(Source: Poll of Polls)
Maharashtra Breaking LIVE Updates : बारावीच्या परीक्षेचा निकाल किती वाजता लागणार, कुठे व कसा पाहता येणार? लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Breaking LIVE Updates : राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातील आणखी महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर, राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
HSC Exam Result 2025: नियमित सराव आणि टेस्ट पेपर सोडवत नागपूरच्या अमोघ ने केली गणिताशी मैत्री; मिळवले 100 पैकी 100 गुण
HSC Exam Result 2025: विद्यार्थीदशेत इंग्रजी सह गणित हाच विषय विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक अडचणीचा ठरतो, मात्र नागपुरातील अमोघ गोतमारे या विद्यार्थ्यांने नियमित सराव आणि टेस्ट पेपर सोडवत गणितात 100 पैकी 100 गुण मिळवले आहे.. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोघ गोतमारे ला 95.17% (571/600) गुण मिळाले असून विज्ञान शाखेतून नागपुरातून टॉपर ठरला आहे ( आतापर्यंतच्या माहितीनुसार)... अमोघने गणित या विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवले असून गणिताचा नियमित सराव आणि नियमितपणे सोडवलेले टेस्ट पेपर यामुळे उत्तुंग यश मिळाल्याची प्रतिक्रिया अमोघने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे...
पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय नाही; पुढील सुनावणी 9 जूनला
पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय नाही
या संदर्भात काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकार तर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द
पीओपीच्या मूर्तींच समुद्रात विसर्जन करण्याबद्दल काकोडकर समिती सकारात्मक
मात्र १ जून पर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश
या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जूनला
पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांची आहे हायकोर्टात याचिका
बंदीमुळे पीओपी मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
2020 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती
मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून पीओपीबंदीचा निर्णय लागू



















