Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स...

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

मुकेश चव्हाण Last Updated: 26 Apr 2025 08:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. राज्य सरकारच्या शोधमोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक असून फक्त 51 लोकांकडेच वैध...More

बीड जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित 

बीड ब्रेक: जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित 


दक्षता पथकाच्या तपासणी दरम्यान आढळला होता गैरप्रकार 


अहवाल आल्यानंतर आज निलंबनाचे आदेश 


वाल्मीक कराडसह संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात 


कारागृह प्रशासनावर आरोप झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून गंभीर दखल 


वारंवार केली जात आहे तपासणी


सीमा गोरे असं निलंबित झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तर डी.डी. कवाळे असे वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याचे नाव


डी.डी.कवाळे यांनी नुकताच स्वीकारला होता पदभार