Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 डिसेंबर 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, एकूण 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव
2.परराज्यातून मुंबई विमानतळावर येणाऱ्यांना संपूर्ण लसीकरण किंवा RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह असणं अनिवार्य, राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना
3. अवकाळीमुळं शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी, द्राक्ष, कांदा, आंबा, कपाशीचं मोठं नुकसान, ढगाळ हवामानामुळं औषध फवारणीचाही खर्च वाढणार
4. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन, चक्रवर्ती कमिटीच्या अहवालावर शिक्कामोर्तब, परमबीर यांच्यावर खंडणीचे 4 आणि अॅट्रॉसिटीचा 1 गुन्हा
5. काँग्रेसला बाजूला ठेवून भाजपविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न, ममता आणि पवारांच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, प्रशांत किशोर यांचीही काँग्रेसवर टीका
6. अलिबाग आगारातील एका चालकानं चक्क हेल्मेट घालून एसटी चालवली, दगडफेकीच्या भीतीनं कर्मचाऱ्याची युक्ती
7. घशात च्युईंगम अडकलं अन् शाळकरी मुलाचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरट गावातील पंधरा वर्षीय उमेश गणेश पाटील या शाळकरी मुलगा च्युईंगम खात असताना ते घशात अडकलं. यामुळं उमेशचा श्वास गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उमेश हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. भडगाव तालुक्यातील पांढरट गावात राहणार उमेश हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळा सुटल्यावर नंतर पांढरट ते भडगाव रिक्षाने जात असताना कधी तरी च्युईंगंम खाण्याची सवय असलेल्या उमेशने नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या समवेत च्युईंगम खात रिक्षाने प्रवास सुरू केला होता. मात्र याच वेळी च्युईंगम त्याच्या घशात अडकलं. जीव गुदमरू लागल्याने त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही.
8. 'पैसे उकळण्यासाठीचं राज्य सरकारच्या केसेस NCB स्वतःच्या ताब्यात घेत आहे', नवाब मलिक यांचा केंद्राला टोला
9. बाकडे, बादल्या आणि पिशव्यांच्या खरेदीसाठी 16 कोटींची उधळपट्टी, पुणे पालिकेचा प्रताप
10. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना, विश्रांतीनंतर विराट कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन; पहिल्या दिवसाच्या खेळावर मात्र पावसाचं सावट
ई वाहनं क्रांती घडवणार! ई-वाहनांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर आज दुपारी 3 वाजता, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंसोबत चर्चा