Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेकडे एका दिवसात साडेतीनशे पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपले असताना आता पावसाळी आजारांचा ‘ताप’ही वाढला आहे. यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 404 झाली असून मलेरियाचे 674 रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या वाढतच असून पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली आहे. या रुग्णांमध्ये निम्मी संख्या लहान मुलांची असल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान
राज्यातील १ हजार ८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार अनुदान
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
भांडवली अनुदानापोटी २५ हजार रुपये वितरित करणार
अनुदानासाठी २३ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरण; प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी अटक केलीये. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. ती मंजुरी मिळताच आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेण्यात आलं. काही वेळापूर्वी बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली, आता थोड्यावेळात त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.





















