Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्करLast Updated: 02 Oct 2026 02:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त. मुंबई ईडीकडून PMLA अंतर्गत 211 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त. महाराष्ट्रासह 9 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील...More

दिवेआगार दुर्घटना प्रकरणी विनर्स ऍकॅडमी सील; विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई

दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे.


या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.


सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.


त्यानुसार मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.

Continues below advertisement
जल जीवन मिशन विभागाच्या विरोधात तरुणाचा आक्रोश; पाण्याच्या टाकीवर चढून सुरू केलं "शोले आंदोलन"

गावासाठी पाण्याची टाकी बांधली मात्र ती लिकेज असून, अद्यापही विद्युत पुरवठा न योजनेसाठी मिळाला नसल्याने मेहकर तालुक्यातील नागापूर येथील तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. तीन वर्षापासून जल जीवन मिशन ने पाण्याची टाकी बांधली आहे कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदार फरार झाला आहे. अद्यापही गावातील नागरिकांना या योजनेचा फायदा होत नसून गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही तात्काळ प्रशासनाने विद्युत पुरवठ्याची जोडणी करून गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी हे शोले स्टाईल गावातीलच दीपक गायकवाड या युवकाने हे  आंदोलन सुरू आहे.

Continues below advertisement
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.