतर बीडच्या माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत निवेदन दिले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. गेली पाच वर्षापासून तेलगाव ते माजलगाव दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून या ठिकाणी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. माझाच्या बातमीनंतर माजी खासदार प्रीतम मुंडेंनी भेट गडकरींची घेतल्यानंतर आता या महामार्गाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंद झालेल्या कास पुष्प पठारावर सध्या मुसळधार पाऊस पडत असून या भागात धुके आणि पाऊस असा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे सध्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस उरले असताना रान हळद म्हणजे चवर जातीच्या फुलांचा बहर पठारावर पाहायला मिळत आहे यामुळे कास पठार पांढरे शुभ्र पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रजातीची दीडशे गुण अधिक दुर्मिळ प्रजातीची रंगीबेरंगी फुले दरवेळी कास पठारावर पाहायला मिळतात..यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलांचा हंगाम सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या ठिकाणी सध्या रान हळद आणि वाय तुरा या दोन फुलांचा भर सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा जाळीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून कास पठार समितीच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत अतिदुर्गम भागात असलेल्या मुरकुटडोह आणि दंडारी परिसरात मलेरियाचा प्रकोप सुरूच आहे. मागील दहा 12 दिवसांत एकूण 57 लोकांना मलेरिया संक्रमण झाल्याची नोंद झाली आहे. यानंतर अतिरिक्त आरोग्य यंत्रणा कामाला लावून मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी अभियान राबविले जात आहे. गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण येथील मलेरिया संक्रमणाच्या परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये आतापर्यंत एकूण 57 मलेरिया संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 11 रुग्णांवर दवाखान्यात औषधोपचार सुरू आहे. 46 रुग्णांवर औषधोपचार पूर्ण करून दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली... या घटनेनंतर आता परिसरात उपचारासाठी व जनजागृती करण्याकरिता 20 लोकांचा आरोग्य पथक दाखल झाला असून युद्ध पातळीवर लोकांमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात अल्मेडा सिग्नलजवळ पहाटेच्यावेळेस साहिल फर्निचरच्या गोडाऊनला लागली आग. आग लागण्याचे कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवण्यात यश. या घटनास्थळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. धोम धरणातून 4966 इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला आहे..धोम धरण सध्या 89 टक्के भरले आहे. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख, राजू ठोंबरे अशी त्यांची नावं असून त्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला आणले आहे.
Maharashtra Weather Updates: राज्यातील बहुतांश भागाला मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) अक्षरशः झोडपून काढलं असून अनेक भागात पावसाने रौद्ररूप धारण केल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आज (1 ऑगस्ट) देखील राज्यात पावसाचा जोर कायम असून विदर्भ, मराठवावाडा मध्य महाराष्ट्र्र, कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळणार (Maharashtra Rain News) असल्याचा अंदाज आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
धुळे शहरासह जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीनंतर धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला आला पुर
पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातील दोन पूल गेले पाण्याखाली
प्रशासनातर्फे दोन्ही पूल वाहतुकीसाठी करण्यात आले बंद..
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi Instagram Video) यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ शेअर करत जंतर मंतरवर त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख केला. मात्र, मुलांना माफ करायचंय, असं देखील मोदी म्हणाले. देश पुढं जातोय, मुलांनी पुढं जावं यासाठी सोबत येऊन काम करु, असं मोदी म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
भाजपचे सरकार हे 2047 पर्यंत राहणार असून हे सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पाठीशी प्रचंड ताकद लावून विकसित महाराष्ट्र बनविण्यासाठी आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अलिबागमध्ये केलं. काल अलिबाग येथे भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी बोलताना जनतेत राहून जनतेची कामे करा आणि पक्ष संघटन वाढवा असे ही आवाहन बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांनी कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांकडून आलेल्या तक्रारी स्वीकारल्या. या तक्रारीचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्यसभा माजी खासदार धर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत
रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंबा घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांचे आदेश. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू, आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील भाग . रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आला
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना