Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...

Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाण Last Updated: 05 Sep 2025 04:14 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog Updates: आम्ही आरक्षण दिलं होतं, ज्यांनी टिकवलं नाही त्यांना प्रश्न विचारा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाते प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला...More

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, उद्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकींवर पावसाचे विरजण? 

नाशिक : कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्याला दोन दिवसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील पावसाचे विरजण पहायला मिळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील मंदिरांना पुन्हा पाण्याने वेढा दिल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे नदी- नाले , ओढे दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.