Maharashtra Weather : देशातील विविध राज्यातील वातारणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात देखील अशीच स्थिती आहे. उद्यापासून म्हणजे 15 मार्चपासून महाराष्ट्र उष्णता (Maharashtra Heat) वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे खुळे म्हणाले.
पश्चिम झंजावाताच्या साखळ्या खंडीत होण्याच्या शक्यतेमुळं 6 महिने संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, तीव्र हिमवृष्टी आणि थंडीचा कालावधी संपुष्टात येण्याची शक्यता निसर्ग कालचक्राप्रमाणे निर्माण होत आहे. त्यामुळं 15 मार्चपासून महाराष्ट्रातही थंडी कमी होवून कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात सरासरीपेक्षा 2 डिग्री से. ग्रेडने वाढ होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
शेतातील रब्बी पिकांच्या काढणीचा कालावधी सध्या सुरु आहे. त्यातही महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांच्या कानी येऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांनी विचलित होवु नये असे माणिकराव खुळे म्हणाले. कारण आजपासून चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती नागपूर गोंदिया व गडचिरोली अशा 4 जिल्ह्यात 16 ते 19 मार्च (शनिवार ते मंगळवार) दरम्यान केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिलीय. त्यामुळं उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरु नये. तिथे वातावरण कोरडेच राहील, असे वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित होण्याची शक्यता
अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतू, खंडीत होत जाणाऱ्या पश्चिम झंजावाताच्या साखळ्या अन एल- निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, यामुळं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची विशेष अशी शक्यता नाही. सध्याच्या व येणाऱ्या रब्बी पीक काढणीच्या काळात पाऊस पडणार नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. त्यामुळं फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल.
महत्वाच्या बातम्या: