एक्स्प्लोर

Hindi Exam : सरकारी अधिकाऱ्यांसाठीच्या हिंदी परीक्षेचा निर्णय रद्द, मोठ्या विरोधानंतर सरकारचं पाऊल मागे

Hindi Exam For Maharashtra Officers : शासनाच्या 1976 सालच्या नियमानुसार दरवर्षी हिंदीची परीक्षा घेण्यात येते. आता ती परीक्षा गरजेची आहे का याची पडताळणी करणार असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले. 

मुंबई : राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषेची परीक्षा (Hindi Exam For Maharashtra Officers0 आता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती दिली. 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मराठी भाषा अभ्यास केंद्राने विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षेची गरज आहे का नाही याची पडताळणी करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. पुढच्या महिन्यात, 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती. भाषा संचालनालयाच्या या निर्णयाला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला होती. मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या डॉ. दीपक पवार यांनीही त्याला विरोध केला होता. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

याबाबत प्रतिक्रिया देताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की, "सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीची नियोजित हिंदी भाषेची परीक्षा रदद करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत आपण विभागाच्या सचिवांशी चर्चा केली आहे. 1976 च्या नियमावलीनुसार दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षेची गरज आहे का, 1976 चे नियम काय आहेत याची पडताळणी करणार आहोत."

Marathi Abhyas Kendra : मराठी भाषा अभ्यास केंद्र

भाषा संचानलायाने जाहीर केलेल्या या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राने जोरदार विरोध केला होता. मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय? असा सवाल मराठी भाषा अभ्यास केंद्राकडून करण्यात आला. प्रस्तावित हिंदी परीक्षा तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केला.

MNS On Hindi Exam : मनसेची टीका

हिंदीची ही परीक्षा घेणं म्हणजे दिल्लीत बसलेल्या भैय्याना खुश करण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने आमच्या मराठी कर्मचाऱ्यांवर भाषा लादली तर त्याचा तीव्र निषेध होईल. अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी, हे राज्य सरकारने स्पष्ट करावं. जबरदस्ती केली गेली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल, त्याला राज्य शासन जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला होता.

या आधी राज्यातील शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकावरून दोन वर्षांपूर्वी वाद झाला होता. नंतर ते परिपत्रक सरकारने मागे घेतलं. त्यानंतर आता राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा ठेवण्यावरून नवा वाद सुरू झाला होता.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
Virar Crime News: पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती
Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती, तर 205 आस्थापनांना पालिकेची नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
Embed widget