Maharashtra Karnataka Border issue :  महाराष्ट्र-कर्नाटक सिमाप्रश्नाच्या संदर्भातील (Maharashtra Karnataka Border issue) सर्वोच्च न्यायालयतील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. तर भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे या समितीचे सहअध्यक्ष आहेत. या दोघांसह 7 जणांची ही तज्ञ समिती करण्यात आली आहेय

समितीत कोणा कोणाचा समावेश?

प्राचार्य एन डी पाटील यांच्या निधनानंतर तत्कालिन मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती नेमण्यात आली होती. 30 जून 2022 रोजी धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. त्यानंतर अॅड राम आपटे यांच्या निधनानंतर सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन समिती नेमण्यात आली आहे. यात दैनिक पुढारीचे संपादक प्रतापराव जाधव, दिनेश ओऊळकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, महेश बिर्जे, र वि पाटील, प्रधान सचिव निधी व न्याय, सीमा प्रश्न अप्पर मुख्यसचिव यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित 

महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यानचा सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमाभागातील सुमारे सात हजार किलोमीटर भूभागावर महाराष्ट्राने आपला दावा सांगितला आहे. यात गुलबर्गा, उत्तर कन्नड, बिदर, बेळगाव, कारवार व निपाणी या शहरांसह 814 मराठी भाषिक गावांचा समावेश आहे. लोकमताचा अनादर करून कर्नाटकात गावांचे विलीनीकरण करण्यात आल्याने अवघ्या सीमाभागात संतापाची लाट आहे. अत्यंत त्वेषाने मराठी भाषकांनी विरोधाचा आवाज बुलंद केला. आंदोलनांची मालिकाच सुरू झाली. कर्नाटक शासनाने वेळोवेळी दडपशाहीचे धोरण अंगिकारले. आंदोलनकर्त्या मराठी भाषकांवर गोळीबार केला. काहीजण हुतात्मे झाले. दडपशाहीला न जुमानता सहा दशकांहून अधिक काळ बेळगावसह सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी आतुर असून त्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. बेळगाव आणि सीमाप्रश्नाची चर्चा महाराष्ट्रात सातत्यानं होत असते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहे. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं आजही म्हटलं जातं. त्यातून सीमावादाचा लढा उभा राहिला.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Ekikaran Samiti : कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा