Maharashtra Live Blog Updates: जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू!
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरावालीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज रात्री मनोज जरांगे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. सरकारकडूनही मनोज जरांगेंना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी आनंदात आणि जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणराया विराजमान झाले आहेत. त्यानुसार, गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा सध्या सगळीकडे सुरु आहे. या निमित्ताने राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
सर्वोच्च न्यायालयाकडून अरुण गवळी यांना जामीन मंजूर
सर्वोच्च न्यायालयाकडून अरुण गवळी यांना जामीन मंजूर
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन
अरुण गवळींना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील प्रलंबित
17 वर्षे अरुण गवळी कारागृहात, वय 76 याचा विचार करून जामीन मंजूर
न्या एम एम सुंदरेश आणि न्या कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर
वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून जामीन
मुसळधार पावसानं घराची भिंत कोसळून पाच जनावरांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
भंडारा : आज आलेल्या मुसळधार पावसानं एका घराची भिंत कोसळली. या घटनेत एक गाय आणि चार शेळ्यांचा (बकऱ्या) मृत्यू झाला. तर एका महिलेसह एक गाय गंभीर जखमी झाली. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील निलागोंदी या गावात घडली. गंभीर जखमी महिलेला तातडीनं साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोसळलेल्या भिंतीचा मलबा काढून मृत आणि जखमी जनावरांना त्यातून बाहेर काढून जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले. वैशाली वंजारी (35) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नावं आहे.























