- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: खारघरमधील अधिराज टॉवरमधील 55 व्या मजल्यावर लागली आग
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: सरकारला "दगाबाज रे..." म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी...More
Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37 येथे अर्ध्या तासापूर्वी आग लागली आहे. अधिराज टॉवरला आग लागल्याची प्राथमिक माहिती. तळोजा जेल जवळ संबंधित टॉवर असून 55 व्या मजल्याला आग लागली आहे.
वैचारीक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत…
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची समाज माध्यमांवरील पोस्ट चर्चेत
मागील अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या नेत्यांची एकमेकावर टीकास्त्र सुरू आहे
हे टीकास्त्र सुरू असताना एका कार्यक्रमाला जाताना भाजप चे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आजूबाजूच्या सीट वर, तर भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन हे मागच्या सीटवर
केशव उपाध्ये यांनी फोटो पोस्ट करत लिहिले आहे, वैचारीक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत…
त्यामुळे एकमेकांवर टीका करणारे प्रवक्ते एकत्र प्रवासात काय गप्पा आणि चर्चा करणार हे विशेष
मुंबई : २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती.
त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा सज्ज होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महासभा यंदा आणखी भव्य, प्रभावी आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
या सभेत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार, मनुवादाविरोधातील भूमिका आणि लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन याची चर्चा केली जाणार आहे. देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या मुंबईकडे रवाना होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
जिल्ह्यातील चार गावात आज केंद्रीय पथकाने भेटी देतं पाहणी केल्याची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती
जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले होते, यामध्ये इन्फ्रास्टर्चरचे नुकसान देखील मोठे झाले
या इन्फ्रास्ट्रक्चर नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने केली
दरम्यान मोहोळ तालुक्यात रात्री अंधारात केलेल्या पाहणी बद्दल देखील जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
रात्री झालेली पाहणी ही अचानक ठरलेली होती, पाहणी दौरा आज ठरलेला होता
मात्र पथक रात्रीचं पोहोचले होते त्यांनी अचानक इच्छा व्यक्त केली
त्यामुळे मोहोळ तालुक्यातील कोळेगाव ज्या ठिकाणी झाडावर अडकलेल्या लोकांची सुटका केली होती ते गाव आम्ही त्यांना दाखवलं
गावात पथकाने शेतकऱ्यांशी ग्रामस्थांशी देखील संवाद साधला
इन्फ्रास्ट्रक्चर नुकसानीची पाहणी करणे हा मूळ उद्देश या पथकाचा आहे
ग्रामस्थांशी संवाद जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने साधला आहेच
महिलांच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करणे तिघांच्या अंगलट
इमारतीच्या पार्कींमध्ये फटाके वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास फटाके वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवर तिघांवर गुन्हा दाखल
भारतीय न्याय संहिता कलम 223, 115, 292, 115(2), 352, 351(2) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(आर) आणि 131 अंतर्गत वडाळा टी टी पोलिसांची कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागात केंद्रीय पथकाकडून पाहणी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचले
काल रात्रीच्या सत्रात मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे केंद्रीय पथकाने पाहणी केली
अंधारात पाहणी केल्याने केंद्रीय पथकावर सर्व स्तरातून टीका होत आहे
त्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात केंद्रीय पथक पाहणी करणार आहे
हत्तूर गावात आनंदनगर तांडा या ठिकाणी संपूर्ण रस्ता वाहून गेलाय
भिवंडीत सात महिन्यांच्या अखंड पावसाला आता विराम मिळाल्याचे चित्र आज सकाळी दिसले. हवामानाने अचानक करवट घेतली आणि संपूर्ण शहरावर दाट धुक्याची चादर पसरली. सकाळच्या वेळी दृश्यता इतकी कमी झाली होती की वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट लावूनच वाहनं चालवावी लागली. सलग पावसाच्या ओलसर वातावरणानंतर आज पहाटेची थंडगार हवा आणि दाट धुक्याने भिवंडीत हिवाळ्याची सुंदर चाहूल लागली आहे.
Pune : अखेर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्या ला ठार करण्यात वन विभागाला यश आलंय, रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोन मध्ये दिसला. नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला गेला, डार्ट मिस झाला. मात्र यामुळं सावध झालेल्या बिबट्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावरती तीन राऊँड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. ६ वर्ष वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलं. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि ठस्यांवरून स्पष्ट झालं आहे.
शिवसेना खा.श्रीकांत शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर.
मेहकर येथे शिवसंकल्प पदाधिकारी शिबिर घेणार. शिबिरात अनेक शिवसेना मंत्र्यांची हजेरी असणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व शिवसेना कुणाची..? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिबिराला महत्त्व.
आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शेतकरी भवन येथे "शिव संकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर" आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून खा श्रीकांत शिंदे,मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, संजय राठोड हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आणि शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची...? आगामी काळात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला विशेष महत्त्व आहे. खासदार श्रीकांत शिंदे या शिबिरात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल.
एकट्या मुलीला पाहून विकृताचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने तेथेच त्याची धुलाई करत माज उतरवला
विकृत कर्नाटकातील रहिवासी; क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर शहरात मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या 17 वर्षीय मुलीला पाहून एका विकृत कार चालकाने अश्लील इशारे केले. मुलीने त्याकडे दुर्लक्ष करत तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरू केला. मुलीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांना सांगितल्यावर दामिनी पथकही आले. मग त्यांच्यासमोर विकृत गयावया करायला लागला. संतप्त तरुणीने मात्र तेथेच त्याची धुलाई करत माज उतरवला. याप्रकरणी मूळ कर्नाटकचा असलेला खिवाराम कानाराम देवासी याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील मुलगी इतर जिल्यातून शहरात शिकण्यासाठी आली आहे .
पुण्यातील बाजीराव रस्त्यावर झालेली हत्या ही पूर्वीच्या वादातून झाल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. तीन आरोपी आणि हत्या झालेला मयंक खराडे हे सगळे पार्वती परिसरात राहतात. त्यांच्या मागील काही दिवसांपासून वादवादी सुरु होती. हाच वाद टोकावर गेला आणि भरदिवसा कोयत्याने हल्ला करुन मयंकची हत्या करण्यात आली. मयंक हा १७ वर्षाचा होता. अटक करण्यात आलेले आरोपीदेखील अल्पवयीन आहेत.
उद्धव ठाकरे आजपासून ४ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार, तर सरकारनं जाहीर केलेली मदत शेकऱ्यांपर्यंत पोहोचली का? याचा आढावा घेणार..
मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळाला...सोलापुरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकानं पाहणी केली....सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली..धक्कादायक म्हणजे रात्रीच्या अंधारात ही पाहणी करण्य़ात आली...त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात पथकातील अधिकाऱ्यांना पाहणीचा कोणता उजेड पाडलाय हे कळण्यास मार्ग नाही, तर पथक हे आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, हत्तूर त्यानंतर मोहोळ तालुक्यातील शिवणी, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे या गावना भेटी देतं ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. पुढे हेच पथक धाराशिवला रवाना होईल.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: खारघरमधील अधिराज टॉवरमधील 55 व्या मजल्यावर लागली आग