Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलच्या (Kagal) निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत.


दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे. 


संताजी घोरपडे कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं होतं. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर 21 दिवसांनी ईडीने ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.  


 


महत्त्वाच्या बातम्या:


Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर? कोल्हापूर आणि पुण्यात छापेमारीची चर्चा