Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.

मुकेश चव्हाण Last Updated: 16 Jul 2025 06:31 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस उरले आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी...More

चोरी केलेल्या रिक्षेवर घरखर्च भागवण्याचा प्रकार — पोलिसांनी आरोपीला रंगेहात केली अटक

Anchor:-"कामधंदा नाही, पैसेही नाहीत... मग घर चालवायचं कसं?" या प्रश्नाने त्रस्त झालेल्या एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडत अनोख्या प्रकारे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. कल्याण शहरातून रस्त्यावर उभी असलेली एक रिक्षा चोरी करून तीच रिक्षा चालवत तो प्रवासी भाडे घेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार फार काळ लपून राहिला नाही.


कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करताना संशयास्पदपणे रिक्षा चालवणाऱ्या या तरुणाला अडवले. चौकशीत चोरीचा प्रकार उघड झाला आणि पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.  आरोपीचे नाव आशिष मोरे असून तो कर्जतजवळील भिवपुरी परिसरात राहतो.
आशिष याच्याकडे कोणताही  रोजगार नव्हता. आर्थिक तंगी वाढल्याने त्याने चक्क कल्याण शहरातील एक रिक्षा चोरी केली आणि त्याच रिक्षेतून प्रवासी सेवा देत दिवस काढू लागला. मात्र, संबंधित रिक्षा मालकाने चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेत त्याला रिक्षात प्रवासी बसवत  असतांना महात्मा फुले पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.