Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर

Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाण Last Updated: 04 Sep 2025 05:55 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog Updates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द...More

GR मुळे ओबीसी वर अन्याय होणार एस वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे ,आम्ही तपासून पाहू :पंकजा मुंडे

मराठा आरक्षणाच्या GR वर मंत्री पंकजा मुंडे यांच महत्वच विधान 
 
मला हे वाटत ते आधी ही वाटत आले आहे आणि पुढे ही तेच वाटत राहील त्यात बदल होणार नाही.


आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे.


मराठा समाजासाठी GR काढला तर ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती ही काढली आहे.


राज्य सरकार यावरून सुवर्ण मध्य काढला जाईल ही प्रार्थना केली आहे 


सगळे समाज आनंदात नांदावे ही इच्छा व्यक्त करते 


सामाजिक मागासलेपण असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल असा विश्वास आहे


GR मुळे ओबीसी वर अन्याय होणार एस वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे . आम्ही तपासून पाहू .


ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आमचा ओबीसीना आहे