Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 19 Sep 2025 02:23 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. जून ते आतापर्यंत दोन लाख 91 हजार 842 शेतकऱ्यांच्या 2 लाख 74 हजार 607  हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले....More

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन

बीड : बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवना बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आणि याच निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून बीडमध्ये ही तीव्र पडसाद दिसून आले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने पडळकर असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला..

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.