एक्स्प्लोर

मोठी बातमी! 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार 'या' शहरात रंगणार, 42 शहरातील मल्ल सहभागी होणार

यावर्षीची 68  वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोलीत होणार आहे. 18 ते 22 मार्च दरम्यान वाघोलीत ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.

Maharashtra Kesari Wrestling Tournament 2026 :  यावर्षीची 68  वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोलीत होणार आहे. 18 ते 22 मार्च दरम्यान वाघोलीत ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत वाघोलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या कुस्ती स्पर्धेत 42 शहरातील जवळफास 840  कुस्तीगीर सहभागी होणार 

याज्याच्या क्रीडा विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच यजमानपद यावर्षी पुण्याला मिळालं आहे. पुण्यातील वाघोलीत या स्पर्धा होणार आहेत. वाघोलीत 18 ते 22 मार्च दरम्यान विविध वजनी गटात या स्पर्धा पार पडणार आहेत. याचबरोबर 68 वी वरिष्ठ गट माती आणि गादी प्रकारातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा देखील होणार आहे. या कुस्ती स्पर्धेत 42 शहरातील जवळफास 840  कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विजेत्याला मल्ल मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ 1 किलो चांदीची गदा देण्यात येणार आहे. तर इतर गटातील कुस्तीगिरांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. आज पुण्यात कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या उपस्थितीत कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

या स्पर्धेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील मल्लांना व्यासपीठ मिळते

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील माती व मॅट विभागातील सर्वोच्च मानाची कुस्ती स्पर्धा आहे. ज्याची सुरुवात 1961 मध्ये कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकाराने झाली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित या स्पर्धेत विजेत्याला मानाची 'गदा' व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 1961 मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये झाली होती. या स्पर्धेचे पहिले मानकरी दिनकर दह्यारी होते. ही स्पर्धा माती (Clay) आणि मॅट (Mat) अशा दोन्ही प्रकारांत खेळवली जाते. विविध वजनी गटातील मल्ल अंतिम लढतीसाठी पात्र ठरतात. या स्पर्धेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील मल्लांना व्यासपीठ मिळते आणि ही महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे. विजेता मल्ल 'महाराष्ट्र केसरी' किताबाचा मानकरी ठरतो आणि त्याला मानाची गदा मिळते.  महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही एक केवळ कुस्ती नसून तो एक मोठा सांस्कृतिक व क्रीडा उत्सव मानला जातो. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कामाकोपऱ्यातून कुस्तीप्रेमी कुस्तीचा थरार पाहण्यासाठी येतात. 

महत्वाच्या बातम्या: 

महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना, आदेशाचं उल्लंघन कराल तर 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द करू, कुस्तीगीर संघाच्या पत्रामुळे गोंधळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Iran- Israel War : इस्रायल-इराण युद्धाचा भडका, जगभरात दुसऱ्या क्रमांकावर एलपीजी आयात करणाऱ्या भारतापुढं नवं संकट; सरकारचा मोठा निर्णय!
इस्रायल-इराण युद्धाचा भडका, जगभरात दुसऱ्या क्रमांकावर एलपीजी आयात करणाऱ्या भारतापुढं नवं संकट; सरकारचा मोठा निर्णय!
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget