Eknath Shinde :  सोमवारपासून (23 फेब्रुवारी) महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्यावरुन प्रश्न विचारण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षनेता हा विषय सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा आहे. आम्ही त्यात काय करणार. केवळ रडत बसायचं असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. भुजबळ साहेब एकटे होते मात्र सभागृह दणाणून सोडायचे असेही शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

तुम्ही मुंबईला जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकला नाही. 25 वर्ष घालवली आणि आम्ही अडीच वर्षात करुन दाखवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यांनी काळे धंदे केले त्यांना घरी बसवलं आणि आम्हाला सत्ता दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दिल्लीच्या एआय समिटमधे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिलायन्सने केले आहे. यांना आपण सुरक्षा दिली पाहिजे नाहीतर मागच्या सरकार मधे आपण पाहिले उदयोगपतींच्या घराखाली काय काय लावलं जात होतं असे एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याच काम केलं आहे. सर्वसामान्यांसाठीचे हे बजेट असणार आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. 125 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. 90 हजार कोटी रुपयांच्या वैनगंगा पैनगंगासाठी मान्यता दिली आहे. 

आम्ही वाहतूककोंडी मुक्त मुंबईवर काम करत आहोत

आम्ही वाहतूककोंडी मुक्त मुंबईवर काम करत आहोत. बिकेसी कुर्ला 60 किमी टनेल करत आहोत. आम्हाला म्हणतात एक काम दाखवा आमच्याकडे हजार कामे आहेत. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना सांगतच आहे सभागृहात या आम्ही काय केलं ते सांगू असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही 40 लाख घरे देणार आहोत. एमएमआरडी बाबत एक घटना घडली. कठोर कारवाई संकेत दिले आहे. 4 जणांना अटक झाली आहे. कंपनीला दंड केला. एमएमआरडीएच्या माध्यमातून 15 लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख दिले आहेत. निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले. चहापान वर त्यांनी बहिष्कार घातला. हे अधिवेशन केवळ सत्ताधारी नाही तर विरोधकांचे देखील असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Continues below advertisement