Maharashtra LIVE Updates: 'हैद्राबाद गॅझेटीयर'वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता; बंजारा समाजाची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील बातम्या आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं

रोहित धामणस्कर Last Updated: 08 Sep 2025 06:29 PM

पार्श्वभूमी

पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजासाठीच्या बैठकांचे सत्र. सरकारच्या जीआर मुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक.. तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही 9 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित...More

मीरा भाईंदरमध्ये भव्य अत्याधुनिक हॉस्पिटल उभारणीला मान्यता!

मिरा-भाईंदर :  मीरा भाईंदर शहरासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी.  शहरात पहिल्यांदाच ५५०० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर आधुनिक सुविधा असलेले भव्य हॉस्पिटल उभारले जाणार आहे. मीरा रोड येथील आरक्षण क्रमांक ३०२ मध्ये या प्रकल्पाची उभारणी होणार असून, शहरातील आरोग्यसेवेचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावणार आहे.


हॉस्पिटलची वैशिष्ट्ये :


 ३७७ बेड – सर्व सुविधांसह रुग्णांसाठी निवासाची उत्कृष्ट व्यवस्था


५५ ऑपरेशन थेटर – अत्याधुनिक उपकरणांसह शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सुविधा


 डॉक्टर व नर्सेससाठी निवास व्यवस्था
१४ मजली भव्य इमारत


मेडिकल कॉलेज देखील सुरू होणार – शिक्षण आणि आरोग्य सेवा यांचा संगम


 TDR (Transferable Development Rights) योजनेच्या माध्यमातून निधी उभारणी


महानगरपालिकेच्या एका रुपयाचा खर्च नाही – संपूर्ण प्रकल्प खासगी आणि सार्वजनिक सहभागातून


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली त्यांनी सांगितले की, “हे हॉस्पिटल संपूर्ण तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल आणि नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे मोठे पाऊल ठरेल.”ही योजना शहराच्या आरोग्य क्षेत्रासाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असून, मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा ठरेल.


बाईट : प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री)