Maharashtra Live:.. तर लोकं गुदमरुन मरतील, लोकल अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राज ठाकरे म्हणाले...
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील घडामोडी, बातम्या आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. एका क्लिकवर जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी.

पार्श्वभूमी
छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ९ जूनला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना...More
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन स्वतः तिफन चालवत खरिपाच्या पेरणीचा अनुभव घेतला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे अंबादास दानवे यांना शेतीची सखोल जाण आहे. सध्या पेरणीचा काळ सुरू असल्याने आणि शेतमातीत काम करण्याची ओढ असल्यामुळे त्यांनी दौऱ्यातून वेळ काढून थेट शेतात उतरून हातात तिफन हातात घेत परते झाले.
सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमातून मोहिते-पाटील बंधूंनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते. मात्र व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते-पाटील बंधू मंचवरून निघून गेले. सोलापूर-गोवा विमानसेवा लोकार्पण सोहळ्याच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते-पाटील बंधू हे अचानक भर निघून गेल्याने सोलापुरात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोघांचा नामोल्लेख टाळल्याचे पाहायला मिळाले.
चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली
Ac - बीडच्या केज येथून कळंबकडे जाणाऱ्या एसटीने अचानक पेट घेतला. घटना साळेगाव गावाजवळ घडली आहे. बस प्रवाशांन भरलेली होती.अचानक बोनेटमधून धूर निघू लागल्याने काही वेळेतच या बसने बसने पेट घेतला. मात्र ही बाब बसचा चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रवाशांना तत्काळ बसच्या खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.बसमध्ये आग कशी लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.अग्निशामक दल येईपर्यंत एसटी अर्ध्याच्या वर बस जळाली होती.
लग्नसोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी गेलेलं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांनी मंगलाष्टक सुरू होताच अंतरपाट धरून वधूवरांना आशीर्वाद दिला.
अँकर _जालना येथे एका लग्न सोहळ्यामध्ये जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी सर्व वऱ्हाडी मंडळींचे लक्ष वेधून घेतलं,
नेहमी राजकीय व्यासपीठावर असलेल्या या दोन आमदारांनी मंगलाष्टक सुरू होताच विवाह मंचावर जाऊन चक्क अंतरपाट धरला , हा प्रसंग पाहून उपस्थित वऱ्हाडी मंडळींच.लक्ष वेधले गेले, लग्न सोहळ्याला नेहमीच राजकीय मंडळींची आवर्जून उपस्थिती असते मात्र आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी अंतरपाट धरून वधूवरांना अनोख्या शुभेच्छा दिल्याच पाहायला मिळाले
बच्चू कडू भाषण
ही शेतकऱ्यांची लढाई आहे.. मात्र राज्यात जातीच राजकारण सुरू आहे..
शेतकऱ्यांच्या डोक्यात जात टाकल्या जात आहे...
वेगवेगळ्या पक्षात शेतकरी विखुरल्या गेले..
त्यामुळे शेतकरी कमी भाव मिळाला तरी बोलत नाही..
भाजपचे लोक म्हणतात की हिंदू खतरे मे है, तो 10 वर्ष तुमचं सरकार आहे तर मग हिंदू खतरे मे कसा आहे?
आता आंदोलन शांततेने सुरू आहे... सरकार जर झुकल नाही तर सरकारला कस झुकवायच ते आम्हाला माहीत आहे आम्ही ते करू.. आम्ही आंदोलन अजून तीव्र करू
अजीत पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाख पेक्षा जास्त पगार झाला पण सोयाबीनचे भाव 3500 झाले तरी शेतकरी ओरडत नाही... यासाठी आमचं आंदोलन आहे
जाती साठी आंदोलन करणं सोपं आहे कारण त्यात सगळे जातीचे लोकं येऊन जातात पण शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणी येत नाही...
अजित पवार
दोन तीन मिनिटाला लोकल जाते, डबे वाढले तर काय,मेट्रो गती देण्याचे काम सुरू आहे,बसेस काही ठिकाणी ठेवले आहेत
या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे हे कोणी नाकारू शकत नाही
याबद्दल चौकशी आदेश निघाले असतील
काही राजकीय लोकांना नेत्यांना काय बोलायचे त्याचा अधिकार आहे
चौकशीत समोर येईल त्या सगळ्या केल्या जातील
,मी उद्या कॅबिनेट करून येणार आहेत,उद्या काय आहे हे सांगितल्यावर आता उपयोग नाही मग कार्यकर्ते येणारच नाहीत,मी उद्या वर्धापन दिनाला येईल तेव्हा माझी भूमिका मांडेन ,
खरा दावा दोघांचाही आहे
ठाकरे बंधू एकत्रित येणाऱ्या बाबत बातम्या येत आहेत ही सगळी जबाबदारी मनसेच्या त्यांच्या प्रमुखावर असते त्यांना जे काही वाटेल ते कार्यकर्ते बोलून दाखवतात
मी तुम्हाला काय सांगू,मला बोलायचे नाही
तुम्ही टी आर पी साठी विचारता
चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे,पक्षीय लोक बोलत असतात,सगळे पक्षप्रमुख ठरवतील
मला जे सांगायचे ते मी कार्यकर्त्यांना सांगेन
माझा गोंडस चेहरा नाही पण आहे बरा चेहरा मग तुम्हा दोघां चौघांना दाढ्या आहेत,कार्यर्कत्यांना सांगावे लागते
२०१४ ला मोदी सरकार आले परत देवेद्र मुख्यमंत्री झाले त्यांनी वेगवेगळ्या महापालिका ताब्यात घेतल्या,आम्ही आपले काम करत राहायचे,वेळ आल्यावर बघू
मोठा छोटा भाऊ कोण आहे हे सांगायचे आहे अस विचारतो मी मुख्यमंत्री याना ..
येत्या 15 जून पासून पंढरपूर मध्ये तिरुपतीच्या धरतीवर टोकन दर्शनाचा प्रयोग सुरू होत असून पहिल्या टप्प्यात रोज बाराशे भाविकांना टोकन घेऊन केवळ दोन तासात दर्शन मिळू शकणार आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांनी जोरदार स्वागत केले असून यामुळे आम्हाला दर्शन रांगेत तासनतास उभारावे लागणार नाही. रांगेत असणारे वृद्ध आणि लहान मुले यांचा त्रास पूर्णपणे कमी होणार असून विठ्ठल दर्शना बरोबर पंढरपुरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी ही आम्हाला वेळ मिळेल अशा प्रतिक्रिया दर्शन रांगेतील भाविकांनी एबीपी माझाशी बोलताना दिले आहेत.
येत्या 15 जून पासून सहा स्लॉटमध्ये प्रत्येकी 2200 भाविकांना टोकन दिले जाणार असून ठरलेल्या वेळेला भाविकांना दर्शन मंडप येथे केलेल्या हॉलमध्ये आरामात बसून दर्शन घेता येणार आहे. या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक भाविकाची बसायची तर व्यवस्था केली आहेच याशिवाय मोफत चहापाणी येथे भाविकांना दिले जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह आणि इतर सुविधाही येथे मोफत दिल्या जाणार असल्याने भाविकांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. भाविकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी
Wkt - मंदिर समितीचा हा निर्णय भाविकांचा त्रास संपवणारा .. भाविकांकडून जोरदार स्वागत
Byte - राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी मंदिर समिती
जखमी मृत नातेवाईकांची बाईट्स tt
मृत विकी मुख्यदल यांच्या नातेवाईक
प्रमिला जाधव, मावशी
राहुल म्हस्के,मामा
नाईट शिफ्ट संपून विकी हा ठाण्याहून सकाळच्या ट्रेनने कल्याणच्या दिशेने निघाला होता
जेव्हा ट्रेन क्रॉस होत होत्या तेव्हा त्यामधून तो खाली पडला
आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने आता कळवा रुग्णालयात आलो
आधी त्याची पोस्टिंग डोंबिवलीला होती त्यानंतर ठाण्याला तो मागील अनेक वर्षांपासून काम करत होता
त्याच्या घरी बायको आणि मुलगी असे तिघेजण ते कल्याणला राहतात
आम्हाला नेमकं काहीच सुरुवातीला माहित नव्हतं की नेमकं काय झालं
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काॅग्रेस नेते
- दोन बाजूबाजूने लोकल जाणं हे नवीन नाही
- मुंबईकराना हे माहत नाही असं होऊ शकत नाही
- रेल्वे का संभ्रमात ठेवतयं
- जखमींशी आम्ही बोललो तर ते वेगळीच स्टोरी सांगत आहेत
- दिवा टर्मिनलची मागणी होत असताना का भूमिका घेतली जात नाही
- आर्थिक असमानत असल्यामुळे ही भूमिका घेतली जात नाही का ?
- आज देशाला रेल्वेत सर्वाधिक रेवेन्यू मुंबई रेल्वेतून दिला जातो
- मुंबई करांना काय मिळतं तर हे मृत्यू
- एसी लोकल वाढवताना सर्व सामान्यांसाठी असणार्या साध्या गाड्या कमी करून एसी लोकल का वाढवल्या गेल्या....
मुंबई : मुठभर श्रीमंत लोक ज्याने प्रवास करतात, त्या वंदे भारतवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र, सामान्य लोक ज्या रेल्वेने प्रवास करतात, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळेच असे अपघात होतात आणि दरवर्षी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. गरीब देखील माणूसच आहे हे सरकारने गंभीरतेने बघावं. देश विकसित होत आहे हे दाखवण्यासाठी वंदे भारत सुरू करा. मात्र, सामान्य लोकांकडेही लक्ष द्या आणि पीडित कुटुंबियांना भरीव मदत द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मुंबई : रेल्वे अपघाताची चौकशी होईल, यामध्ये कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल. भारतात अशा अपघाताच्या घटना घडत असतील तर रेल्वे प्रवाशांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी भीतीदायक आहे. त्यामुळे या अपघाताची चौकशी रेल्वे प्रशासन आणि राज्याच्या मुख्यमंत्री यांनी देखील आदेश देऊन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी 9 च्या दरम्यान रेल्वेतून पडून 9 ते 10 प्रवासी पडल्याची घटना घडली. दोन रूळावरील अंतर कमी असल्याने दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहणार्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. जे काही मृत्यू झालेले आहेत, त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. अशा घटना रोज घडत आहे. एवढी मोठी घटना घडली ते आपल्यासमोर आले, रोज एक मृत्यू होत आहे. संबंधित जेवढे अधिकारी आहे त्यांच्यावर तात्काळ रेल्वेने कारवाई करून त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बीड : डिजिटलायझेशनमुळे हॅन्ड पेंटिंगचा व्यवसाय अडचणीत सापडलाय. एकेकाळी सर्वाधिक मागणी सार्वजनिक हँड पेंटिंग करिता होती. परंतु, अलीकडच्या काळात डिजिटल बोर्ड रेडियम यामुळे हे कारागीर अडचणींचा सामना करताय. या कारागीरांना लग्न सराईत सर्वाधिक मागणी होती. मात्र आता डिजिटल प्रिंटआऊटची मागणी वाढत आहे. परिणामी हॅण्ड पेंटिंग कारागिरी कमी झालीय. वाहनांच्या नंबर प्लेटपासून लग्न सराईत गणपती पेंटिंगपर्यंत या कारागिरांची कलाकारी दिसून येत होती.
राज्यमंत्री योगेश कदमांचं आता गुहागर मतदारसंघावरही लक्ष राहणार आहे. उबाठाचे नेते आमदार भास्कर जाधवांना टक्कर देण्यासाठी मंत्री योगेश कदमांनी दंड थोपटले आहेत. गुहागर मतदारसंघातल्या काही गावांमधील उबाठाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. यापुढे गुहागर मतदारसंघातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर माझं बारकाईने लक्ष असेल असं योगेश कदम म्हणालेत. जो विकास दापोली मतदारसंघात होईल तसाच विकास गुहागर मतदारसंघातही होईल. खेडमध्ये पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी योगेश कदम यांनी संकेत दिलेत. शिवसेना नेते रामदास कदम, मंत्री योगेश कदमांचा उबाठा, काँग्रेसला दणका देत खेडमधील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. 2009 मध्ये गुहागर मतदारसंघातून रामदास कदम यांचा पराभव झाला होता. आता याच गुहागर मतदारसंघावर योगेश कदम यांनी लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत.
पुण्यात काका पुतण्याचे बॅनर लागल्याचं दिसून येत आहे. पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागले आहेत. ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने दोघांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले आहेत. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्रित शुभेच्छा दिल्या आहेत. 14 जून ला राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो तर 13 जूनला आदित्य ठाकरेच वाढदिवस असतो.
राजकारणात कोण कोणाचा बाप असतो आणि कोण कोणाचा काय असतो हे येणारा काळ दाखवेल. आपण काय बोलावं आणि कोणत्या पद्धतीने स्टेटमेंट द्यावे हे समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे, असा टोला जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांना लगावला. मंत्री संजय राठोड हे आज नांदेड दौऱ्यावर आले होते. मंत्रिमंडळात निधी वाटपाचा जो काही निर्णय आहे तो आमचे तीन पक्षाचे प्रमुख नेते ठरवत असतात आम्ही आमच्या नेत्यांना सांगत असतो आणि ती निर्णय घेत असतात. निधी वाटपावर नाराजी ज्या दिवशी होईल त्या दिवशी प्रसार माध्यमांना बोलवून आम्ही प्रतिक्रिया देतो असे मंत्री संजय राठोड म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन एक ठार तर 12 जण जखमी झालेत.. क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील 13 मुले MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुणे गेले होते.. परतत असताना आज पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झालाय.. जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
शेतकऱ्यांना खरीप हंगामात मदत व्हावी यासाठी शासनाकडून महाडीबीटी द्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 किलो बियाणे शंभर टक्के अनुदानावर दिले जात आहे.मात्र महाबीज कंपनीच्या बियाण्याची पॅकिंग 22 किलोची असल्याने शेतकऱ्यांना तीन बॅग सोयाबीन बियाणे वाटप केले जात असून शेतकऱ्याच्या पदरात 66 किलो बियाणे पडत असल्याने नऊ किलो बियाणं कमी मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांकडे केल्यानंतर धाराशिवचे कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी तात्काळ कृषी सेवा केंद्राला भेट देऊन सदरील प्रकाराची पाहणी केली.दरम्यान पॅकिंग फोडून बियाणे वाटप करणे नियमबाह्य असल्याने उपलब्ध पॅकिंग नुसारच शेतकऱ्यांना बियाणे वाटप करता येणे शक्य आहे असे कृषी विभागाकडून सांगितलं जातंय.
भरधाव ट्रेलरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं विद्युत पोलला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित ट्रेलरनं पायदळ जाणाऱ्या तरुणाला चिरडलं, यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील पालगाव इथं घडली. सुशांत गणवीर (२८) असं मृत तरुणाचं नाव आहे. अपघात प्रकरणी ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये पेरण्या लांबण्याची चिन्हे. लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग.. मान्सूनपूर्व पावसामुळे काही भागात कामे खोळंबली...जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये पेरण्या लांबण्याची चिन्हे. गेल्या महिन्यात सलग दोन आठवडे लातूर जिल्ह्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला.. जूनच्या पहिल्या आठवड्यातही काही भागात अधूनमधून पावसाने हजेरी लावली... यामुळे लातूर जिल्ह्यातील काही भागात अजूनही शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर, बहुतांश भागात पावसाने खंड दिल्याने वापसा झालेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, ढगाळ वातावरणामुळे मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिलाय. दरम्यान, काही जमिनीतील मशागतींच्या कामासाठी अजूनही शेतकऱ्यांना वापसा होण्याची प्रतीक्षा आहे. मशागतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असून, अशी परिस्थिती राहिल्यास खरिपाची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. पेरण्या लांबल्यास याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलीय...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर... आपल्या पारिवारिक आणि खाजगी कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर... यादरम्यान राजकीय भेटीगाठी होण्याच्या देखील शक्यता...
सोलापुरात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलाय
सोलापूर शहरात वातावरण प्रचंड बदल, पहाटेपासून सोलापुरात ढगाळ वातावरण
सोलापूर गोवा विमानसेवेच्या शुभारंभचे कार्यक्रमास उशीर होण्याची शक्यता
खराब वातावरणामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला उशिरा पोहोचण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईहून सोलापूरला 7.45 विमान उड्डाण घेणार होते
मात्र सोलापुरात व्हिसीबिलीटी कमी अद्याप उड्डाणास परवानगी मिळाली नसल्याची माहिती
गोंदिया जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व अनेक घरांचे देखील मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान प्रशासनाला नुकसान भरपाईबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी दिले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळी आमदार बडोले यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व अनेक घरांचे देखील मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान प्रशासनाला नुकसान भरपाईबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी दिले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळी आमदार बडोले यांनी दिली.
आजपासून सोलापूर ते गोवा विमानसेवा होणार सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात सोहळा
सकाळी 9.50 मिनिटांनी सोलापुरातून पहिले विमान गोव्याच्या दिशेने उड्डाण करणार
सोलापूर ते गोवा प्रवसासाठी सोलापूरकर मोठे उत्सुक, पहिल्या फ्लाईटचे सर्व तिकीट फुल्ल
पाच प्रवशाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्ते बोर्डिंग पासेस दिले जाणार
सोलापूर विमानतळ परिसरात विमानसेवा शुभारंभ कार्यकमची जाय्यत तयारी
विविध क्षेत्रातील दीड हजारहुन अधिक लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर व परीसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली असुन त्यामुळे मंदीर संस्थानच्या वतीने मंदीर व परीसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर मंदीर बंदीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.या बाबत काही भाविकांनी संस्थानकडे तक्रार केल्या होत्या.त्यामुळे भाविकांनी, पुजाऱ्यांनी,व कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकल्याचे निर्देशनात आल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची तर पुजारी आढळल्यास मंदीर बंदीची कारवाई तर भाविकांना देखील मंदीरात जाण्यापासून रोखले जाणार आहेत अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आलीय.
मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज जळगाव जामोद मध्ये सर्वपक्षीय मोर्चा. दिनांक 3 मे रोजी जळगाव जामोद येथील भाजपा कार्यकर्ता व भाजपा आ. संजय कुटे यांचा कारचालक पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनीही म्हटलं होतं. मात्र पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचं म्हणत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. सुनिता देशमुख यांच्या मागणीला सर्व पक्षांनी पाठिंबा देत आज जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे .यावेळी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जळगाव जामोद भाजपा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या मृत पतीच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा काम केलं...! असा गंभीर आरोपही मृतकाच्या पत्नीने केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभुमीवर या मेळाव्यांकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे . असं असताना आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इनस्टीट्युटमधे उस शेतीमध्ये एआयचा वापर कसा करावा यासाठी आयोजित चर्चासत्रासाठी हे दोन्ही नेते एकत्र असणार आहेत. शरद पवार आणि अजित पवारांसह या चर्चासत्रिसाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, हर्षवर्धन पाटील , जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत. व्हील एस आय मधील शास्त्रज्ञ , पदाधिकारी, खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष , राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि प्रयोगशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बारामतीतील एग्रीक्लचर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि व्ही एस आय यांच्यामधे एक आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी करार होणार आहे.
आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखीचे आज बुलढाणा शहरात आगमन होणार आहे. आज सकाळीच पालखी मोताळ्याहून बुलढाणा कडे प्रस्थान केलय. दरम्यान बुलढाणा व मोताळा मार्गावर असलेल्या राजुर घाटातून ही पालखी दिवसभर पायी चालत सायंकाळी पाच वाजता बुलढाणा शहरात पोहोचत आहे. ज्ञानोबा- तुकारामच्या गजरात आज सकाळी मोताळा शहरातून पालखीचे प्रस्थान झालेल आहे.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून बोलेरो पिकअप वाहन चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले..दाभाडी येथून पिकअप वाहन चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल होती..या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत सराईत असलेला आसिफ इक्बाल सैफ अहमद याचोरट्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेलजवळून ताब्यात घेतले.त्यांचेकडून पोलिसांनी ₹१.३५ लाख किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. यापूर्वीही या चोरट्यावर वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय जून अखेर पर्यंत लागण्याची शक्यता
भाजप तालुका आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर या प्रमुख निवडीकडे लक्ष
प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित
मुंबई अध्यक्ष पदाबाबत अजूनही नावावर शिक्कामोर्तब झालं नसल्याची सूत्रांची माहिती आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या वर्धापनदिन आहे. दरम्यान वर्धापानदिनाच्या एक दिवस आधी आज शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत...दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत... त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ देखील उपस्थित राहणार आहेत.. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय..कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती मिळतेय..
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आज नागपुरातील महाल परिसरात "छत्रपती शिवाजी महाराज चौक"वर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे... यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सप्तनद्यांच्या जलाने तसेच दुधाने अभिषेक करण्यात येईल.. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत आरती करण्यात येईल. ढोल ताशा पथकांकडून वादन ही केले जाईल.. त्यानंतर विविध शिवकालीन क्रीडा प्रकाराचे सादरीकरणही केले जाणार आहे
लातूरमध्ये जोरदार वारे तुफान पाऊस. अनेक ठिकाणी झाडे पडली... विजेचा गडगडाट त्यात लाईट गेली... लातूर शहर आणि परिसरात मध्यरात्री साडेबारा नंतर जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली.. ढगांचा गडगडाट ही सुरू होता.. त्यानंतर पावसानं तुफान बॅटिंग केली... लातूर शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता...
जोरदार वाऱ्यामुळे गांधी चौक पोलीस स्टेशन समोरील झाड पडले आहे... झाड तिथे उभे असलेल्या वाहनावर पडल... पोलीस ठाण्याची कंपाउड वाली पडली आहे... जोरदार वारे वाहत असल्याने शहरात अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठी घेऊन रात्र काढावी लागली आहे... पत्र्याची किंवा पार्टिशनची घर असणाऱ्या लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.
आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात किल्ले रायगडकडे जाण्यासाठी रोपवे परिसरात दाखल होतील. तत्पूर्वी रोपवे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त मुख्य प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आला आहे.
स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तब्बल साडेपाच तास चाललेल्या अंतिम लढतीत कार्लोसनं टायब्रेकरवर इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. आश्चर्याची बाब म्हणजे फायनलमध्ये पहिले दोन्ही सेट कार्लोसनं ४-६, ६-७ अशा फरकानं गमावले होते. पण त्यानंतर त्यानं पुढचे तीनही सेट्स ६-४, ७-६, ७-६ असे जिंकून फ्रेंच ओपनच्या लाल मातीत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. २२ वर्षांच्या अल्कराजचं आजवरचं हे पाचवं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं आतापर्यंत दोन वेळा फ्रेन्च ओपन, दोन वेळा विम्बल्डन आणि एकदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी 1 जून रोजी वाशीम येथून पंढरपूरकडे निघालीय. चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी 6 जुलै रोजी पंढरपूरात आषाढी निमित्ताने पोहोचणार आहे. बहुदा देशाच्या ईतिहासात पहिल्यांदाच अंधांची दिंडी माऊलींच्या चरणी लिण होण्यासाठी जातेय,वाशीम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी सदानंद तायडे यांनी या दिंडीचे आयोजन केलय. आज या दिंडीचे हिंगोली येथे आगमन झाले असून दिग्रस कर्हाळे पाटीवरील एका मंदिरात दिंडीचा मुक्काम असणार आहे, दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पायी दिंडीने जात असतात. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांसह बालकांचाही समावेश असतो. ज्ञानेश्वर महाराज,विठू माऊलीच्या नामाचा गजर करीत शेकडो दिंड्यातील वारकरी पंढरपूरला पोहोचतात. पण यावर्षी या नयनरम्य सोहळ्याला अधिक प्रकाशमान करण्यासाठी दिव्यांग अंध वारकऱ्यांची भर पडली असून ते त्यांच्या मधुर सुरात आपल्या सावळ्या पांडुरंगाचा जयजयकार करणार आहेत... हे अंध वारकरी उच्चशिक्षित असून अनेक ठिकाणी अभंग गायनाचे कार्यक्रम करीत असतात. अभंग गायनामुळे या वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीची ओढ लागली होती. आपणही पंढरपुरात जाऊ शकतो असा आत्मविश्वास बाळगून हे वारकरी पंढरपूरकडे निघालेत. अंधाची दिंडी वारकऱ्यांसह नागरिकांसाठी ही कौतुकाचा विषय ठरतेय.
रत्नागिरी - तब्ब्ल 16 तासानंतर मुंबई - गोवा मार्गांवरील वाहतूक सुरु
रात्री 12.50 वाजता मुंबई - गोवा महामार्गवरची वाहतूक सुरु
निवळीत मिनी बस आणि LPG गॅस टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर वाहतुक होती बंद
छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ९ जूनला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार
आयआरसीटीसी, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष पाच दिवसांच्या या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि वारसा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार
ह्या रेल्वेतील पर्यटक रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेटी देणार आहे
प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याची माहिती आणि अनुभव देण्याचा प्रयत्न असणार
जवळपास ५ दिवसांसाठी ७५० पर्यटक ह्या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live:.. तर लोकं गुदमरुन मरतील, लोकल अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राज ठाकरे म्हणाले...