Maharashtra Live:.. तर लोकं गुदमरुन मरतील, लोकल अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राज ठाकरे म्हणाले...
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील घडामोडी, बातम्या आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. एका क्लिकवर जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी.

Background
छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ९ जूनला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार
आयआरसीटीसी, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष पाच दिवसांच्या या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि वारसा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार
ह्या रेल्वेतील पर्यटक रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेटी देणार आहे
प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याची माहिती आणि अनुभव देण्याचा प्रयत्न असणार. जवळपास ५ दिवसांसाठी ७५० पर्यटक ह्या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणार
अंबादास दानवे यांनी घेतला खरिपाच्या पेरणीचा अनुभव
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन स्वतः तिफन चालवत खरिपाच्या पेरणीचा अनुभव घेतला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे अंबादास दानवे यांना शेतीची सखोल जाण आहे. सध्या पेरणीचा काळ सुरू असल्याने आणि शेतमातीत काम करण्याची ओढ असल्यामुळे त्यांनी दौऱ्यातून वेळ काढून थेट शेतात उतरून हातात तिफन हातात घेत परते झाले.
सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमातून मोहिते-पाटील बंधूंनी घेतला काढता पाय
सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमातून मोहिते-पाटील बंधूंनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते. मात्र व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते-पाटील बंधू मंचवरून निघून गेले. सोलापूर-गोवा विमानसेवा लोकार्पण सोहळ्याच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते-पाटील बंधू हे अचानक भर निघून गेल्याने सोलापुरात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोघांचा नामोल्लेख टाळल्याचे पाहायला मिळाले.


















