Maharashtra Kesari 2023 : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोरापूरच्या महेंद्र गाडकवाड (Mahendra Gaikwad) याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताबर नाव कोरलं. महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि पाच लाख रूपये रोख असं बक्षीस देण्यात आलं. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावणाऱ्या पैलवानाला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि पाच लाख रूपये रोख असं बक्षीस देण्यात येतं. याशिवाय राज्यभरातील कुस्तीवर प्रेम करणारे कुस्ती प्रेमी देखील या मल्लाला आपापल्या परीने बक्षीस देत असतात. याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून या पैलवानांना 5 हजार रूपये मानधन दिलं जातं. यात वाढ करून यंदापासून हे मानधन 15 हजार रूपये करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार आहे. आजच्या विजयानंतर शिवराजवर देखील अभिनंदनासह राज्यभरातून बक्षीसांचा वर्षाव करण्यात येत आहे. याबरोबरच सर्व वजनी गटातील 18 विजेत्यांना जावा बाईक देण्यात येणार आहेत.
पुण्यात मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याजच्या स्पर्धेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पैलवानांसाठी काही घोषणा केल्या.
महिला केसरीसाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची महत्वाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. याबरोबरच महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, अर्जुन पुरस्कार, वयोवृद्ध कुस्तीपटूंसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्र आणि हिंद केसरी विजेत्यांना 15 हजार रूपये मानधन तर ऑलिम्पिक आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 20 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहेय याबरोबरच वयोवृद्ध खेळाडूंचं मानधन अडीच हजारांहून साडेसात हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात 1961 साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. हे मल्ल नेमके कोण ते पाहूया...
Maharashtra Kesari : आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी
1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964),
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965),
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966),
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976),
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968),
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969),
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070),
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071),
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972),
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973),
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974),
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975),
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978),
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979),
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980),
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981),
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982),
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984),
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985),
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986),
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987),
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988),
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992),
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95),
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96),
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97),
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98),
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99),
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000),
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001),
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02),
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03),
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04),
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06),
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007),
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008),
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009),
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010),
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011),
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012),
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013),
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014),
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015),
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016),
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017),
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019),
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)
55)पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)