Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा
Maharashtra Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय घडतंय? नागपूरमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: नागपूरमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. काही भागांमध्ये संचारबंदी अजूनही कायम आहे. ही संचारबंदी टप्याटप्याने शिथील करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पंतप्रधान...More
मुंबई : दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. यामुळे आता शहरातील इतर कबुतरखाने देखील हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दादर येथे हा कबुतरखाना असून, येथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला असून, विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत आहे. कपडे सुकविण्यासाठी लावलेल्या दोऱ्यांवरही कबुतरांचा कब्जा असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रश्नाची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
यासंदर्भात महापालिकेच्या हेरिटेज विभाग, आरोग्य विभाग आणि परिरक्षण विभागाची २५ मार्चला बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. तरीही हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
- नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
- देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार
- ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
- शहर विकास तसेच कुंभमेळा संबंधित बैठकांत सर्व पक्षांच्या सदस्यांना सामील करून घ्यावे यासाठी दिले निवेदन
- नाशिक शहरातील विकास कामे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे गटांने दिला होता फडणवीस यांना नाशिक मध्ये पाय न ठेवू देण्याचा इशारा
- मात्र पोलिसांच्या मदतीने फडणवीसांची भेट घेतल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती
- आंदोलन न करता भेट घेऊन निवेदन दिले
- मागणी मान्य न केल्यास सर्वसामान्य जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष सुरू असताना आता महायुतीतील शिवसेनेचे दोन आमदार एकमेकांच्या समोर आले आहेत... कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या हद्दवाढीला समर्थन दिलं आहे.... तर त्याचवेळी करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र शहराच्या हद्दवाढीला कडाडून विरोध केला आहे... आज कोल्हापूर शहरामध्ये हद्दवाढीच्या समर्थनार्थ आणि हद्दवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.... उद्या याच मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे... या बैठकीमध्ये देखील आपली बाजू ठामपणे मांडण्याचा निर्धार या लोकप्रतिनिधींनी केला आहे... त्यामुळे आत्तापर्यंत गाव पातळीपर्यंत सुरू असलेला हा संघर्ष आता आमदारांच्या संघर्षापर्यंत पोहोचला आहे.....महायुतीतील चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांतदादा पाटील दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... आता मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीत शहराच्या हद्दवाढ संदर्भात आणि प्राधिकरणाच्या संदर्भात कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे....
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्याती वरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्यात कांदा पिकाची लागवड जास्त झाली आहे व पोषक हवामान असल्याने उत्पादन जास्त होणार आहे.त्यामुळे कांद्याच्या भावात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून कांदा पिकावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला निर्यात शुल्क हटवण्याच्या बाबत विनंती केली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी लक्षात हे निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. १ एप्रिल २०२५ पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री श्री रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित जी शहा, कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले.
मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवण्याच्या सरकारच्या निर्देशांचा गैरफायदा घेत सायबर फसवणुकीच्या नव्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आधी बनावट लिंकद्वारे फसवणूक केली जात होती. मात्र, आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ तयार केले असून, त्याद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी ५ मार्च रोजी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता अधिक गंभीर पाऊल उचलत थेट सरकारी संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ या नावाने हे संकेतस्थळ उभारण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. प्राथमिक तपासणीत हे संकेतस्थळ राजस्थानमधून चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
खेडमधील धनगर वस्तीमध्ये भीषण वणवा लागल्याची घटना घडली आहे. भीषण वणव्यात धनगर वस्तीमधील चार घारे जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवित हानी नाही, मात्र घरातील कपड्यांसह धान्य, जळाले आहेत. खेडमधील खोपी गावातल्या धनगर वस्तीमधील घटना आहे. उन्हाळ्यात पाणी नसल्याने इतरत्र स्थलांतरित झालेली चारही कुटुंबे बचावली. चारही घरे वणव्याच्या भक्षस्थानी आल्यामुळे ढेबे परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे, काल संध्याकाळची घटना आहे.
Akola : अकोल्यात एका सायकलच्या दुकानातून 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानात खदान पोलिसांनी ही कारवाई केलीय.. यावेळी त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. संबंधिताला या रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला याबाबत माहिती दिलीये. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ही कारवाई करण्यात आलीय. दीपक घुगे नामक व्यक्तीजवळ पांढर्या रंगाच्या दोन कापडी पिशव्या होत्या. त्यामध्ये 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होतेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करतायेत.
Raigad News: रायगड मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण होईल अस कृत्य करणाऱ्या एका 80 वर्षीय व्यक्तीला रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.म्हसळा तालुक्यातील संदेरी गावात राहणारा या आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे या दुकानात गेलेल्या एका तीन वर्षीय मुलीसोबत या आरोपीने गैरवर्तन केले यानंतर तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्यावरून तिच्यासोबत गैरवर्तन केला.यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने आपल्या वडीलांना सांगितला यानंतर संतप्त मुलीच्या वडिलांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट मधून या मुलीवर अत्याचार झाल्याचं उघड केले. यानंतर या आरोपीवर बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी हमजा यासीन दाभीळकर याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाम मध्ये?
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमधून ४०० कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केलेल्या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) समांतर तपास
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याची तपास यंत्रणांना माहिती
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ परिसतील कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी एक हजार ८३६ किलो मेफेड्रोन जप्त केले होते
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन हजार ६७४ कोटी रुपये आहे
पुण्यात अवघ्या तीन महिन्यात वण्व्याच्या तब्बल 323 घटना
पुणे शहराचे उपनगरा मधील डोंगररांगात वणवेच वणवे
वाढत्या उन्हामुळे जंगल पेटत असताना वनविभाग कधी कारवाई करणार यावर प्रश्न
मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे डोंगर रांगात भडकणार वणवा हे उन्हाळ्यातील हे चित्र नित्याचे
मात्र प्रशासन हतबल असल्याचे वारंवार लागणाऱ्या यामुळे स्पष्ट होत आहे
पुणे शहरातील कात्रज भागातील दोन्ही बोगद्यांचा मध्यभाग, तळजाई टेकडी तसेच पाषाण टेकडी या ठिकाणी अनेक घटना समोर
Mumbai: शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
Bhandara : भंडाऱ्याच्या साकोली येथील मोनो ऍग्रो इंडस्ट्रीजच्या बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या सुमारास एका बिबट्यानं प्रवेश केला. यानंतर तिथं धुमाकूळ घालीत बिबट्यानं कोंबड्यांवर झडप घालून १२ कोंबड्या फस्त केल्यात. पोल्ट्री फॉर्ममधील बिबट्याचा संपूर्ण धुमाकूळ आणि थरार तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरायला जातात. त्याचं भागात असलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालून कोंबड्या फस्त केल्याची घटना घडल्यानं फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. वन विभागांनं बिबट्या असो किंवा वन्यप्राणी यांचा तातडीनं बंदोबस्त लावावा, अशी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला होता.त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे हे खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी मुंबईहून आले होते.पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज येथे त्यांना रोखले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबाहेर रवानगी केली.
दरम्यान,प्रशासनाने कबरीच्या सुरक्षेचे कवच आणखी वाढविले असून, कबर परिसरातील संरक्षक भिंत आणि पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावण्यात आली आहे.त्यामुळे आतमध्ये कोणीही जाऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
कराड शहरातील भेदा चौकात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉस्पिटलमध्ये
भेदा हॉस्पिटलचे ट्रकने लोखंडी गेट तोडले
रात्री साडेबारा वाजता घडला अपघात
पार्किंगला असलेल्या दोन दुचाकींचे नुकसान
अपघातानंतर ट्रक चालक फरार
सिमेंट घेऊन जाणारा ट्रकचा अपघात
पोलिसांनी घटनास्थळावरील लोकांना हटकले
ट्रक अद्याप घटनास्थळी उभा
अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी
दुसऱ्या एका ट्रकलाही पाठीमागून ट्रकने धडक दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते त्र्यंबकेश्वरला रवाना होत आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रंबक मधील काही भागांची पाहणी देखील करण्याची शक्यता आहे. यानंतर नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार आहेत.
मुंबईतील आदिवासींचे सर्वेक्षण केले जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. १५ एप्रिलपासून होणार सर्वेक्षण. मुंबई उपनगरातील २२२ आदिवासी पाड्यांमध्ये होणार सर्वेक्षण. वारली, कातकरी, कोकणीसह पाच जातींना लाभ देणार. पीएमजन मन योजनेअंतर्गत मोफत शिधा वाटप करणार. मूळ आदिवासीमधील संपूर्ण कुटुंबाला मोफत धान्य देणार
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं आज अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री योगेश कदम आज घेणार बच्चू कडू यांची भेट. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिव्यांग बांधवांसाठी बैठक घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून आंदोलनातील उपस्थिताना ग्वाही. आंदोलनकर्त्याकडून मुख्यमंत्री यांचा फोन येताच जल्लोष. बच्चू कडू आज शेवटच्या दिवशी अन्नत्याग आंदोलनातून मांडणार भूमिका. दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याची बच्चू कडू यांची फडणवीस यांना फोनवरून विनंती
पाटण तालुक्यातील वांग- मराठवाडी धरणामुळे 15 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मेंढखुर्द- शिवाजीनगर येथील गावठाणात स्थलांतरित धरणग्रस्तांची रस्ते, बंदिस्त गटरसह अन्य सुविधांसाठी अद्यापही परवड सुरू आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली आसता. त्यांनी तातडीने प्रस्ताव देण्याच्या सूचना सांगली जिल्हाधिकाऱ्यांना केली.
नांदेड जिल्ह्यातील नरसी इथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलाय, या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सभेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात आलाय. आजच्या या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील हे काँग्रेस सोडून अजितदादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
चणकापूर धरणातून सोडलेले आवर्तनाचे पाणी रात्री मालेगावी पोहोचले..या पाण्याने गिरणा नदीवरील कोल्हापूर टाइप बंधारा तुंडुंब भरला आहे..तळ गाठलेला बंधारा भरल्याने नदीकाठावरील १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे..शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून रब्बी पिकांसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले होते. सध्या उन्हाचा प्रकोप वाढल्याने काही गावातील जलसाठे संपुष्टात येत आहेत..त्यामुळे आवर्तनाचे पाणी ठेंगोडा बंधाऱ्यातून पुढे सोडण्यात आले आहे..हे पाणी शहरालगतच्या गिरणा नदीच्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यात पोहोचले.. या आवर्तनामुळे सटाणा, देवळा तालुका सह मालेगाव तालुक्यातील नदीकाठावरील टेहरे, चिंचावड, पाटणे, मुंगसे, रोकडोबा, आघार खुर्द, आघार बुद्रुक आदी गावांना फायदा होणार आहे.
मिरजेत हिंदू मुस्लिम युवा मंच तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु मुस्लिम एकता मंच, मा. समित कदम युवा मंच, जनसुराज्य युवा शक्ती, समीर मालगावे मित्र परिवार तर्फे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीस विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाडच्या माधवनगर भागात मच्छिंद्र शेलार व कुटुंबियांनी यांच्या घराच्या प्रांगणात निपचीत पडलेल्या दुर्मिळ जातीचा पिवळा पिंगळा पक्षाला जीवदान देत वनविभागाचे वनरक्षक सोनाली वाघ व वनसेवक इरफान सय्यद यांच्या स्वाधीन केला.या पक्षावर प्राथमिक उपचार करून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
भिंत कोसळल्याची घटना पहाटे घडल्याने मोठा अनर्थ टळला. मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेत जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहे शिक्षण. मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेतील पाच वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत. 288 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था. पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी घेतात शिक्षण. शाळेच्या भिंतींना पडले आहेत मोठमोठ्या भेगा या सोबतच छत देखील तुटण्याचा मार्गावर. तुटलेल्या छताला लाकडाचा आधार देत त्याखाली विद्यार्थ्यांना दिलं जात आहे शिक्षण. वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्ती होत नसल्याने पालक आक्रमक. भिंत कोसळल्याने पालक आक्रमक मोठी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण पालकांचा संतप्त सवाल.
आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दी संचाबंदी कायम आहे. गणेशपेठ, तहसील, कोतवाली व यशोधरा नगर या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम असून सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री 10 नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असेल. तर नागपूरातील पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली आहे.. दोन पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी आधीच हटवली आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली. संचारबंदी भागात बाजारपेठा , सर्व सरकारी खाजगी आस्थापने पूर्णतः बंद असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा