- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेकडे एका दिवसात साडेतीनशे पेक्षा जास्त खड्ड्यांच्या...More
गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान
राज्यातील १ हजार ८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार अनुदान
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
भांडवली अनुदानापोटी २५ हजार रुपये वितरित करणार
अनुदानासाठी २३ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी अटक केलीये. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. ती मंजुरी मिळताच आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेण्यात आलं. काही वेळापूर्वी बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली, आता थोड्यावेळात त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी अटक केलीये. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. ती मंजुरी मिळताच आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेण्यात आलं. काही वेळापूर्वी बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली, आता थोड्यावेळात त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.
नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंघजी विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. ही विमानतळ या परिसरातील अत्यंत महत्त्वाचे विमानतळ आहे. या विमानतळाचा वापर नांदेड लातूर परभणी हिंगोली यवतमाळ आदिलाबाद निजामाबाद येथील नागरिकांसाठी होतो. विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर खड्डे पडल्याने विमानाचा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यासाठी हे विमानतळ अचानक तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. आता धावपट्टीचे दुरुस्ती झाल्यावर विमानतळ चालू होईल असे सांगितले जात आहे. आधी अंदाजपत्रक बनेल मग निधीची तरतूद मग टेंडर मग दुरुस्ती अशी प्रक्रिया होईल. नांदेड येथून पुणे दिल्ली हैदराबाद बंगलोर या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू होती.
- नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू.....
- नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांना चांगला फायदा होणार आहे....
- नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे पीक धोक्यात आले होते.....
- मात्र शहरात आणि परिसरात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.....
- जिल्ह्यात आणखीन दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.....
पाच मनांच्या गणपती मंडळांची आणि इतर मंडळांची बैठक खासदार मुरलीधर मोहोळ घेत आहेत.
आज पुण्यातील गणपती मिरवणुकीचा वाद संपण्याची शक्यता
आमदार हेमंत रासने आणि बाकी मानाच्या गणपती मंडळांचे अधक्ष उपस्थित आहेत
पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील वाद आज मिटणार का ?
याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळघेत आहेत बैठक
मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता केळकर रस्ता टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू
मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा वाद सध्या सुरू आहे
या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतला मात्र तोडगा निघाला नाही
त्यामुळे आज मोहोळ हे घेतलेल्या बैठकीत तरी तोडगा निघणार का ? याकडे लक्ष आहे
बीड : कधी कंबरेला पिस्तूल लावून हिरोगिरी करणारे तर कधी हवेत गोळीबार करत त्याचा रिल काढणाऱ्या अनेकांवर बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी थेट अटकेची कारवाई केली. त्यानंतर मात्र कोणतेही कारण नसणाऱ्या शस्त्र परवानगी देण्यात आल्याचा आकडा समोर आला. तब्बल 1284 जणांना शस्त्र परवाना देण्यात आल्याचा प्रशासकीय धक्कादायक आकडा बाहेर आला होता. त्यानुसार पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची शिफारस केली.
यातील अनेक जणांनी आयुक्त कार्यालयात धाव घेतली. मात्र बीड मध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी लक्षात घेता आयुक्तांनी 175 जणांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 355 जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यात आणखीन चाचपणी सुरू आहे. कसलेही कारण नसताना शस्त्र परवाना घेऊन हिरोगिरी करण्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
बीड : पैठण येथील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. जायकवाडीचे पाणी बीड जिल्ह्यात दाखल झाले असून गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध राक्षसभुवन मंदिर पाण्याखाली गेले आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढलीय. यामुळे राक्षसभुवन परिसर जलमय झाला असून, प्रशासनाने नागरिकांना मंदिर परिसरात जाण्यास सक्त मनाई केलीय. तसेच नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान अनेक वर्षांनी गोदावरी नदी तुडुंब वाहताना दिसत आहे. तर नदी काठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला असून, भूजलपातळी वाढून विहिरी आणि बोअरवेल्सला पाणी उपलब्ध होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. कालपासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पाटण सह परिसरातील पूर परिस्थिती ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर आला आहे.. सातारा, वाई,कराड या भागातील नद्यांची पाणी पातळी घट झाले आहे.. मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाटाणा घेवडा बटाटा यांसह कडधान्याची ही नुकसान झाल्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे मत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे..
राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढल्या जातंय. अकोल्यातल्या मूर्तिजापुरात देखील गाव गुंडांची धिंड काढण्यात आलीय.. या अट्टल गुन्हेगारांनी अक्षरशः कान पकडून नागरिकांना माफी मागितलीये. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या 5 गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा 'रोड शो' होताय.. सनी दुबे, वैभव कोकाटे, यश केसले, आकाश उईके आणि आदित्य कोकाटे असे या गाव गुंडाची नावे आहे. या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला. आणि यापुढे 'जे कायद्यात राहतील ते फायद्यात राहतील', असा इशारा पोलिसांनी दिलाय.
कोल्हापूरवरचं पुराचं संकट तूर्तास तरी टळलं आहे... कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे...पंचगंगा नदीची पाणीपातळी धोकापातळीच्या खाली आली आहे...43 फूट 3 इंचांपर्यंत पोहोचलेली पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता 42 फूट 10 इंचापर्यंत कमी झाली आहे... त्याचबरोबर काल सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे...त्यामुळे कोल्हापूरकरांना हा मोठा दिलासा मिळाला आहे... कोल्हापूर- गगनबावडा वाहतूक पूर्ववत झाले आहे... तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरची देखील अंशतः वाहतूक सुरू झाली आहे...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप मराठी मतांची मोट बांधणार
गणेशोत्सवाला राज्य दर्जा मिळाल्याच्या धर्तीवर विविध स्पर्धाचे आयोजन करत मुंबईतल्या सार्वजनिक मंडळाना साद घालणार
कोकणात जाणाऱ्यांसाठी मोदी एक्सप्रेसच्या दोन ट्रेन आणि 500हून अधिक बसेस सोडणार
अमरावती : ट्रान्सपोर्टनगर मध्ये भंगारच्या काही दुकानात चोरीचे ट्रक तोडले जातात आणि वाहनाचे पार्ट चोर मार्केटमध्ये विकले जातात, अशी माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. गुरुवारी सायंकाळी गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकासह ट्रान्सपोर्टनगरात धाड टाकली आणि प्रत्येक दुकानाची पाहणी केली. दरम्यान मोहसीन मोटर पार्ट, समीर स्क्रॅब सेंटर आणि एस.आर.एल. स्क्रॅब सेंटरमध्ये दोन ट्रक आणि चारचाकी वाहनांचे वेगवेगळे पार्ट दिसले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन विचारपुस केली. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी दोन्ही ट्रकसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करुन नागपुरीगेट पोलिसांच्या ताब्यात दिले...
अमरावती हे चोरीचे ट्रक तोडण्यासाठी महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात प्रसीध्द आहे. अनेक राज्यातील चोरीचे ट्रक अमरावतीला आणून तोडले जाते. हे रॅकेट शहरात गेल्या काही वर्षापासून सक्रिय आहे. 2007-2008 मध्ये शहर पोलिसांनी ट्रक स्क्रॅपचे बरेच गुन्हे उघड केले होते. तसेच शंभरच्यावर चोरीच्या ट्रकचे गुन्हे उघड केले होते..
नालासोपारा : मुसळधार पावसामुळे दिनांक 20 ॲागस्टला निर्माण झालेल्या पुरस्थितीत नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पश्चिम येथील डिमार्टजवळील नाल्यात वाहून गेलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नाव रमेश जयणारायन तिवारी (वय 55) असे आहे. तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी कामावरून घरी परतताना, परिसरात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रमेश तिवारी हा नाल्यात पडला, पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्या रात्री तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवली होती.
काल गुरुवारी नालासोपारा पश्चिम हनुमान नगर भागातील डिमार्टजवळील नाल्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता, तो रमेश तिवारी यांचा असल्याचे स्पष्ट झालं. प्राथमिक तपासात ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आल. आहे.
पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुरस्थितीतील सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Nashik News : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.. या पाण्याचा परिणाम म्हणून निफाड तालुक्यातील चांदोरी येथे पुर परिस्थिती निर्माण झाली असून गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी धोक्याच्या पातळी ओलांडत आहे..पुर पाणी नदीपात्राबाहेर आल्याने चांदोरी येथील ऐतिहासिक खंडेराव महाराज मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडाले असून मंदिराचा फक्त छप्परच वर दिसत आहे. तसेच नदीपात्रात वसलेले हेमाडपंथी मंदिर पुराच्या पाण्यात पूर्णपणे दिसेनासे झाले आहे.. चांदोरी ग्रामपंचायतीचा पाण्याने भरलेला टँकरही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे..या परिस्थितीमुळे शेतांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती, त्यावरून मेहकर पोलिसांनी सापळा रचून एका आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 65 लाखाचा गुटखा आढळून आला आहे, पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पुन्हा एकदा अतिभारामुळे मोनोरेल काल सकाळी 15 मिनिटे रखडली, पन्नास प्रवाशांना उतरून मोनोरेल तेव्हा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली
मुसळधार पावसात मंगळवारी मनोरेल अडकल्यानंतर पूर्ण सेवा रात्री विस्कळीत झाली होती... मोनोरेल मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे मोनोरेल एका बाजूला झुकली होती...
त्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी अशी काहीशी तिथी सकाळच्या वेळेला पाहायला मिळाली
गुरुवारी सकाळी सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास 109 टन वजन घेऊन अँटॉप हिल्स जवळीत आचार्य अत्रेनगर स्थानकात जवळपास पंधरा मिनिटे रखडली
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही सेवा रखडली असल्याचे सांगितले गेलं... त्यानंतर पन्नास प्रवाशांना आचार्य अत्रे नगर स्थानकाच्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा मनोरेल सेवा 15 ते 20 मिनिटानंतर सुरू करण्यात आली
बुधवारी सुद्धा अशाच प्रकारे अधून मधून मोनोरेल सेवा उशिराने पाहायला मिळाली होती
बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई
दोन ट्रक मधून नेण्यात येणारा तब्बल 692 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त
एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रक मध्ये गांजाने भरलेली 40 पोती उतरवत असताना बार्शी पोलिसांनी टाकली धाड
पोलीस आल्याचे लक्षात येताच दोघांनी घटनास्थळावरून काढला पळ
मात्र पोलिसांनी या घटनेत 692 किलो गांजा, दोन ट्रक, एक कार असा जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीस अटक करण्यात आलीय
दरम्यान हा गांजा आरोपीना कुठून आणला आणि कुठे नेला जातं होता, शिवाय यामध्ये अन्य कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती पोलिसानी दिली
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 16 टनांपेक्षा जास्त जड असणाऱ्या वाहनांना वाहतूक बंदी राहणार आहे. 23 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून हे नियम लागू होणार असून गणेशोत्सव काळात होणारी या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाहनांना या मध्ये सूट असणार आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 16 टनांपेक्षा जास्त जड असणाऱ्या वाहनांना वाहतूक बंदी राहणार आहे. 23 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून हे नियम लागू होणार असून गणेशोत्सव काळात होणारी या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाहनांना या मध्ये सूट असणार आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यासाठी एसआयटीला राज्य सरकारची परवानगी ...
नागपूर मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटीच आता राज्यभर शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार ..
विशेष पोलीस महानिरीक्षक ( कायदा व सुव्यवस्था ) मनोज शर्मा यांनी हा आदेश काढला आहे ...
नागपूर चे पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा आहे या एसटीचे प्रमुख ..
नागपूरच्या बाहेर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शालार्थ आयडी घोटाळ्याचा एक गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे राज्यभरातील शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे
शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून यात तीन शिक्षण उप संचालक , तीन शिक्षणाधिकारी , एक वेतन अधिक्षक , चार संस्थाचालक, दोन मुख्याध्यपक व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे