Heat increased : राज्यात सध्या तापमानात (Temperature) चढ-उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं असतानाचं दुसरीकडं तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमान 40 अशांच्या पुढं गेलं आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळं लोक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक म्हणजे 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.


सध्या राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील काही भागात तापमानाचा पारा देखील चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. याचा नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळं दुपारी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.


पाहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 


चंद्रपूर - 42.2
जळगाव - 41.7
अमरावती - 41.4
सोलापूर - 41.3
अकोला - 41.1
वर्धा - 41.1
यवतमाळ - 41
परभणी - 40.7
गोंदिया - 40.4
बीड - 40.2
वाशिम - 40
नागपूर - 39.4
अहमदनगर - 39.4
सातारा - 39.3
छ. संभाजीनगर - 39.2
पुणे - 38.8
कोल्हापूर - 38.7


या हंगामातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची चंद्रपुरमध्ये नोंद 


राज्यात पुन्हा उन्हाचा पारा चांगलाच वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kolhapur Weather : कोल्हापुरात वैशाख वणवा पेटण्यास सुरुवात, पारा 40 अंशाच्या घरात