Live Blog Updates: दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
Live Blog 15 May 2025 Todays Breaking News in Marathi: राज्यातील आणि देश-विदेशातील प्रत्येक घडामोड आणि ताज्या बातम्यांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Live Blog 15 May 2025 Todays Breaking News in Marathi: दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली. पहलगामच्या भ्याड हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मारलं, त्यात त्यांचा काय दोष होता? त्यावेळी त्यांनी आमचा धर्म विचारून हल्ला केला, म्हणून आम्ही त्यांचे कर्म बघून बदला घेतला. पाकिस्तान अशा दहशतवाद्यांना आश्रय दिला म्हणून आम्ही पाकिस्तानला भारतीय धर्म दाखवून दिला. असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं जिल्हा बँकेच्या निवडणुक यादीतून नाव वगळलं
आमदार भोंडेकरांसह अन्य पाच बलुतेदार संस्थांनाही निवडणुकीपासून दूर ठेवलं
संतप्त आमदारांचा जिल्हा बँकेत ठिय्या आंदोलन
Anchor : शासनाकडून कर्ज घेतलेल्या बलुतेदार संस्थांना शासनानं २०१९ मध्येचं कर्ज परतफेड केल्याचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं. मात्र, आता भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यानं तब्बल सहा वर्षानंतर बँक प्रशासनानं जिल्ह्यातील पाच बलुतेदार संस्थांवर १ कोटी ३१ लाखांचं कर्ज असल्याचं पुढे करून पाच बलुतेदार संस्थांच प्रतिनिधित्व बँक निवडणुकीपासून नाकारलं. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे. यासोबतचं तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर आणि मोहाडी या तालुक्यातीलही बलुतेदार संस्थांना निवडणुकीपासून दूर ठेवल्याचं लक्षात येताच संतप्त आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केलय. जोपर्यंत निवडणूक मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत या आंदोलन सुरू राहील असा निर्वारीचा इशारा आमदार भोंडेकर यांनी बँक प्रशासनाला दिल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.
चालत्या दुचाकीवर वीज कोसळली, शिक्षकाचा रस्त्यातच झाला मृत्यू नांदेडमधील घटना
खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने वीज पडल्याचा व्यक्त होतोय अंदाज
AR: चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता विजांच्या कडकडाटात किरकोळ पाऊस झाला. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीने जात होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झालाय. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
















