Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live blog updates : सतत बदलत्या वातावरणाचा परिमाण कोकणातील भात शेतीवर होतोय. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच, फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांना शरण आला आहे. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'पोलीस निरीक्षक बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला' असा गंभीर आरोप केला होता. याच संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेऊयात. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
अहिल्यानगर मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन
अहिल्यानगर मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन
सोलापुरातील डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला
रत्यावर टायर जाळल्याने पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणारू वाहतूक पूर्ण खोलंबली
मागील अर्धा तासापासून रास्ता रोको सुरु असल्याने गाड्यांच्या लांबचं लांब रांगा पाहायला मिळतायत
ज्या गावगुंडानी हा हल्ला केलाय त्यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी मागणी DPI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलीय
राज ठाकरे एक्शन मोडवर; थेट शाखद्यक्षांकडून मागविला अहवाल
राज ठाकरे एक्शन मोडवर; थेट शाखद्यक्षांकडून मागविला अहवाल
१ मार्च च्या मोर्चाआधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सूरु
मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश
येत्या तीन दिवसात या याद्यांमधील घोळ विभागध्यक्षांमार्फत राज ठाकरेंना सांगण्यात येणार



















