Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारने बुलडोझर चालवला. पाचही जणांचा लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर...More
नाशिक : शहरातील देवळाली येथील कुस्ती मैदानामध्ये काही संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्यांची चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार रस्त्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर आणि या पोलिसांमध्ये झटपट झाली आणि त्यातच एका संशयिताने खिशात ठेवलेल्या गावठी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्याच्या थेट मांडीमध्ये घुसली. या झटपटीमध्ये इतर संशयित पळून गेले आणि सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी त्यांना पकडले. जखमी संशयिताला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून इतरांकडून एक बंदूक, एक कोयता, दोरी आणि दरोडेसाठी लागणारे साहित्य पोलिसांना मिळून आले आहे. हे सर्व ताब्यात घेतलेले संशोध रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पुढील तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरलेत. मुळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकल्या जात असून, या प्रकल्पांमुळे नद्यांची वहन क्षमता कमी होणार आहे. 100 हून अधिक संघटनांनी शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशान भूमी असा लाँग मार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना सुद्धा हा प्रकल्प राबविला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप बघायला मिळतोय.
दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन या नदीसुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत , नागरिकांचा या प्रकल्पाला होणारा वाढता विरोध पाहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना हे काम थांबविण्याच्या सूचना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बीड : नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जवळील कामखेडा येथे नियोजित विमानतळाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आढावा देखील घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विमानतळाची घोषणा केली होती. कामखेडा येथे नियोजित विमानतळ होणार आहे. दीड किलोमीटर लांब आणि 45 मीटर रुंदीची धावपट्टी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यानंतर नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
Akola : अकोल्यात आज भाजपच्या पश्चिम विदर्भाच्या संघटनात्मक बैठकीला सुरूवात झालीये. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये. अकोल्यालगतच्या बाभूळगाव येथील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही बैठक सुरू झालीये. भाजपच्या संघटन पर्व कार्यक्रमानिमित्त चव्हाण सध्या राज्यव्यापी गाव, वस्ती संपर्क अभियान राबवतायेत. आजच्या अकोल्यातील संघटन बैठकीला पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा, खामगाव, पुसद,अचलपूर, अकोला ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण अशा संघटनदृष्ट्या 9 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेयेत. या बैठकीला सर्व 9 जिल्ह्यांतील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर महत्वाचे असे महत्वाचे 1200 पदाधिकारी उपस्थित आहेयेत. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील व्युहरचनेवर या बैठकीत चर्चा होणारेय. या कार्यक्रमानंतर रविंद्र चव्हाण गाव, वस्ती संपर्क अभियानांतर्गत पातूर तालुक्यातील गोंधळवाडी या आदिवासी गावाला भेट देत आदिवासींसोबत संवाद साधणारायेत.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्य टीका केली होती आणि आज याबाबत त्यांनी विधानावर ठाम असून पोलिसांची दिलगिरी मागतो असे स्पष्ट केलं यावर ठाकरे कटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्यात की ही सरकारची नामुष्की आहे आधी पोलिसांचा खच्चीकरण करायचा आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची यावर खरंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रत्नागिरीतील सावर्डे मध्ये आगमन.
महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे मंगल कलश आणि मंगल मृदा कलशाचे अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन.
सावर्डे मधील सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये अजित पवार यांचे आगमन.
मंत्री अदिती तटकरे आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत.
सावर्डे येथील कार्यक्रमाच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणाला देणार भेट.
पुण्यातील कल्याणी नगर पोर्श अपघात प्रकरणातील
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या शिवानी अग्रवाल ला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलाय
मात्र दर बुधवारी 11 ते 1 या वेळेत येरवडा पोलीस ठाण्यात हजर रहाणे आणि स्वतःच्या मोबाईलची लोकेशन सतत सुरू ठेवावे या अटी न्यायालयाने घातले आहेत
त्यानुसार शिवानी अग्रवाल यांना दर बुधवारी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये हजर राहावे लागत आहे
पिंपरी चिंचवड आणि पुणे यांच्या सीमेवर असलेल्या मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करत नदी भोवताली असलेले वृक्ष संपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप करत, आज हजारो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले. याचं आंदोलनात सिनेअभिनेते अन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे ही उपस्थिती लावणार आहेत. विकासाच्या नावाखाली शहरातील सर्वच नद्यांची पात्र अरुंद केली जात असून नद्यांच्या भोवताली असलेली वृक्षसंपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय.
गडचिरोली : गेल्या पाच दिवसांपासून छत्तीसगडच्या कर्रेगट्टा जंगलात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी ऑपरेशनला मोठे यश आले आहे. कर्रेगट्टाच्या टेकड्यांवर एक हजार नक्षलवादी लपून बसतील, अशी गुहा सापडली आहे. विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या टेकड्यांमध्ये नक्षलवाद्यांवर गेल्या 5 दिवसांपासून ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दलाच्या कठोर परिश्रमानंतर आणि 45 अंश तापमानात, सैनिक अखेर नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या एका ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु सैनिक तेथे पोहोचण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी त्यांचे लपण्याचे ठिकाण बदलले आहॆ. तेथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीचे खूणा सापडले आहेत. या गुहेत एक हजाराहून अधिक नक्षलवादी अनेक दिवस आरामात आश्रय घेऊ शकतात.
गुहेच्या आत पाण्यापासून ते विश्रांतीच्या सुविधांपर्यंतच्या सुविधा आहेत. गुहेच्या आत एक खूप मोठे मैदान देखील आहे. या नक्षलवादी गुहेचे फोटो आणि व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. दरम्यान या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून शनिवारी अभियानादरम्यान तीव्र उन्हामुळे तब्बल 40 जवानांना डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला. त्यांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तेलंगणातील भद्राचल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अभियानात जवळपास पाच ते सात हजार सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले असून 500 ते 600 नक्षलवादी जंगलात लपून बसल्याची माहिती आहे.
गडचिरोली : अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कटेझरी गावात स्वातंत्राच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच शनिवारी बस दाखल झाली. पोलीस दलाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या बस बघण्यासाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यासारख होत. यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले. सकाळी संपूर्ण गावकरी पहिल्यांदा येणाऱ्या या बसची आतुरतेने वाट बघत होते. बसचे गावात आगमन होताच वाद्य वाजवत मिरवणूक काढली. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते चालक व वाहक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या बसचा विद्यार्थी, वयोरुद्ध नागरिक, रुग्ण आणि कटेझरीच्या नागरिकांसोबत परिसरातील 8 ते 10 गावांना या बसमुळे फायदा होणार आहे.
गडचिरोली : अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कटेझरी गावात स्वातंत्राच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच शनिवारी बस दाखल झाली. पोलीस दलाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या बस बघण्यासाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यासारख होत. यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले. सकाळी संपूर्ण गावकरी पहिल्यांदा येणाऱ्या या बसची आतुरतेने वाट बघत होते. बसचे गावात आगमन होताच वाद्य वाजवत मिरवणूक काढली. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते चालक व वाहक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या बसचा विद्यार्थी, वयोरुद्ध नागरिक, रुग्ण आणि कटेझरीच्या नागरिकांसोबत परिसरातील 8 ते 10 गावांना या बसमुळे फायदा होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपच्याच नेत्यांमध्ये दोन गट पडले असून दिग्गज आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल उभे केले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या सोबतीने श्री सिद्धेश्वर बाजार समिती विकास पॅनलचे आव्हान उभे केले आहे.
बीड वाल्मीक कराड अपडेट: वाल्मिक कराडचा सिटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल
रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन साठी दाखल केले होते
यावेळी केलेल्या सिटीस्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली
मात्र याचवेळी काही इतरही तपासण्या करण्यात आल्या त्याचा अहवाल पाहून वाल्मीक कराडला वैद्यकीय उपचारासाठी ऍडमिट करायचे की जेलमध्ये उपचार करायचे हे तज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे
लग्न आटोपून घरी परतत असतांना दुचाकीवरी तिघांना ट्रकने चिरडले.. दोघांचा मृत्यू तर चार वर्षाचा बालक गंभीर जखमी.
घटना नागपुरच्या कुही तालुक्यातील गोंडी फाटा येथे झाली..
किशोर मेश्राम हा आपली काकू गुणाबाई मेश्राम व सार्थकसोबत दुचाकीवर होता... समोरच्या वाहनाने जागीच ब्रेक मारल्याने किशोरचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व बाजूला येणार ट्रक मध्ये दुचाकी गेली..घटनेत गुणाबाई व किशोर जागीच मृत्यू झाला
जखमीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे ...
वसमतमध्ये आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी वसमचे आमदार राजू नवघरे यांच्या मंत्रिपदाबाबत सूचक विधान केलेल आहे.
पाच वर्षाच्या काळामध्ये अडीच वर्षानंतर नवख्या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली जाईल मी दिलेल्या शब्द कुठेही बदललेला नाही, असे म्हणत आमदार नवघरे यांच्या मंत्री पदाबाबत अजित पवार यांनी सूचक विधान केलेला आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले, "ते नेहमीच अशा प्रकारचे द्वेषयुक्त भाषणं देत असतात. माझ्या मते त्यांच्या वक्तव्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही. देशाचे पंतप्रधान देश घडवण्यासाठी काम करत आहेत, पण नितेश राणे देश तोडण्याचं काम करत आहेत. कधी म्हणतात कुणाकडून काही खरेदी करू नका, तर कधी काहीतरी वेगळंच बोलतात. आदिलने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. काश्मिरी मुस्लिम देशाच्या बाजूने उभे आहेत. पाहिल्यांदाच असं झालं आहे की देशातील मुस्लिम पाकिस्तानवर इतके संतापलेले आहेत. प्रत्येक मशिदीतून, प्रत्येक मदरशातून पाकिस्तानवर टीका केली जात आहे, हे पहिल्यांदाच घडत आहे. संपूर्ण मुस्लिम समाज देशाच्या पंतप्रधानांसोबत उभा आहे..." असे देखील प्यारेखान म्हणाले
नांदेडमध्ये कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या तिळाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय, नायगांव तालुक्यातील देगांव इथल्या विठ्ठल मोरे या शेतकऱ्यांने दोन एकर मध्ये तिळाची पेरणी केलीय. तीन महिन्यांच्या काळात काढणीला येणाऱ्या तिळाला फक्त चारदा पाणी द्यावे लागते. रासायनिक औषध आणि खतांचा फारसा वापर त्यासाठी करावा लागलेला नाही. तसेच बाजारात बारा ते चौदा हजार रुपये क्विंटल या दराने तिळाची विक्री होते. एकरी सहा ते सात क्विंटल इतके उत्पादन तिळाचे होत असल्याने उन्हाळ्यात हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितलं.
पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री एकनाश शिंदेंची समज, लोकप्रतिनिधींच्या तोंडी आक्षेपार्ह वक्तव्य शोभत नाही, बोलताना काळजी घ्या, शिंदेंची ताकीद
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर