Maharashtra Inflation: महाराष्ट्रात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू (Wheat), ज्वारी (Jowar), बाजरीने (Bajri) पन्नाशी ओलांडली आहे. उडीद डाळ, मुग डाळ, तूर डाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट बिघडलं आहे. सर्वसामान्यांच्या ताटातले जवळपास सर्वच पदार्थ महागल्यामुळे घराचा रहाटगाडा हाकताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर गेले आहेत.
पाहुयात सध्याचे दर काय आहेत, ते सविस्तर...
पदार्थ | दर (प्रति किलो) |
गहू | 36 ते 38 |
ज्वारी | 52 ते 70 |
बाजरी | 40 ते 44 |
तूर डाळ | 130 ते 150 |
मूग डाळ | 120 ते 130 |
उडीद डाळ | 120 ते 140 |
मूग | 110 ते 130 |
मटकी | 120 ते 160 |
शेंगदाणे | 140 ते 170 |
अवकाळी पावसामुळे धान्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. मात्र, शेतीचे नुकसान झाल्यानं उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. गहू, ज्वारी, मका, केळी, द्राक्ष, संत्री यांचं नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झालं आहे. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरी पन्नास रुपये प्रतिकिलो दरानं मिळत आहेत.
राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, काल (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता.
अचानक पावसाची स्थिती का निर्माण झाली?
हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाली पावसाचा इशारा दिला आहे. अचानक अशी स्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी एबीपी माझाला माहिती दिली. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागात बाष्प जमा होत आहे. तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. साधारणत 35 अंशाच्या आसपास तापमान आहे. त्यामुळं या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्याची माहिती प्रभुणे यांनी दिली.