लाडकी बहीण योजनेचे केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. यासोबत ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत, त्यांची केवायसी करण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तीच आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे.
त्यानंतर समोरच तुम्हाला एक बॅनर दिसेल. त्यावर लिहिलं आहे की ज्या लाडक्या बहिणीने kyc करताना चूक केली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, म्हणजेच घटस्फोटीत महिलांच्या केवायसीसाठी येथे क्लिक करा. त्यावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
आता इथे तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर खाली कॅपचा कोड आणि ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर अनुक्रमांक एक आलं असेल, त्यात विवाहित, अविवाहित असा ऑप्शन आला असेल.
ज्या महिला विवाहित आहेत, त्यांनी विवाहित निवडावे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत, किंवा वडिलांचे निधन झाले आहे, अशांनी अविवाहित हे निवडावे.
01. वडील हयात आहे02. वडिलांचे निधन झाले आहे.
-त्यानंतर तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा. यानंतर आणखी एक पेज ओपन होईल. त्यात तुमचे पतीचे, किंवा वडिलांचे नाव ऑटोमेटिक आलं असेल, त्यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे.
-जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहे का हे निवडायचं आहे.
-पुन्हा तुम्हाला एक ऑप्शन खाली दिलाय, त्यात तुम्हाला सांगायचं आहे की, तुमच्या घरातील कुणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून निवृत्तीवेतन घेत आहे का?
-त्यानंतर तुम्हाला तिसरा पर्याय आला असेल, त्यात तुम्हाला तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. त्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 देण्यात आलीये.
-आता सर्वात शेवटी तुम्हाला सांगायचं आहे की, मी भरलेली माहिती खरी आहे, जर खोटी असल्यास मी योग्य कारवाईसाठी पात्र असेल. यावर टीकमार्क करून तुम्हाला खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल.