- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog: देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा, धनंजय मुंडे ऑपरेशनमुळे गैरहजर राहणार
Maharashtra Live Updtes: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् एका क्लिकवर पाहण्यासाठी क्लिक करा. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updtes: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे आमदार सुरेश धस उपस्थित असतील. फडणवीस बीडमध्ये येणार असले तरी धनंजय मुंडे...More
अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यापालांना आमदार अमोल मिटकरींनी अशा मागणीच पत्र दिलंय. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात दिलं राज्यपालांना पत्र दिलंय. सोलापुरकरने माफी मागितली असली तरी त्याला माफ करू नये अशी पत्रात मागणी. यानंतर असा प्रकार करण्याची हिंमत होऊ नये म्हणून यावर कठोर कारवाईची आमदार मिटकरींची राज्यपालांकडे मागणी.
Pune: पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केलीय. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक करण्यात आली. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एका तरुणावर याआधी एक गुन्हा दाखल असून एक जण अल्पवयीन असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या परिसरात इथून पुढे असे कृत्य करणाऱ्यांचे कंबरडे मोडू असा इशारा सुद्धा यावेळी पोलिसांनी आता दिला आहे. ज्या ठिकाणी या तीन आरोपींनी कुठलाही कारण नसताना जवळपास 50 हून अधिक गाड्या फोडल्या त्याच ठिकाणी पोलिसांनी तात्काळ या आरोपींना घेऊन तिथेच त्यांची वरात काढली.
सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर
मुंबईत सोन्याचा भाव ८७ हजारांच्या पार
मागील २४ तासात एक हजारांहून अधिकची वाढ
मुंबईत सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅम ८७ हजार ५५० रुपयांवर
रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण, अमेरिका -चीन यांच्यातील व्यापार युद्धाची शक्यता, लग्नसराईच्या काळात देशातून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता यासारखी प्रमुख कारणं सोन्याच्या दरवाढी मागं आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा एप्रिलच्या वायद्याचा दर 84252 रुपयांवर पोहोचला आहे. सर्राफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर काल 85800 रुपये होता. ही माहिती अखिल भारतीय सर्राफा संघानं दिली होती.
नाशिक महानगरपालिकेचा बहुचर्चित यंदाचा पुष्पोत्सव रद्द...
सात ते नऊ या तीन दिवसांसाठी महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवावर महापालिका आयुक्तांनी मारली फुली...
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खर्चाची बचत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने उत्सवावर 47 लाख रुपये खर्च करण्याची बाब उचित नसल्याचे कारण देत आयुक्तांनी घेतला निर्णय...
जवळपास 50% पेक्षा जास्त काम पूर्ण करत उद्यान विभागाकडून करण्यात आले होते सूक्ष्म नियोजन ...
ऐन दोन दिवसावर येऊन ठेपलेला पुष्पोत्सव महापालिका आयुक्तांनी रद्द केल्याने चर्चाना उधाण...
वर्धा : इंग्लडचा स्टार क्रिकेटपटू तथा सलामी फलंदाज जॉस बटलर वर्ध्याच्या तळेगांव येथे आला होता. तळेगांव येथे असलेल्या राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याने भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्याचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
भंडारा: जिल्ह्याच्या आंधळगावं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांब गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. एका घरात चोरट्यांना काहीचं मिळालं नसलं तरी, दुसऱ्या घरातून त्यांनी ७५ हजार रुपये रोख आणि लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सकाळी उघडकीस आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आनंदाची बातमी!
इराणमध्ये बेपत्ता झालेले वसमत, जि. हिंगोली येथील उद्योजक अभियंते योगेश पांचाळ अखेर आज पहाटे सुखरुप मुंबईत परतले. त्यांच्या शोधासाठी कुटुंबियांनी केलेल्या अथक प्रयत्नांची व प्रार्थनेची ही फलश्रुती आहे.
पांचाळ परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भारत सरकार, भारताचे तेहरानमधील दूतावास आणि नवी दिल्ली व मुंबईतील इराणी दूतावासाचे आभार. योगेश पांचाळ यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, याचा अतिशय आनंद आहे. अशी खा. अशोक चव्हाण यांची पोस्ट... आहे.
आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळले
दर कोसळल्याने शेतकरी वर्गात नाराजी
छत्रपती संभाजी नगरच्या जाधववाडी मंडित आवक वाढली
ANCHOR: छत्रपती संभाजी नगर मध्ये सर्वात मोठी असलेली जाधववाडी भाजी मंडई येथे भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळलेले पाहायला मिळाले. मेथीची 20 रुपयाला मिळणारी जोडी 10 रुपयात तीन मिळू लागल्यात, टोमॅटो 10 रुपये किलो, कोथिंबीर 10 रुपयात 2 जुडी आणि पालक 10 रुपयांमध्ये 3 जुडी मिळते आहे. भाजीपाल्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, पालेभाज्यांवर खर्च केलेला देखील निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूलबस मालकांनी स्कूल बसचे भाड्यात 18 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
सरकारचे नवे नियम, पालकांकडून सुरक्षिततेची अपेक्षा आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च त्यासोबतच कर्मचाऱ्यांची पगार वाढ या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे स्कूल बस मालक संघटनांनी म्हटला आहे
स्कूलबस मालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असताना अनधिकृतपणे चालणाऱ्या स्कूल बसेस वर वव्यांवर तातडीने कारवाई सरकारने करावी अशी विनंती सुद्धा स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली आहे...
या नव्या नियमामुळे पालकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे
जगातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर येथील प्राचीन सोन्याचा कळस गेल्या सहा ते सात महिन्यापासून वाकडा झाला आहे . कळस कोसळू नये म्हणू ताराच्या साह्याने बांधलेला आहे. पुरातन विभागाच्या ताब्यात हे मंदिर असून घृष्णेश्वर मंदिर विश्वस्त कार्यकारिणीने अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार केलेली असतानाही या बाबीकडे लक्ष देत नसल्यामुळे हा कळस कोसळण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे पुरातत्व विभागाकडून योग्य ती पाऊले उचलावतील ही मागणी करण्यात येत आहे ..
डॉ. अजित गोपछडे, खासदार , राज्यसभा
- संजय राउताने हिंदू संस्कृतीचा अभ्यास करावा
- नरेंद्र मोदी योगीपुरुष आहे
- मोदी गंगास्नानला जाणारच
- हिंदू संस्कृतीला विरोध आहे का
- मोदींवर असा आरोप करणे मूर्खपण आहे
ऑन कुंभमेळा मृत्यू आकडेवारी टीका
- सरकरी आकड्यावर विश्वास ठेवा
- मी स्वतः व्यवस्था पहिली आहे
रस्ते, पूल, इमारतीच्या कामांच्या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस भेटी द्या
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रकल्पांसाठी आक्रमक
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना गती देण्याचे आदेश
कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यांना आदेश
भेटी दिल्यानंतर दर आठवड्याला कामाचा अहवाल सादर करावा लागणार
अहवाल न दिलेल्या अभियंत्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अभियंत्यांना थेट इशारा
अहिल्यानगर
दिल्ली निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे...अशात मतदारांना शुद्ध आचार आणि विचार असलेल्या उमेदवाराला मतदान करण्याचा आवाहन करत अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे... केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता, मात्र ज्या दिवशी पक्ष आणि पार्टीच्या नादात केजरीवाल स्वार्थी झाला तेव्हाच त्याच्या पासून मी दूर झालो... लोकांनी आता शुद्ध आचार विचार आणि जीवनात त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे.
त्रीसदस्य समितीकडून जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी सुरू
दुसऱ्या दिवशी चौकशी समिती बीडमध्ये ठाण मांडून
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची त्री सदस्य समिती चौकशी सुरू आहे. यासाठी चौकशी समिती सलग दुसऱ्या दिवशी बीडमध्ये ठाण मांडून आहे.
जिल्ह्यात 2023 ते 25 या दरम्यान झालेल्या जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तात्काळ त्रीसदस्य समिती नेमली असून या समितीने प्रशासकीय मान्यतेचे कागदपत्र ताब्यात घेतले आहे
मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीमार्फत ही काम झाली होती. आणि याच कामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून चौकशी समिती कडून ही चौकशी सुरू आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती केंद्रीय तपास यंत्रणाची धाड पडली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी चौकशी करत आहेत. ही धाड आयकर विभागाची असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत.
२८०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार
खुंटेफळ तलावामुळे 30 गावांतील ८० हजार एकर ओलिताखाली येणार
दुष्काळाची झळ सोसणाऱ्या आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात आज हरितक्रांतीची पहाट उगवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आमदार सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील ३० गावांतील २५ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र म्हणजे ८० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
जंगलात शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीच ट्रिगर दाबलं गेल्याने पालघरमध्ये दूर्घटना . बंदुकीची गोळी लागून एकाचा जागीच मृत्यू .
तर एक जण जखमी असल्याची माहिती .
रमेश जाण्या वरठा या साठ वर्षीय इसमाचा मृत्यू .
मनोर पोलीस ठाणे हद्दीतील घटना .
बोरशेती येथील जंगलात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेले असता सहकाऱ्याकडूनच ट्रिगर दाबलं गेल्याने दुर्घटना . मनोर पोलिसांकडून सात ते आठ जण ताब्यात .
पुढील तपास सुरू . दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह जंगलातच सोडून सहकारी झाले होते पसार .
नागपुरात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दरम्यान होणाऱ्या एक दिवसीय सामन्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे...
नागपूर - वर्धा रोडवरील व्ही.सी.ए क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर 6 फेब्रुवारी रोजी हा सामना होणार असून तब्बल 2000 पोलीस कर्मचारी आणि 600 वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी या बंदोबस्तासाठी लावले जाणार आहे...
नागपुरात जेव्हाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होतो तेव्हा स्टेडियमच्या अवतीभवती पार्किंगसाठीची मोठी समस्या उद्भवते.. मात्र यंदा पोलिसांनी भरपूर पार्किंगची जागा उपलब्ध केल्याचा दावा केला आहे...
7 हजारपेक्षा जास्त चार चाकी वाहन आणि 10 हजार दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आल्याचा दावा नागपूरचे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी केला आहे.. एवढेच नाही तर स्टेडियम पासून एक किलोमीटर अंतरावर प्रत्येकी दहा एकर पेक्षा जास्त आकाराच्या दोन पार्किंग स्पेस राखीव ठेवण्यात आल्या असून तिथून स्टेडियम पर्यंत बस सेवा ही उपलब्ध करून दिली जाणार आहे...
ज्या दिवशी टीम इंडिया आणि इंग्लंड मधील एक दिवसीय सामना जामठा स्टेडियमवर खेळला जाईल, त्या दिवशी वर्धा रोडवर बुटीबोरी ते खापरीदरम्यान जड वाहनांची वाहतूक पूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल अशी माहितीही वाहतूक उपायुक्तांनी दिली...
एवढेच नाही तर सामना बघायला आलेल्या कुठल्याही प्रेक्षकांनी नागपूर वरून स्टेडियम कडे जाताना आणि स्टेडियम वरून नागपूरकडे परत येताना महामार्गावर त्यांची वाहने थांबवू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे...
संसदेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना देशात जी दुर्घटना घडली. कुंभ मेळ्यात घटना घडली .महाकुंभ सोबत भावनिक नात्याने जोडलो आहे. पुढील आठवड्यात मी ही तिथे जाणार आहे. दुर्घटना घडली याला कोणी तरी जबाबदार आहे.
जे श्रद्धाळू मरण पावले त्याला कारण काय आहे हा माझा प्रश्न होता. ४ दिवसांपूर्वी कच-याच्या ढिगा-यातून प्रेत काढण्यात आली. लोकं म्हणताहेत १५०० ते २ हजार लोकं मरण पावले असतील. सीसीटीव्ही कॅमे-यातून व्हिडीओ का बाहेर आणले जात नाही. या वर बोललो असता उपसभापतींनी माझा माईक बंद केला.
संसदेतही सहका-यांनी हाच मुद्दा मांडला. मी बोलताना मला रोखले गेले.
दिल्ली निवडणूकीत देवेंद्र फडणवीस आले. तेंव्हा ते म्हणाले शिवसेनेचे चार मतंही नाहीत.
आमच्या ताब्यात ईव्हीएमची मालकी नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची हिम्मत भाजपने दाखवावी
महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ हा वेड्याचा आणि अंधश्रद्धेचा बाजार आहे.
मला पत्रकारांनी विचारलं की मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का रहायला जात नाहीत.
वर्षा बंगला हे अधिकृत निवासस्थान आहे.
परीक्षेदरम्यान राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली माहिती
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत आयोजित
परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन
बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकार आणि राज्य मंडळ प्रयत्नशील
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार
अभिनेता राहूल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पोलिस व्हॕनसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात
काल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं
खबरदारी आणि अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस तैनात
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. रिक्षा, चार चाकी, दुचाकी अशा ६० ते ७० गाड्या फोडल्या असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आहे. हातात कोयते घेऊन रात्री ३ वाजता ३ तरुणांनी हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. पोलिस सकाळी या तरुणांना अटक करतात संध्याकाळी सोडून देतात असा संताप नागरिकांकडून व्यक्त होताना दिसतोय. पोलिसांकडून मात्र नेमक्या किती गाड्या आहेत याचा आकडा समोर आलेला नाही.
हत्ती वरुन मिरवणूक काढणं आमदार शंकर मांडेकरांच्या चांगलंच अंगलट आलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर - वेल्हा - मुळशी मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली होती. मांडेकर आमदार बनल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी सांगली वरुन हत्ती मागवला होता. मांडेकर आमदार बनल्या बद्दल या हत्ती वरुन पेढे वाटण्यात आले. मात्र वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई सुरु केलीय. या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे त्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जीथे आहे त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.
चार चाकी असलेल्या लाडक्या बहिणी होणार थेट अपात्र
पुण्यात 75 हजार बहिणींकडे चारचाकी
जिल्हा प्रशासनाकडे यादी तयार… अंगणवाडी सेविकांकडून पडताळणीला देखील होणार सुरुवात
जिल्ह्यात एकूण 21 लाख 11 हजार 991 अर्ज आहेत
वीस लाख 79 हजार 946 यांना लाभ मिळालाय
त्यात 75 हजार 100 चारचाकी वाहनं असलेल्या बहिणी आहेत
त्यामुळे आता या 75 हजार 100 महिलांचा अर्ज थेट अपात्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या यादीनुसार अंगणवाडी सेविका या सगळ्या बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत आणि त्यानंतर अर्ज अपात्र ठरवणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी मागवण्यात आली आहे आणि त्यातून हा आकडा ठरवण्यात आलाय
रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी
हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत
सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी धाडीसाठी आले
धाडीचे कारण अद्याप अस्पष्ट
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता
- पतीने केली पत्नीची हत्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील धक्कादायक घटना
- कोयता ने वार करून कुकरच्या झाकण्याने पत्नीला केली मारहाण
- मारहाणीत सविता गोरे यांचा जागीच मृत्यू तर संशयित पती छत्रगुन गोरे ला पोलिसांनी केली अटक
- मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये होत होते वाद
- याच वादातून पतीने पत्नीला महाराणी केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
- गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, घटनेचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू...
पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलंय
सिंहगड रस्ता परिसरात तब्बल 19 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे
आरो प्लांटमध्ये आढळला कॉलिफॉर्म बॅक्टेरिया
नांदेड सिटी, किरकिटवाडी, नांदोशी धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव आणि सिंहगड रस्ता परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे महानगरपालिकेने या परिसरातील आरो प्लांटची पाहणी केली होती आणि त्यात. कॉलिफॉर्म जिवाणू असल्याचं आढळलं होतं त्यानुसार महापालिकेने या आरो प्लांट ला नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यानंतर थेट कारवाई देखील आता करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या नक्षत्र महोत्सवात मागील तीन दिवसात अडीच कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल; प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर नक्षत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी या महोत्सवात सुमारे अडीच कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल मागील तीन दिवसात झाली असून मोठ्या संख्येने नागरिक या महोत्सवाला भेट देत आहेत. 19 वर्षापासून सुरू केलेल्या या महोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असून यामुळे बचत गटातील महिलांना याचा मोठा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी दिली आहे.
जेष्ठ नागरिकाला मराठीत बोलल्यामुळे अपमानस्पद वागणूक मिळाली. एव्हढच नाही तर कुठेही तक्रार करा आमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात वय वर्षे ८२ असणाऱ्या डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आला. यामुळे संबंधित जी.पी.ओ. पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली
पोस्ट खात्यातर्फे महापेक्स २५ हे प्रदर्शन २२ ते २५ जानेवारी रोजी असे चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात डोंबिवलीतील पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते. तेव्हा खिडकी नंबर ३२ वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेत संभाषण केले असता हिंदीत बोला असे सांगण्यात आले. परंतु पारखे यांनी हिंदीत का आपणांस मराठी येत नाही का असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा हिंदीतच बोला असे सांगण्यात आले, इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा माझे काहीही बिघडणार नाही, मी मराठी बोलणार नाही असा तोरा केला. मराठी भाषेला राज्य भाषा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दर वेळी मिळत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल पारखे यांनी उपस्थित केलाय .
परतवाडा शहरात आढळलेल्या या वानराला एका गूढ आजाराने ग्रासलेले आहे. यापूर्वी राजस्थान मधील जयपूर मध्ये राहणाऱ्या लंगुरांमध्ये अश्या बुरशी, ऍलर्जीमुळे त्यांची त्वचा क्षय झाली होती. हा सुद्धा तसाच आजार आहे. संबंधित वनाधिकारी यांना माहिती दिलेली असून त्या वानराला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्याची मागणी काही सुजाण नागरिकांनी केली आहे. हे माकड सध्या मोकाट आहे. याचा संसर्ग इतर वानरांना आणि मनुष्याला देखील होऊ शकतो. याची काळजी घेऊन तत्काळ उपचार करण्याची गरज आहे असल्याचं ही सांगितले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास गॅसचा त्यांकर पलटी झाल्याने त्यातून गॅस ची गळती झाल्याने ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाहतूक अन्य दिशेने वळविली होती. तर परिसरातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. अजूनही गॅस गळती काही प्रमाणत सुरू असून, तज्ज्ञांच्या पथकाकडून गळती थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वेळीच खबरदारी घेण्यात येऊन नागरिकांना इतरत्र हलविण्यात आल्याने, अद्यापपर्यंत कोणालाही गॅसचा त्रास झाल्याचे समोर आले नाही.
शिवाजीनगर आणि डेक्कन भागात उद्या वीजपुरवठा बंद राहणार; सकाळी आठ ते रात्री चार वाजेपर्यंत दुरुस्ती काम होणार
राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केली औरंगाबाद खंडपीठात याचिका . मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा याचिकेत आरोप
पुण्यातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. पोलीसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कुंटेफळ येथील साठवण तलावाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आष्टी येथील खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन होणार आहे. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी मिळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यापूर्वी दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण यांच्या नंतर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे, मराठवाड्यात वॉटर ग्रीड झालं पाहिजे. अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची आहे. आणि याच अनुषंगाने आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. आष्टी तालुका हा प्रत्येक वर्षी दुष्काळाला सामोरे जातो. त्यामुळे कुंटेफळ साठवण तलावामुळे परिसरातील भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. सुरेश धस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट देखील आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत असते. अशातच चीचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढासगड या रस्त्यावर गोवंशाची तस्करी करणारा ट्रक पलटी होऊन 30 जनावरे ठार झाली आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरची - चिचगड मार्गावरील ढासगड घाटावर मध्य रात्री सुमारास घडली. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची वरून गोवंशीय जनावरे घेऊन एमएच ३० बीडी १०९५ क्रमांकाचा ट्रक कोरची ते चिचगड मार्गाने जात होता. ढासगड प्रवेश द्वारा समोरील घाटाच्या वळण रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.या अपघातात ३० जनावरे जागीच ठार झाली तर ईतर जनावरे जखमी झाली. ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने चालकही जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची नोंद चीचगड पोलिसांनी घेतली आहे...
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सत्ताधाऱ्यांकडून पात्र सभासदांची यादी देण्यात आली त्यामध्ये 2 हजार 221 सभासदांना शेअर्स अपूर्ण असल्याचे कारण देत अंतिम प्रारूप यादीतून वगळण्यात आले होते. या विरोधात प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे काँग्रेसचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर प्रादेशिक सहसंचालकांनी या 2 हजार 221 सभासदांचा मतदार यादीत समाविष्ट करण्याचा आदेश दिल्याने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे चपराक लगावल्याची टीका निवास थोरात यांनी केली. शरद पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची कारखान्यात सत्ता आहे.
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ जवळ असल्याने केलापानी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावाला रस्ता नसल्याने एका आदिवासी महिलेचे घरी प्रसुती करण्याची वेळ आली. मात्र प्रसुतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. त्या मातेची तब्येत जास्त खराब झाल्याने रुग्णालय गाठण्यासाठी बांबू झोळीतून जंगल मार्गाने जीवघेणा प्रवास करावा लागला एक दोन नव्हे तर तब्बल 15 किलोमीटर प्रवास करावा लागला 5 तासांचा प्रवास करून या महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
औषधी गुणधर्म असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला अलिबागचा जगप्रसिद्ध पांढरा कांदा अखेर बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. अडीचशे हेक्टर हून अधिक जागेत या कांद्याची लागवड यंदा इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.90 दिवसानंतर अखेर हा कांदा आता बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत ट्रस्टची बैठक. ड्रेस कोड लागू करण्याबाबत दोन्ही बाजूची मतं, इतर मंदिरातही ड्रेस कोड लागू.
कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती. मंदिर महासंघाकडून तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची मागणी. तर मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध, वेगळा ड्रेस कोड लागू करण्याची गरज नसल्याचे मत. तुळजाभवानी मंदिर संस्थान ड्रेस कोड बाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी काल रात्री अपहरण करण्यात आले. घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून अपहरण झाले. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेले. ही घटना मंगळवारी रात्री 8.40 वाजता सिडको एन-4 मध्ये घडली. चैतन्य सुनील तुपे असे 7 वर्षीय अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
नागपुरात एक कुटुंब प्रयागराज येथे कुंभ स्नानासाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरटे घरात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झालेत. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ह मध्ये चित्रित झाले आहेत. अज्ञात चोरट्यानी एकूण ४ लाख ९० हजार रुपचांचा मुद्देमाल केला लंपास केल्याचे समजते.
गुलेन बॅरे सिंड्रोम हा आजार किमान 23 वर्षे जुना तर नक्कीच आहे. त्यावेळी जीबीएसची लागण झालेला रुग्ण एबीपी माझाने शोधलाय. मूळचे अमरावतीचे अन सध्या पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेले अमोल सांभारेंना जीबीएस झाला, तेंव्हा ते एकोणीस वर्षाचे होते. आज ते 42 वर्षाचे झालेत मात्र 23 वर्षानंतर ही जीबीएसचे दुरोगामी परिणाम जाणवत असल्याचा दावा अमोल यांनी केला.
दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा विश्वासू अशी ओळख असलेल्या शांतनु नायडू (Shantanu Naidu) याला टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) मोठी जबाबदारी मिळाली आहे. शांतनु आता टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
Weather Update:राज्यात शुष्क कोरडे वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले असून येत्या 5दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. किमान व कमाल तापमानात येत्या दोन दिवसात फारसा फरक दिसणार नाही. पण त्यानंतर हळूहळू 2-3 अंशांनी तापमानवाढीला सुरुवात होईल असे भारतीय हवामान केंद्राने सांगितले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 3-4 दिवसांत कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर होणार. जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल.
भंडाऱ्यात चक्क ॲक्सिस बँकेचा मॅनेजरचं दाम दुप्पट करण्याच्या अमिषाला बळी पडला आणि त्यानं चक्क बँकचं लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर इथं ॲक्सिस बँक असून, गौरीशंकर बावनकुळे असं बँक मॅनेजरचं नाव आहे, ज्यांनी दाम दुप्पट करून मिळेल या हव्यासापोटी चक्क बँकेतील ५ कोटी रुपये लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात दुपारी 1 वाजता ही लॉटरी काढली जाणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात. या निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित सरकारी कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांना निमंत्रण आहे. मात्र ते जाणार नाहीत. आज त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन होईल त्यानंतर आठ दिवस घरीच असतील. सध्या मुंडे सातपुडा या सरकारी निवासस्थानी आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog: देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा, धनंजय मुंडे ऑपरेशनमुळे गैरहजर राहणार