Maharashtra IAS Transfer : गेल्याच आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आताही चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन (Parag Soman) यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे (Sachin Kalantre) यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली आहे.
नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा चांडक (Saumya Sharma Chandak) यांच्याकडे आता अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी असेल. तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान (Jithin Rahman) यांच्याकडे आता बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी असेल.
Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
1. पराग सोमण (IAS:SCS:2014) मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. सचिन कळंत्रे (IAS:SCS:2014) महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती यांची यशदा, पुणे येथील उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. सौम्या शर्मा-चांडक (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. जिथिन रहमान (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Transfer Order : गेल्या आठवड्यात कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
1. नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. ए.बी. धुळाज (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या