Maharashtra Legislative Session 2026 : सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारकडेतरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काय आहे?राज्यपालांच्या भाषणात मुद्दे येणे विषयी ही आजपर्यंतची प्रथा परंपरा आपण अनुभवली. पण यावेळचे राज्यपालांचे भाषण हे बेचव होतं. कोणतेही प्रकारे उत्साहवर्धक नव्हते. कोणालाही उत्सहा वाटेल असं नव्हतं, राज्यपाल साहित्यिक असावे असं मला वाटतं असा टोला जाव यांनी लगावला. तसेच लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन देखील जाधव यांनी सरकारवर टीका केली. 

Continues below advertisement

घोषणांचा पाऊस नेहमीच पडतो पण अंमलबजावणीचा पूर्णपणे दुष्काळ 

राज्यपाल महोदयांकडून सरकारने निरस असं भाषण करून घेतल्याचे भास्कर जाधव म्हणाले. घोषणांचा पाऊस नेहमीच पडतो पण अंमलबजावणीचा पूर्णपणे दुष्काळ असतो असे जाधव म्हणाले. 25 लाख तरुणांनी बेरोजगारीची नोंदणी केलेली आहे, हा सरकारी आकडा आहे. एका वर्षात सात पटीने वाढ झाली आहे.कसले दावोसला करार करत आहात? कसलं तरुणांना फसवत आहात? असा सवाल करत जादव यांनी सरकारवर टीका केली. बेरोजगारीचा दर वाढत आहे. ही प्रगती मानायची का? ग्रामीण भागात बेरोजगारी चे प्रमाण वाढत आहे. सरकारने रॊजगार वाढवला की बेरोजगारी वाढवली? ही बेकारी वाढणार आहे असे जाधव म्हणाले. 

नवीन घोषणा करता, इव्हेंट करता

टाटा, वेदांत, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प या राज्यात आलेले आणि कोणाला तरी जी हुजूर करावंलागत म्हणून गुजरात ला पाठल्याची टीका जाधव यांनी सरकारवर केली. ज्या योजना केल्या होत्या त्याच काय असित्व आहे. नवीन घोषणा करता, इव्हेंट करता. 2024 मध्ये लाडका भाऊ आणलेला 10 लाख तरुणांना नोकरीं देणार सांगितलं. माझ्याककडे व्ह डिओ किल्प आहेत. आज ती मुलं वणवन फिरत आहेत.अपल्याला लाडकं काही न्हवत फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, आता लाडका भाऊ पण गेला आणि बहिण पण गेली अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 

Continues below advertisement

एक रुपया पीक विमाच काय झालं? एक रुपयाच्या नावाखाली 12 हजार कोटी मिळवले

2023 मधील भाषण माझ्याकडे आहे. 75 हजार नोकर भरती करणार असल्याचे बोलले होते. त्याच काय झालं? किती जणांना तुम्ही नोकऱ्या दिल्या. हे एकदा सांगा असे जाधव म्हणाले. घोषणा इतक्या सुंदर करता. तुम्हाला ते कौशल्य लाभले आहे. नुसती जाहिरात वर काही चालत नाही. मागेल त्याला सौरऊर्जा पंप त्याचा आकडा काढा. एक रुपया पीक विमाच काय झालं? ती योजना सरकारने बंद केली. का बंद केली? पण त्या एक रुपयाच्या नावाखाली 12 हजार कोटी रुपये तुम्ही मिळवले, पण शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा आले नाहीत अशी टीका जाधव यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रामध्ये उभा करण्याचं काय झालं?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रामध्ये उभा करणार आहोत असं सांगितलं, काय झालं स्मारकाचं? किती निवडणुका होऊन गेल्या, असे म्हणत जाधवांनी सरकावर टीका केली. राज्याची या ठिकाणी प्रगती होणार नाही. हे सरकार राज्य बुडवायला निघालेला आहे. महाराष्ट्राचा भ्रष्टाचारामध्ये सलग पहिला नंबर आहे. हा माझं वैयक्तिक आरोप नाही असे जादव म्हणाले. 

आता ईव्हीएम पडली बाजूला, आता मताला पैसे दिले जातायेत

आता ईव्हीएम बाजूला पडली आता मताला पैसे दिले जात आहेत. त्याच्या पलिकडे बिनविरोध निवडणूक करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. लोकशाही टिकवली पाहिजे. आमहाला निधी देत नाही तर त्या भागाच वाटोळं करत आहे. नियतीचा खेळ आहे हा. राज्यपाल यांची तुम्ही फसवणूक केली म्हणून तुमचा निषेध आणि ते फसले म्हणुन त्यांच्या बदल खेद व्यक्त करतो असे जाधव म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Samruddhi Mahamarg Scam : संदीपान भुमरेंचा समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा घोटाळा, ड्रायव्हरच्या नावे हिबानामा; अंबादास दानवेंच्या आरोपानंतर खळबळ